Skip to main content

संस्कृती

मेपोल - एक आनंदोत्सव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 29/09/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्‍याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 26/09/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl (ऋग्वेद १/१६४/४६) [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि]. आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे.

ll गंगास्मरण ll

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

राम जोशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम जोशी (१७६२-१८१२) - पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार. हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत. छंद:शास्त्रावर व 'छंदोमंजरी' नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत. मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या व पवाडे करणारांचा 'तुरा' होता. याचें सर्व चरित्र विशेषच होतें. स्वभाव, बुद्धीची तीव्रता विद्वत्ता, आयुष्यक्रम, छंदफंद हे सर्व विशेषच होते. याच्या बापाचें नांव जगन्नाथ.

तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 21/09/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं.

पाठवण

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/09/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले. "चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला. "मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला. घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता. बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या. रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं. "झाली का तयारी?

श्रीगणेश लेखमाला

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 17/09/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे. मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद