''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!
पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!
सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे.
केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिसळपाव
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..
जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका..