Skip to main content

संस्कृती

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

लेखक बापु देवकर यांनी सोमवार, 04/02/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

लेखक शरुबाबा यांनी शुक्रवार, 01/02/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख . शिर्डीतून मराठी हद्दपार? शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात. रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही .

दीदीना भाईकाकांच्या नावचा पुरस्कार!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 31/01/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा.

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 20/01/2008 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.

संक्रांतीच्या..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/01/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, सगळ्या मिसळपाव वासियांना मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..! तिळगुळ खाऊन इथे गोडच बोलू.. शिव्याशाप नको. - प्राजु.

पंचमदांना श्रद्धांजली

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 04/01/2008 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज ४ जानेवारी. महाराष्ट्राचे जावई श्री. राहूल देव बर्मन ऊर्फ पंचमदा यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! एस्.डी. बर्मन, पत्नी मीरा, पुत्र आर्.डी. बर्मन आणि स्नुषा आशा

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/12/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.

महान इजिप्शियन संस्कृती

लेखक सागर यांनी सोमवार, 24/12/2007 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.