Skip to main content

संस्कृती

बालगंधर्व...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/05/2011 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत. "नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.." "हो, चालेल.

जवाहिरीचा खात्मा

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 06/05/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
लादेनचा खात्मा झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता कधी एकदा त्या नं. २ ला संपवतो असे झाले होते. त्यांनी लगेच सुरक्षा समितीची बैठक बोलावली. परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला.

१ मे : द हार्ट कनेक्षन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 01/05/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत. संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत. पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम. मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे.