एक तरी खड्डा अनुभवावा...।
'एक तरी खड्डा अनुभवावा'
वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.
मिसळपाव