Skip to main content

समाज

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 15/06/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन पृष्ठे : १६० मूल्य : १२५ रु. लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला. हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे...

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/06/2008 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली.

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

जागतिक पर्यावरण दिन

लेखक मनस्वी यांनी गुरुवार, 05/06/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फुलपाखरे वर भिरभिरती स्वप्नी आले काही.. स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई.. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.. झाडे लावा झाडे जगवा.

एक महाराज म्हणतो...

लेखक मयुरयेलपले यांनी शुक्रवार, 30/05/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.

त्या गुर्जरनगरी: ओळख

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 24/05/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.