Skip to main content

समाज

जप

लेखक निनाद यांनी मंगळवार, 11/10/2016 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.

आकर्षणाचे नियम

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 10/10/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत. आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल. तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह. हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या?

!! जगण्या परी मारावे !!

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 06/10/2016 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळासंगे जुगार खेळूनी, गमवून बसला पुंजी सारी, निसर्गाचा खेळ असा की, कधी अकाल तर कधी पाणी मारी !!१!! दारिद्र्याचे दंश असे की, भूक मोठी पण खिशात नाणी, जगास पिकवून देणाऱ्याचे, मुले खेळती उपासवाणी !!२!! सावकाराच्या कर्जाला तंगून, एक दिवस तो फासावर चढतो, जन्मभर ज्याची किंमत क्षुल्लक, मेलेल्यावर त्याचा भाव ही ठरतो !!३!! आयुष्य असे का दिलेस देवा, जिथे दोन वेळची भ्रांत असे, रुसला ज्यावर खुद्द निसर्ग देवता, तू सांग शेतकरी जगणार कसे !!४!! पुढच्या जन्मी जनावर होऊ, परी जन्म नको हा शेतकऱ्याचा, दोर असे जरी गळ्यात माझ्या, परी दोर नसे तो माझ्या फासाचा !!५!!
काव्यरस