Skip to main content

समाज

सुशांत सिंह राजपूत भाग २

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/04/2021 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे.

हॅपी होली - एक चिंतन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं. आपल्याकडे "होळी" म्हणजे कालचा, म्हणजे धुलीवंदनाच्या आधीचा दिवस.

रंगुनी रंगात सार्‍या

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2021 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/04/2021 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात.

आवाज बंद सोसायटी - भाग २

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 11/04/2021 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग १: http://www.misalpav.com/node/48651 ::: आवाज बंद सोसायटी - भाग १ आवाज बंद सोसायटी - भाग १ विषय प्रवेश आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात.

आवाज बंद सोसायटी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'. ध्वनी प्रदूषण तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता.

मोबाईलची शाळा

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 06/04/2021 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
“अन्वयी अभ्यासाची लिंक आलीये शाळेतून लवकर जॉईन हो.मला मेसेज आलाय.” अन्वयीची आई तिला ओरडून सांगून थकली होती.रोज १० वाजता शाळेची लिंक यायची.सहावीतल्या अन्वयीला tab होता.त्यावार ती गेम खेळायची,यु ट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहण्यात गुंग असायची.पण शाळेची लिंक आली की,टिवल्या बावल्या करायची .आईने दहादा सांगितल्याशिवाय जॉईनच नाही व्ह्यायची.हजेरी लावण्यापूर्ती जॉईन व्हायची.वोल्युम झिरो करत. अन्वयीची आई-वडिल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते.कोरोनात शाळांना सक्तीची सुट्टी जाहीर होती.त्यांच्या शाळेचे गाव अगदीच छोटे होते.वीजेची ,नेटवर्कची कमतरता होती.त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे अवघड होते.दोन महिने असेच

सांगली कट्टे,

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 06/04/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ.

मलई

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 03/04/2021 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
महामार्गाला लागूनच असलेल्या त्या मोठ्या झोपडपट्टीत सगळं एकदम शांत होतं. हायवेवर धावणार्या जडशीळ ट्रेलरचा दणदणाट आणि त्या दिशेने भुंकणारी कुत्री यांचा आवाज सोडला तर बाकी सगळं सुमसाम. रघ्याच्या पत्र्याच्या झोपडीत मात्र रात्रीचे एक वाजले तरी साठचा बल्ब जळत होता. बाकीच्या झोपड्यातून लोकांची बत्ती केव्हाच गुल झालेली. दहा दिवसांपूर्वीच सेन्ट्रल जेलमधून बाहेर पडलेला रघ्या.! या दहा दिवसात कुठंतरी नक्कीच नजर लावून होता. कायतरी साॅल्लीड प्लान रघ्याच्या उजाड खोपडीत नक्कीच घुमत असल्याशिवाय त्याने बाकीच्या चौघांना भेटायला बोलवलेच नसते. ”खबर पक्कीये.