Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवीन थीमबाबत चर्चा

न
नीलकांत
Sat, 12/31/2016 - 21:10
🗣 182 प्रतिसाद
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत
वर्गीकरण
थीम
चर्चा
मत

प्रतिक्रिया द्या
42493 वाचन

💬 प्रतिसाद (182)
स
सई कोडोलीकर Tue, 01/03/2017 - 13:11 नवीन
छान दिसतोय मिपाचा मुखडा. आधीच्या एकाच पानापेक्षा हे जास्त सुटसुटीत वाटतंय. जास्तीत जास्त धागे दिसू शकतायत, तरी सगळा पसारा सॉर्ट करून, आवरून घराची रचना बदलून नीटनेटकं लावल्यासारखं दिसतंय :-) धन्यवाद नीलकांत.
  • Log in or register to post comments
न
निर्धार Tue, 01/03/2017 - 13:29 नवीन
पण वाचनखुणा कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 01/03/2017 - 14:20 नवीन
वर म्हणल्याप्रमाणे प्रतिसादाला +१ द्यायचे असेल तर लाईक प्रमाणे सोय हवी. धाग्यांनाही रेटींग देण्याची सोय असेल तर चांगले धागे निवडायला मदत होईल.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 01/03/2017 - 14:31 नवीन
नविन थिम आवडली नाही,मेसी आहे फार.
  • Log in or register to post comments
म
माधव Tue, 01/03/2017 - 14:57 नवीन
साठवलेल्या वाचनखुणा कुठे सापडतील?
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Wed, 01/04/2017 - 04:00 नवीन
मिपाचे नवे रूप मला अजिबात आवडले नाही. कारण काय ते सांगता येत नाही. मुळात सुरवात झाली ती 'थीम' या शब्दाचा वापर बघून. अजून एकही सदर उघडले नाही. काही वाचायला मनच होत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 01/04/2017 - 04:47 नवीन
मला तरी नवे रुपडे आवडले आहे. उपप्रतिसादाला दिलेले प्रतिसाद मूळ प्रतिसादाखाली दिसत आहेत. ते जर का पहिल्या फॉरमॅट प्रमाणे करता आले तर (प्रतिसाद- उपप्रतिसाद - उपउपप्रतिसाद) चांगले वाटेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/04/2017 - 07:07 नवीन
अं हं नवीन थीम आवडली नाही . माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये। नवीन प्रतिसाद पाहायच्या लिंक चालत नाहीये आणि एकदम स्क्रोल डाऊन केले तर शेवटचा प्रतिसाद दिसण्याचा ऐवजी अन्य माहिती दिसत आहे .
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 01/04/2017 - 08:46 नवीन
नव्या रुपावर बरीच मेहेनत झालेली वाटते आहे. शिफारस मुख्यपानावर थेट मध्यभागी असणे खूप आवडले. यामुळे एक इन्ट्यूटीव फिल्टर आपसूकच येतो आहे. पडीक रहायचं असल्यास "नवे लेखन" वर जाण्यास एखाद्दुसरा क्लिक जास्त नाही. पहील्या सर्विसिंगनंतर गाडी अजून स्मूथ होईल. मालकांना धन्यवाद्स!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/04/2017 - 12:36 नवीन
लॉग इन चा बॉक्स वरती हवा होता . मिपा ओपन केल्यावर लॉग इन उजव्या बाअजूस हवे . सध्या लॉग इन साठी खालीपर्यंत स्क्रोल करावे लगते. साईटवर आल्यावर लॉग इन हे सहज आणि स्क्रोल विना दिसला पाहिजे
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 01/04/2017 - 17:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 01/05/2017 - 12:53 नवीन

धन्यवाद

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गामा पैलवान Wed, 01/04/2017 - 13:47 नवीन
माननीय प्रशासक,
माझ्या मोबाईल वरून झूम आउट करता येत नाहीये।
माझीही हीच तक्रार आहे. फिरस्त्यावर दृश्यविस्तार (= मोबाईलवर झूम इन) केल्यास डावी आणि उजवीकडे पांढरे प्रांत (=व्हाईट स्पेसेस) येतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/04/2017 - 13:49 नवीन
झूम आऊट म्हणजे दृश्यसंकोच म्हणायचं होतं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
P
palambar Wed, 01/04/2017 - 15:30 नवीन
जुन ं ते सोनं , मला मला आधीची थीम सोपी वाटते , असो ! change is the name of life.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 01/04/2017 - 17:38 नवीन
मिपा वरच लिखाण शोधायला काही पर्याय आधीच उपलब्ध आहे का?म्हणजे मिपा वरील लेखन त्याच्या लेखाच्या नावाने, लेखकाच्या नावाने वगैरे शोधायचं असेल तर काही लिंक आधीच उपलब्ध आहे का? असली तर कुठे आहे आणि नसली तर तशी सोय उपलब्ध करून देता येईल काय? तसच सध्या (म्हणजे पूर्वी देखील) टंक लेखन करताना बॅक स्पेस देऊन (काही चुकले असेल तर) पुन्हा लिहायला सुरुवात केली कि आधी लिहिलेली अक्षरे गंडतात. त्यासाठी सध्या कामचलाऊ उपाय म्हणजे alt + tab दोनदा दाबून परत लिखाणाच्या ठिकाणी येणे व लिहायला सुरुवात करणे. नवीन थीम मध्ये हे सुधारता येईल काय?
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 01/04/2017 - 17:59 नवीन
अजून काही शिफारसी/ सुधारणा : १. +१ असा प्रतिसाद देण्या ऐवजी लाईक सारख काहीतरी असाव. २. शिफारस चा चौकोन पण सगळ्यात पहिले असू नये, तो उजव्या बाजूच्या पॅनेल मधे च असावा, किंवा खालच्या बाजूला असावा. कारण प्रत्येक वेळी मिपा उघडल कि तेच तेच लेख सगळ्यात पहिले दिसतात. त्या ऐवजी सगळ्यात पहिले एका चौकटीत नुकतेच नवीन लेखन झालेले (नवीन प्रतिसाद आलेले नव्हे) ५ लेख दिसले तर जास्त संयुक्तिक वाटेल. ३. नवीन प्रतिसादांवर टिचकी मारली कि जर पहिल्या व पुढील कुठल्या हि पानावर नवीन प्रतिसाद असतील तर पहिल्या पानावरचे नवीन प्रतिसाद खुण केलेले दिसतात. पण पुढच्या पानावर टिचकी मारून गेले कि त्या पानावरचे नवीन प्रतिसाद अधोरेखित अथवा तसे खूण केलेले दिसत नाहीत. हे जुन्या थीम मध्ये पण होतच होत. पण नवीन थीम मध्ये सुधारणा झाली तर आवडेल. ४. वाचकांना लेखाला मतदान करता आल किंवा शिफारस करता आली तर बर होईल. त्यामुळे वाचकांनीच निवडून दिलेल्या चांगल्या लेखाची यादी बनत जाईल जी नवीन आलेल्या वाचकाला उपयुक्त ठरेल. यात फक्त लेख वाचनीय आहे एव्हढेच TAG करता याव. यात श्रेणी असू नये. म्हणजे मुद्दामून कोणाला कंपुगिरी करून वाईट लेख अस मतदान करता येणार नाही. ५. मिसळपाव वरील आत्ता पर्यंत च्या चांगल्या लेखांचे संकलन करून तिमाही प्रमाणे वर्गीकरण करून त्याचे पण वेगळे पान द्यावे.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 01/04/2017 - 20:31 नवीन
नवीन थीम मोबाईलमधून वाचताना छान वाटते. डेस्कटॉपवर तितकी आवडली नाही. पहिल्या पानावर खूप जास्त टेबल टेबल दिसतायत. मधला सुविचाराचा टेबल नसला तरी चालेल किंवा बॅनर नसेल तर सुविचार असं काही असावं. पहिल्या पानावर लेख, चर्चा, कविता, इत्यादी सर्व टेबल न दिसता फक्त शिफारस आणि ज्या विभागात नवीन लेखन झाले आहे तोच विभाग दिसला तर मुख्य पानावरील कन्टेन्ट कमी होईल. बरीच माहिती योग्य त्या ठिकाणी ठेवली तर अजून सुटसुटीत दिसेल, जस की साहित्य संपादकांविषयी आणि अनाहिता सदस्यत्व ही माहिती नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे ठेवली तरी चालेल. मिसळपावचे फेसबुक पान, ट्विटर, युट्युब चॅनेल या तिन्हीचा फक्त लोगो हेडर आणि फूटर दोन्हीमध्ये ठेवावा. अतिरिक्त माहिती मिसळपाव बद्दल मूलभूत माहिती किंवा नवीन सदस्यांकरिता महत्वाचे दुवे इथे दिली तरी चालेल. साहित्य प्रकार आणि नवे लेखन दोन वेगळे ओपशन करण्याऐवजी, नवे लेखनखालीच विविध साहित्य प्रकार हा मेनू सामावून घेतला तरी चालेल. स्वगृह खाली आवागमन, घोषणा, मदत पान हा छोटा मेनू ठेवला तरी चालेल. जेव्हा काही महत्वाची घोषणा असेल तेव्हा घोषणा या टेक्सटसमोर किंवा हेडरमध्ये एखादा दवंडी पिटणारा माणूस अशी अनिमेटेड इमेज टाकली तर वाचकांचे लक्ष वेधून घेता येईल. असेच युट्युब चॅनेल साठीही करता येईल. जेव्हा जेव्हा नवीन विडीयो अपलोड झाला असेल तेव्हा हेडर मधील युट्युब लोगो इमेज अनिमेट होईल असे काही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 01/04/2017 - 20:58 नवीन
खुप चांगल्या सजेशन्स आहेत. सईच्याही कल्पना आवडल्या. मदत पान इथे खुप लिंक्स एकतर ठेवता येतील. मिपाचा साईट मॅप असला तर बरं होईल. मदत पानवर संपादक, साहित्य संपादक, वाविप्र, अनाहिता, सदस्य झाल्यावर वाचायचे दुवे इ. सर्व ठेवत येईल. आणि ती माहिती वर असणे आवश्यक आहे. पुर्ण पेज खाली गेल्यावर एकदम बरीच माहिती मिळतेय, त्याने नव्या माणसाला गोंधळायला होऊ शकतं. सोशल मिडीयाचे फक्त लोगो फेडर - फुटरला असावेत असे माझेही मत आहे. शक्यतो असेच असते. म्हणजे साईटवर पहिल्यांदा आलेल्या माणसाला मिपाच्या शाखा कळतील. तातडीने लाईक / सबस्क्राईब / फॉलो करता येईल. टेबल्स जास्त होत आहेत हे खरंय. त्यातही सई म्हणते तसं सतत शिफारस मधले तेच ४-५ लेख सतत दिसत आहेत. त्यामुळे मी तरी नवे लेखनवरच सतत जात आहे. मुख्य टेबल्स मधुन मी कोणताही लेख पाहिला नाहीये अजुन. तेव्हा शिफारसची जागा बदलावी असे मलाही वाटतेय. बॅनर रोज असणारे का? कारण ती एक महत्वाची दृश्य जागा जातेय. डेस्कटॉपवर अर्धा भाग बॅनर आणि अर्धा शिफारस ह्यात जातोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रुपी Wed, 01/04/2017 - 21:42 नवीन
थीम आवडली.. काही बाबी नजरेत आल्यात त्या: लॉग-इन केल्यावर आणि लॉग-इन न करता वेगवेगळे सुविचार दिसत आहे. (खरं तर सुविचारांपेक्षा त्या दिवसाचे खास महत्त्व किंवा ट्रिव्हिया असलेलं जास्त आवडेल.) स्वतःचे सर्व लेखन दिसत नाहीये. म्हणजे http://www.misalpav.com/user/me/authored यात काहीच दिसत नाही. माझाच सदस्य क्रमांक वापरला तर मात्र दिसते. http://www.misalpav.com/user/11117/authored याशिवाय आणखी काही मुद्दे सुचवते - "हॉटेलात आलेली माणसं" लॉग-इन केलं नसल्यास दिसू नये असं मला आधीपासून वाटत आलं आहे. फक्त किती सदस्य आणि किती वाचक हजर आहेत यांचे आकडे असावेत. एखाद्या सदस्याच्या सर्व लेखनात, विभागवार वर्गीकरण करता आले आणि ते फिल्टर म्हणूनही वापरता आले तर शोधायला सोपे पडेल. ज्यांचे वेगवेगळ्या विभागांत लेखन आहे, पण समजा त्यांची एखादी पाकृ शोधायची आहे, तर पाकृचा फिल्टर वापरता येईल. शिवाय बापाचा नैवेद्य/ श्रीगणेश लेखमाला यांतले लेखन दिसतच नाही, तेही दिसायला हवे. सदस्याच्या प्रोफाइलवर गेल्यावर "Track" ऐवजी "सहभाग" / "प्रतिसाद" शब्द योग्य वाटतात. यातही फक्त लेखाचा दुवा दिसतो. त्यात सदस्याच्या प्रतिसादांचेच दुवे दिसले तर जास्त बरे होईल. वाचनखुणा सध्या दिसत नाहीयेत, पण पुढे दिसतील असे गृहीत धरुन - लेखाच्या खाली "वाचनखूण साठवा" हा पर्याय असतो, त्याऐवजी तो वरच देता आला तर? लेख नंतर वाचायचाय म्हणून खूण साठवण्यासाठी कधी कधी फार "स्क्रोल" करावे लागते. एखाद्या लेखाला फार प्रतिसाद आले तर एकापेक्षा अधिक पाने लागतात, पण पुढच्या पानांवर लेख पुन्हा दिसतो, तो फक्त पहिल्या पानावर दिसला तर? प्रतिसाद पाहायला पुन्हा फार "स्क्रोल" करावे लागते. एक-दोन सदस्यांनी सुचवले आहेच. तसे स्वतःच्या प्रोफाइलसाठी वर उजव्या कोपर्‍यात चित्र आणि ड्रॉपडाउन मेन्यु असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
फ
फेरफटका Wed, 01/04/2017 - 21:51 नवीन
मिसळपाव वर सर्च ईंजिन आहे का? एखादा लेख, लेखक कसा शोधायचा?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 01/05/2017 - 10:15 नवीन
नवीन रचना आवडली, छान सुटसुटीत आहे. माझा +१ माझ्या काही सूचना: १. फॉन्ट थोडा मोठा करता आला तर वाचायला सोपं वाटेल. २. प्रतिसादात सदस्याचे नाव आणि त्याशेजारी लगेच प्रतिसादाचे शीर्षक दिसत असल्याने वाचताना गोंधळ उडतोय. सदस्याचे नाव त्याच्या फोटोखाली टाकता येईल का? किंवा सदस्यानाम आणि प्रतिसादाचे शीर्षक यांचा फॉन्ट/रंग वेगवेगळे ठेवता येतील का? ३. हेडर तात्पुरता आहे हे समजतेय पण काळया रंगाच्या जागी मिपाचा गडद लाल रंग कसा वाटेल? ४. सर्व लेखनप्रकारांना न्याय दिल्यामुळे मुखपॄष्ठ क्लटर्ड वाटतेय. धाग्यांची वर्गवारी करण्याकरता २-३ प्रकारचे क्रायटेरिया वापरून त्यानुसार मुखपॄष्ठावरचा डॅशबोर्ड असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/05/2017 - 11:07 नवीन
नवीन थीममध्ये बरेच जुने धागे गायब झाले आहेत. "ताज्या घडामोडी - ३" या धाग्यावर प्रतिसाद देऊनसुद्धा हा धागा अदृश्यच आहे. नोटाबंदीवरील अनेक हॉट धागे गायब आहेत. खरडवही सुद्धा गायब आहे. फॉन्ट खूप मोठा व ठळक आहे. एकंदरीत नवीन थीम फारशी आवडली नाही. अर्थात सवय झाल्यावर आवडायला लागेल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/05/2017 - 12:03 नवीन
प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ....प्रतिसाद पे प्रतिसाद , प्रतिसाद पे प्रतिसाद ...और फिर उसपे 'कडेलोट होनेतक प्रतिसाद ' हे मिस होतंय ... त्याशिवाय सदस्यांना भांडण्यात मजा कशी येईल ? आणि कुठे थांबायचं ते तरी कसं कळणार ना ? बोले तो ट्री हवाच !!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 01/05/2017 - 15:10 नवीन
हा हा हा! आता कोणकोणाशी भांडतंय काय कळायला मार्ग नाही बॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 01/06/2017 - 14:18 नवीन
हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत पोटभरून भांडूया आणि कडेलोट होईपर्यंत अंताक्षरीपण खेळता येईल. हे वैशिष्ट्य परत आणल्याबद्दल मिपामालकांचे खूप खूप आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मराठी कथालेखक Mon, 01/09/2017 - 07:41 नवीन
चला कडेलोट करुया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 01/09/2017 - 08:54 नवीन
:):) ह्या नवीन थीम मध्ये कडेलोट होणार कि नाही माहित नाही. एका कडेलोट झालेल्या जुन्या धाग्यावर जाऊन आलो तर तिथे आता प्रतिसाद व्यवस्थित दिसत आहेत! :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
क
कैवल्यसिंह गुरुवार, 01/05/2017 - 18:31 नवीन
लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद, खरडवही, खरडफळा व व्य नि यांवर जी वेळ दाखवतात ती २४ तासांची दाखवतात त्यात बदल करुन ती जर १२ तासाची केली तर बरे हेईल.. म्हनजे वेळेपुढे AM/PM आसले तर जरा बरे होईल...
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Fri, 01/06/2017 - 08:12 नवीन
नवीन थीम फारच छान खूपच आवडली लेखावर जेंव्हा प्रतिक्रिया दिली जाते तेंव्हा सर्वात शेवटची प्रतिक्रिया ( Latest comment ) लेखाखाली सर्वात पहिल्यांदा दिसायला हवी म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन प्रतिक्रिया वाचताना scroll करून खाली जावे लागणार नाही . चर्चा रुपी लेखांसाठी तर हे खूप सोपे जाईल.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Sat, 01/07/2017 - 17:09 नवीन
थीमचा पार्श्वभाग पांढरा असल्याने आवडली नाही तो फिकट रंगीत हवा होता . ज्यांना जुनी थीम वापरायची त्यांना ती थीम वापरायची सोय हवी होती . Image removed.मुख्य पानावर शिफारस च्या दालनामध्ये "शिर्षक" च्या ऐवजी "शीर्षक" असा बदल करावा .शि र्हस्व च्या ऐवजी दीर्घ करावा.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Sat, 01/07/2017 - 19:21 नवीन
मागचे लेख दिसत नाहीये . उदा. गुगल वरून मी http://www.misalpav.com/node/33244 हा लेख शोधला , त्यावर प्रतिक्रियाही दिली पण तो लेख प्रतिक्रिया प्रकाशित झाल्यानंतरही नवे लेखन या सदरात दिसत नाहीये .तसेच त्या लेखाची वाचनखुणही साठवता येत नाहीये .तसेच लिंक पण नाही देता येत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 01/08/2017 - 07:11 नवीन
मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला पण नाही जमत, जुनंच मिपा परत आणा राव.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2017 - 07:17 नवीन
मिपावर अजिबात जीव लागत नाहीहे. मिपा तंत्रज्ञाचा अजिबात अवमान करायचा नाही. पण पूर्वीच्या मिपात आपलं एक आपलेपण वाटायचं. सध्याच्या मिपा रंगसंगतीच्या बाबतीत अजिबात काही विशेष असं काहीच नाही. चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते. मोबाईलच्या दृष्टीकोनातून पूर्वीचं मिपाही नीट इंजॉय करताच येतं होतं. काही तरी करायचं म्हणुन केलेला प्रयोग अजिबात झेपला नाही, हे नम्रपणे आणि स्पष्ट सांगू इच्छितो. बाकी काय करायचं ते करा. आम्ही मिपावर प्रेम करतो म्हणुन हे सोसणं आलं असं समजून मन मारुन मिपावर लिहित राहू. प्लीज प्लीज प्लीज. पूर्वीचं मिपा आणा भो............. ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
य
यशोधरा Sun, 01/08/2017 - 10:51 नवीन
बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मार्मिक गोडसे Sun, 01/08/2017 - 11:44 नवीन
चारही बाजूंनी काळा पडदा मारुन निर्जन बेटावर एकट्याच माणसाने वावरावे असे स्वरुप आलेले दिसते. असंच काहीसं वाटत होतं, फक्त शब्दात मांडता येत नव्हतं
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/08/2017 - 12:17 नवीन
काही किरकोळ त्रुटी आहेत पण त्या लक्षात येतील तशा नीलकांत आणि प्रशांत दूर करत आहेत. घर किंवा गाव बदललं तर सवय होईपर्यंत जरा वेगळं वाटतं. मग त्याची हळूहळू सवय लागते. त्यासाठी पुन्हा जुन्या लहान पडणाऱ्या घरात जायची गरज नसते. आता वाचकांचा मोठा वर्ग मोबाईल वरून मिपा वाचणारा आहे. त्यांची डेटा कमी वापरण्याची गरज लक्षात घेऊन नीलकांतने theme बदलली त्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/08/2017 - 13:32 नवीन
मोबाईलवरुनही साईटची स्क्रीन व्यवस्थित आणि पूर्ण दिसत नाही. लोड व्हायलाही वेळ लागतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/08/2017 - 14:14 नवीन
प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे. पण माझी ती दुरुस्त होईपर्यंत थांबायची तयारी आहे. मला तो मिपा बंद असण्याएवढा मोठा प्रॉब्लेम वाटत नाही. होईल हळूहळू. नीलकांत आणि प्रशांत याना वेळ होईल तसे करतील एकेक. मोबाईलवर आधी उभे आडवे दोन्ही दिशाना स्क्रोल करावे लागत होते. आता ते नाही. बाकी प्रत्येक मोबाईलच्या डिस्प्ले सेटिंगमुळेही फरक पडत असावा. पेज लोड नक्कीच कमी वेळात होत आहे. आताचा फाँट अतिशय सुबक आहे हे एक लिहायचं राहिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संदीप डांगे Sun, 01/08/2017 - 14:18 नवीन
फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत नाही. तसे तपशिलात नीलकांतला कळवले आहे. इथे सर्वांना विचारावे वाटते की आधीच्या आणि आताच्या फॉन्टमुळे वाचतांना काय बदल जाणवतो? चांगला किंवा वाईट कसाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sun, 01/08/2017 - 14:39 नवीन
नवा फॉण्ट जास्त सुस्पष्ट आणि क्रिस्पी आहे. मला आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 01/08/2017 - 14:50 नवीन
मला आधीचा आणि ह्या फॉन्टमध्ये मोबाईलवर फार काही विशेष फरक जाणवला नाही. डेस्कटॉप + IE11 वर मात्र खूप छान वाटला नवीन फॉन्ट. मोबाईलवर मोबाईल व्हर्जनपेक्षा डेस्कटॉप व्हर्जन वापरायला जास्त सोपे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Sun, 01/08/2017 - 15:33 नवीन
प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे.
हे दुरुस्त झालेलं दिसतंय. चार सहा दिवसात मोबाईलवरून प्रतिक्रिया लिहायचा कंटाळा केला होता, त्यामुळे दुरुस्त झालेलं लक्षात आलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sun, 01/08/2017 - 14:38 नवीन
वेगळं वाटणारच, पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं. शिवाय पेज लोड व्हायला खूप वेळ लागतोय. ही थीम काहीशी हेवी असावी. मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं. नव्या थीम मध्ये स्क्रोलिंग जास्त करावं लागतंय. क्लिक्सचं प्रमाण तुलनेनं वाढलंय. शिफारस दर २/३ दिवसांनी अद्ययावत व्ह्यायला हवी. होतं काय, कित्येक दिवस तेच ते लेख पहिल्या पानावर दिसत आहेत. शिफारशीमध्ये काही गाजलेले जुने लेखही वर आणायला हवेत अधूनमधून. वपु/पुलं ह्यांचे सुविचार तर अगदी दवणिय वाटत आहेत. अर्थात थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2017 - 15:24 नवीन
>>>>> मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं. खरंय रे वल्ली. फक्त दीर्घ लेखनासाठी डेस्कटॉपवर यायचो. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. (मिपाच्या रे भो) नीलकांतसाठी सहन करा भो. ;) >>>>> थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये. थीम बदल होणारच आहेत. डोंटवरी आत्ताच माहिती कळली. बाकी. दोनपाच लोकांना थीम आवडणे आणि पाचपन्नास लोकांना थीम आवडणे ही गोष्ट वेगळीच असते.

" ए जिंदगी काश तू ही रुठ जाती मुझ से:
ये रुठे हुये लोग मुझ से मनाये नही जाते. "

-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Sun, 01/08/2017 - 15:36 नवीन
पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं.
इतर धागे आणि नवे लेखन टेस्ट करताना पानाचा २५-३०% साईझ कमी आला होता. तेव्हा टेस्ट करताना स्वगृह पान जे आता आहे ते नव्हते त्यामुळे त्यात काय फरक पडला सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मार्मिक गोडसे Sun, 01/08/2017 - 12:31 नवीन
embed video टाकता येऊ नये अशी सोय करता येईल का? मोबाईलवर लेख लवकर लोड होत नाही आणि scroll ही बरंच करावं लागतं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2017 - 15:11 नवीन
अपग्रेडेशनमुळे जुन्या व्हर्जनवर जाता येणार नाही, हे इथे येर्‍यागबाळ्यालाही कळलं आहे. नव्या व्हर्जनवर जुनं रुपडं आणताही येईल हेही मला माहिती आहे. मिपाला नव्या बदलावर जायचंय आहे. काळ मोबाईलचा आहे, तेव्हा व्यवस्थापन मिपा मोबाईल सदस्यांसाठी तशी सोय करु पाहात आहे. पण सध्याची थीम अजिबात युजरफ्रेंडली नाही, थीम बदलणे आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. मीपा मालकांना सध्या काम येऊन पडले आहे त्यामुले जरा रंगकाम, यंत्रकाम लांबणीवर पडलं आहे, हेही आम्हाला माहिती आहे. आम्हाला उगाच बळजबरी कशालाही चांगलं म्हणायची सवय नाही. नै लागत जीव, तर नैच लागत म्हणतो. बाकी, नीलकांतसाठी हे सर्व सहन करतो. मिपावर आम्ही एवढी नावडती माणसं सहन केली थीम क्या चीज है. आवश्यक कामं अशी - १) वरची काळी बॉर्डर [चौकट रंग] बदलणे आवश्यक. २) प्रतिसादातील हीडरवर काम करणे आवश्यक. ३) प्रतिसादातील बॉक्स बॅकग्राउंड कलर बदलणे आवश्यक. ४) मोबाईल व्ह्यू अजूनही व्यवस्थित झालेला नाही. ५) डेस्क्टॉप व्हर्जन आणि मोबाईल व्हर्जन यावर काही उदाहरणे पाहून तसे बदल आवश्यक आहेत. ६) मोबाईल व्ह्य मधे मेनूला क्लीक केलं की स्वगृह वैगरे उघडतं. तिथे एक एक गुणीलेचं चिन्ह असलं पाहिजे. म्हणजे विंडो जाग्यावर येईल. ( मोबाईलवरुन लोकसत्ता पाहा) ७) मोबाईल व्ह्य वरुन साइट कशी चालली पाहिजे. सॅम मोबाईल साइट पाहा. ८) फाँटवरही काम आवश्य्क आहे. अजून बर्‍याच गोष्टी सांगतो. मदतनीस म्हणून काम करायची तयारी आहे. वार आणि वेळ कळवावा. कामधामं सोडून हजर होईन. हाय काय अन नाय काय. मिपाची रंगसंगती मिपाची जान आहे. एवढं विसरु नका भो. सध्या जड अंत:करणाने मिपावर वावरतोय. सदस्य म्हणून आमच्या भावना समजून घ्या भो. -दिलीप बिरुटे (जुनं काहीच सोडायची तयारी नसलेला)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 01/10/2017 - 09:03 नवीन
+१११ मोबाईल वरुन वापरताना ही थीम गंडलेली आहे असं दिसतय. अजीबात युजर फ्रेंडली नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पिलीयन रायडर Mon, 01/09/2017 - 19:19 नवीन
प्रतिसादात रचना बदलली आहे. सवय नसल्याने पटकन प्रतिसादकर्त्याचे नाव लगेच लक्षात येत नाहीये. वेळ - लेखक असं करण्यापेक्षा लेखक - वेळ असं करता येईल का? हे उर्दु सारखं उलटं वाचल्याप्रमाणे वाटतंय. वेळेत इतका इंटरेस्ट नाहीये. प्रतिसाद कुणी दिलाय ह्यात आहे..!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा