ग्राम"पंचायत" लागली..!! -1
गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता घरी जायला हडपसरच्या बस स्टॉप वरून पंढरपूरला निघालेला लाल डब्बा पकडला. दार उघडून बघतोय तर गाडी खचाखच भरलेली.
"आयला एकादशी वगैरे नसताना पण पंढरपूरला लोक रोज का जात असतील?." मनात पहिला विचार आला. सासवड- जेजुरी पर्यंत उभं राहून जावे लागणार हे पक्क होतं. खांद्यावरचं धोपटं काढून वरच्या जाळीत टाकणार तेवढ्यात 'सोन्या' ने हाक मारली. "पाव्हणे या मागे. तिघं बसू ". बाबू मांढरेला पलीकडे ढकलून सोनावणे म्हणाले. बाबू आणि सोन्या माझ्या शेजारच्या गावची, डेली अप डाऊन करणारे.! सोन्या अप डाउन मधला सगळ्यात सिनियर बडबड्या खेळाडू मेंबर म्हणा.
मिसळपाव