Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबर , अकबर , पिअर्स

आ
आंबोळी
Wed, 11/04/2009 - 06:19
🗣 42 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15717 वाचन

💬 प्रतिसाद (42)
अ
अमोल केळकर Wed, 11/04/2009 - 06:58 नवीन
जाऊ द्या हो. जहितात आहे म्हणून सोडून द्या. खरं म्हणजे ह्या नावावरुन कुणाच्या धार्मीक भावना दुखावल्या नाहीत हे विशेष. नाहीतर आत्तापर्यंत कुणा संघटनांनी या साबणावर बंदी घालण्याची मागणी केली असती ( आणि या उत्पादनाची आपसूकच मोठी जहिरात झाली असती . मला वाटते या कंपनीचा ही नावे घेण्यामागे हाच हेतू असावा ) लहान मुलात मात्र ही जहिरात बरीच प्रिय आहे असे दिसते. या साबण कंपनीला विनंती आहे की अशाच प्रकारच्या अनेक जहिराती काढून मुलांना इतिहास पाठ करावयास मदत करावी. :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/04/2009 - 08:45 नवीन
बाबर -हुमायूं चं काय घेऊन बसलात .. मी पाहिलेल्या सुपर कॉमेडी(होपलेस) जाहीराती सांगतो आंबोळ्या ... १. हमाम का कोणता साबण : तथाकथित केयरींग मम्मीची मुलगी सकाळी सकाळी साबण आणायला दुकाणात जाते (जसं आपण तहाण लागल्यावर विहीर खोदतो तसं). पण केयरींग मम्मी मुलीला "फक्त हमामंच घेऊन ये हो" हे सांगायला विसरते ... आणि लगेच अशी भयानक काळजीत पडते .. ती मुलीच्या पाठीमागे धावत सुटते .. जाताना विचार करते "आता माझ्या मुलीचे कसे होणार " .. "आता तिच्या तोंडावर मुरुम्स (फोड्स) येणार" .."तिची त्वचा काळवंडणार" .."आता तिचं लग्न कसं होईल" .... "तिला शाळेत सगळे चिडवतील " ... "ती डिप्रेशन मधे जाऊन आत्महत्या करेल " ... "आता मी काय करू " असं म्हणत ती पोरी ला शोधत पळते .. पोरगी काय सापडत नाय .. आणि केयरींग मम्मी चे हावभाव अगदी आपल्या ब्लड टेस्ट च्या रिझल्ट मधे "एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असल्यासारखे होतात... घरी येऊन पहाते तर पोरगी मस्त आरामात शॉवर घेत असते ....केयरिंग मम्मी अजुनंच बिथरते ... लगेच पोरीला मम्मीचे मनोगत टेलेपथीने कळते .. आणि पोरगी म्हणते .. आई ....मी हमामच घेऊन आले ... आणि मग मम्मी ला ब्लड टेस्ट चुकीचा असल्या सारखा आनंद होतो ... इथे मम्मी ला पोरगी येई पर्यंत थांबता येत नव्हतं का ? की पोरगी साबण घेतल्या घेतल्या शॉवर घेणार होती ? असो ..... दुसरी जाहीरात तर त्याहून भयानक २. विम बार ची मराठीतली जाहितात : एका भांड्यात ऑर्डिनरी साबण ठेवलेला असतो न एका भांड्या विम बार ... मग बॅकग्राऊंड मधुन एक माणूस लै भारी टोन मधे गातो ... "गळेल ... की टिकेल ?..... गळेल .. की टिकेल ? ... गळेल.. गळेल... गळेल.... टिकेल.. टिकेल .. टीकेल.... " (हॅतला एकही शब्द माझा नाही बरं ... :) ) नविन बिम बार ला आहे प्लास्टिक कोट .. जो साबणाची झिज होऊ देत नाही .. ब्लाह् ब्लाह् ब्लाह् ही जाहिरात प्रथम पाहिल्यावर मी अल्मोस्ट कॉमात जायचा बाकी होतो !! बहुदा दुसर्‍याच कुठल्या प्रॉडक्ट साठी बनवली असावी ... पण त्यांनी पुर्ण पेमेंट न केल्याने जाहिरात कंपनीने विम ला विकली असावी असा माझा संशय आहे !! - तांबोळी हमाम,विम किंवा गळणे-टीकणे याविषयी लेखन करण्यास कोणत्याही प्रकारची बंदी असल्याची सुचना न आढळल्याने प्रतिसादीत केले आहे. तशी काही बंदी असल्यास हे लेखन उडवल्या (सौजन्य खरडफळा स्वागत मजकूर) गेल्यास आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
प
प्रभो Wed, 11/04/2009 - 08:52 नवीन
२. विम बार ची मराठीतली जाहितात : एका भांड्यात ऑर्डिनरी साबण ठेवलेला असतो न एका भांड्या विम बार ... मग बॅकग्राऊंड मधुन एक माणूस लै भारी टोन मधे गातो ... "गळेल ... की टिकेल ?..... गळेल .. की टिकेल ? ... गळेल.. गळेल... गळेल.... टिकेल.. टिकेल .. टीकेल.... " (हॅतला एकही शब्द माझा नाही बरं ... Smile ) नविन बिम बार ला आहे प्लास्टिक कोट .. जो साबणाची झिज होऊ देत नाही .. ब्लाह् ब्लाह् ब्लाह् ही जाहिरात प्रथम पाहिल्यावर मी अल्मोस्ट कॉमात जायचा बाकी होतो !! बहुदा दुसर्‍याच कुठल्या प्रॉडक्ट साठी बनवली असावी ... पण त्यांनी पुर्ण पेमेंट न केल्याने जाहिरात कंपनीने विम ला विकली असावी असा माझा संशय आहे !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शक्तिमान Wed, 11/04/2009 - 15:47 नवीन
=)) =)) =)) =)) हुह.., खतरनाक बुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
अ
अमोल केळकर Wed, 11/04/2009 - 08:56 नवीन
:D :D -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
झ
झकासराव Wed, 11/04/2009 - 12:55 नवीन
=)) =)) =)) =)) =)) फाइव्ह स्टार हलकट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
झ
झकासराव Wed, 11/04/2009 - 12:57 नवीन
=)) =)) =)) =)) =)) फाइव्ह स्टार हलकट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अश्विनीका Fri, 11/06/2009 - 21:09 नवीन
निगेटिव्ह अ‍ॅड्व्हर्टायजिंग पण बर्‍याचदा प्रॉडक्ट च्या दृष्टीने फायदेशीर असते. एखादा प्रॉडक्ट जसा त्याच्या चांगल्या जाहिरातीमुळे लक्षात रहातो तसाच एखाद्या प्रॉडक्ट चे नाव हास्यास्पद/ टुकार जाहिरातीमुळे लोकांच्या लक्षात रहाते.- अश्विनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चिरोटा Wed, 11/04/2009 - 06:59 नवीन
मोगल बादशहा हमाम वापरत असा बर्‍याच लोकांचा गैरसमज असेल्.तो पुसुन टाकण्यासाठी ही अशी जाहिरात कदाचित. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 11/06/2009 - 17:17 नवीन
उर्दूत स्नानगृहाला हमामखानाच म्हणतात! किती चपलख नाव दिलंय साबणाला! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
व
विजुभाऊ Wed, 11/04/2009 - 07:34 नवीन
ती झैरात कोण्या दिल्लीकर भय्याने केली असावी. सी बी एस ई च्या सिलॅबस मध्ये मराठ्यांच्या इतिहासासाठी केवळ ४ पाने खर्ची घातली आहेत त्या दिल्लीकरानी. ही तर केवळ एका ओळीची झैरात आहे. जेते इतिहास लिहितात आणि थोर म्हणवले जातात . इथे तर उरफाटीच रीत आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/04/2009 - 07:40 नवीन
आंबोळी शेठ हाच विचार माझ्या देखील मनात आला होता...पण काय आहे या आपल्या हिंदूस्थानात हिंदू लोकचं मूग गिळुन बसतात त्याला जाहिरात वाले तरी काय करणार !!! साबणात चंदन असो वा तुळस कोण संशोधन करायला जातं का ? नाही ना,तसचं हे देखील. त्यांच्यापेक्षा अनंत पटीने उपकार केलेल्या अनेक ३ पिढ्या भारतीय इतिहासात उपल्ब्ध असताना या तिघांचीच नावे घ्यायचे काय कारण? ह्म्म...असा प्रश्न किती जणांना पडतो? ज्या अर्थी अशा जाहिराती चालतात...त्या अर्थी त्यांची संख्या कमीच दिसते. तुमच्या टाळक्यातरी आला याचा फार आनंद झाला. बाबरालाच असे काय सोने लागलय? जे होतं ते देखील या मंडळींनी ओरबाडुन नेलं...तेव्हा सोने काय आणि प्लाटिनम काय. कोणीही यावं आणि राज्य करुन जावं...इतकं सोपं आहे ते...मग घोरी असो वा बाबर... ज्या लोकांची मानसिकता गुलामीची झाली आहे ते विरोध तरी कशाचा करणार ? बैटन रॅली मधे संस्कृत श्लोक म्हंटले जातात आणि आपल्या शाळेत mary had a little lamb शिकवले जाते...पहा कोण कोणाच कायं घेत आहे ते. थोडक्यात:--- सिमी वाले सुटतात आणि सनातनवाले गोवले जातात का ? याही प्रश्नाचा विचार केला आणि जर त्याचे उत्तर मिळाले तर बहुधा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल. अवांतर :--- बैटन रॅली मधील संस्कृत श्लोकाचा इडियो कोणाला मिळाला तर जरुर सांगा. मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी Wed, 11/04/2009 - 08:16 नवीन
काही नाही हो.... त्यच काय आहे की शहाजी-शिवाजी-संभाजी ही नाव सगळ्यांना तोंड्पाठ आहेत.:) त्यो कोण बाबर का हुमायू त्यो मेला लक्षातच राहात नाही. त्यामुळे हे बरं, मुलांचा आपसूक अभ्यास होतोय तर काय वाईट ?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/04/2009 - 08:34 नवीन
मुलांचा आपसूक अभ्यास होतोय तर काय वाईट ? +१ चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेहमी आनंदी
ह
हर्षद आनंदी Wed, 11/04/2009 - 09:36 नवीन
मरु देत हो.. बाझवला त्या पिअर्सच्या !!! जाऊ दे ना... मस्त साबण लावा स्वच्छ रहा आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 11/04/2009 - 09:38 नवीन
शिवाजी संभाजी साबणाच्या जाहीरातीत नाही हेच बरे! - टिंग्या
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/04/2009 - 09:43 नवीन
सहज यक विचार आला .. जर तात्यानं साबण काढला (म्हणजे साबण कंपणी काढली) तर तात्या साबणाची जाहिरात कशी करेल ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 11/04/2009 - 09:45 नवीन
लावायचा तर लावा नायतर चालु पडा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
N
Nile Wed, 11/04/2009 - 09:46 नवीन
ही आमची फलाना फलाना, हीचा आमच्या साबणावर भारी जीव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Wed, 11/04/2009 - 09:52 नवीन
बरा 'ब' चा 'मा' नाय केलास ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आंबोळी Wed, 11/04/2009 - 10:31 नवीन
टार्‍या... _/\_ तात्याच्या साबणाच्या कंपणीचे घोष (धोशा सुधा चालेल) वाक्य "वापरेन वापरे आणि एके दिवशी फेस करून टाकेन" जाहिरात म्हणशील तर टेलेमॉल सारखे टिव्ही वर रोज वेगवेगळ्या विशिष्ठ सेवा पुरवणार्‍या स्त्रीया त्यांच्या पाठीचा अनुभव कथन करतील. साबणाच्या कव्हरवरही रोज "आजची पाठाडी" असेल. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ Wed, 11/04/2009 - 12:38 नवीन
साबणाच्या कव्हरवरही रोज "आजची पाठाडी" असेल. चुकतोस रे आंबोळ्या . पाठाडी नाय आजची पाठ. अवांतरः आमचे एक मास्तर 'पुढचे पाठ मागचे सपाट" असे का म्हणत असतील बरे ;) मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/04/2009 - 16:23 नवीन
जर तात्यानं साबण काढला (म्हणजे साबण कंपणी काढली) तर तात्या साबणाची जाहिरात कशी करेल ?>>> हा आमचा साबण ,जसा आहे तसा आहे ,ज्यांना पटत नाही त्यांना आम्ही फाट्यावर मारतो... आमच्या आवडत्या स्त्रीला आवडणारा आवडता साबण.. आणी खाली सही असेल .. आपलाच, तात्या आमच्याच साबणाचा फॅन किंवा मित्र.. @आंबोळी :: ते कंदील वाचुन झाल्यावर, मी जरा घाबरतच घागा उघडला बघतो तर ..जाहीरातीविषयी... जाहीरातींची पातळी सध्या हीन दर्जाची झाली आहे...एकवेळ होता...ढुंढते रह जाओगे म्हणायचा..त्यात ती आसावरी बोट फिरवायची ते बघायला मजा यायची !!! सू हा स...
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/04/2009 - 16:24 नवीन
प्रसादटाका
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/04/2009 - 16:25 नवीन
प्रसादटाका
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 11/04/2009 - 17:51 नवीन
बाबर म्हणजे सरोजनि बाबर तर नाहि ना?????????
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Fri, 11/06/2009 - 17:00 नवीन
प्रश्न बाबर, हुमायुं, अकबर"यांचा नाही .आनंददायी शिक्षण ही आजची गरज बनली आहे.मुलांना हसत खेळत शिकवले जावे हा उद्देश. या जाहिरातीत आई आपल्या लहान मुलिला स्नान घालता घालता इतिहास विषय शिकवते.इतकेच यातुन शिकु. यातुन बाबरला कुणीही मोठे करत नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/06/2009 - 17:05 नवीन
पण बाबरच का ? हिंदू चे राजे या देशात जन्माला आलेच नाहीत का? त्यांचा इतिहास शिकवायला यांना का जमत नाही? मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनिल पाटकर
ध
धमाल मुलगा Fri, 11/06/2009 - 17:07 नवीन
काय हे? मदन्या, लेका अश्यानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील बरं का! असं बोलु नये! जा बरं, दिल्लीकडं गुढगे टेकुन सजदे कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 11/06/2009 - 17:11 नवीन
लेका अश्यानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील बरं का ! हा.हाहा..अगदी योग्य बोललास रे मित्रा...त्यांच्या भावनांची यांनाच जास्त काळजी आणि आपल्या भावना मात्र शून्य !!! मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अडाणि Fri, 11/06/2009 - 22:30 नवीन
आज काल कश्याने कुणाच्या भावना दुखावतील याचा नेम नाही ;) हिच जाहिरात हिंदु राजे / महाराज ह्याच्या नावाने काढली असती तर महाराजांच्या नावे कैवार घेतलेल्यांच्या पोटात दुखले असते. फालतू साबणाच्या जाहिरातीत राजेंचे नाव घेवून त्यांचा अपमान केला अशीही ओरड चालू झाली असती, कुणी सांगावे... (|: - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 11/06/2009 - 22:32 नवीन
श्री अडाणी, तुम्ही मांडलेली शक्यता खरी ठरू शकली असती. संवेदनशीलतेचा अतिरेक सर्व धर्मात वाढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
न
नाटक्या Fri, 11/06/2009 - 20:08 नवीन
भारत सरकार सोडा हो आपले मायबाप मिपा संपादकिय पण हेच करताना दिसतात. हा धागा बघा.. आधीचे शिर्षक "डोकेफिरु मुसलमान सैनिकाचा धिंगाणा" बदलून आता काय केले "डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)". भावना दुखावतात ना बाप्पा!! - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 11/06/2009 - 20:14 नवीन
श्री नाटक्या, येथे मिपाचा आणि संपादकांचा काय संबंध? तात्यांनी अफजलखानवधाचा फोटो लावल्याचे तुम्ही पाहीले नाही काय? मिपावर आरोप करतांना इतिहास समोर ठेवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
न
नाटक्या Fri, 11/06/2009 - 20:19 नवीन
पण मग मुसलमान हा शब्द गाळण्याचे प्रयोजन????? - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 11/06/2009 - 20:26 नवीन
श्री नाटक्या, कारण संपादकांना विचारावे. मला वाटते त्यांची भुमिका अशी असावी: ज्या व्यक्तिने हा गोळीबार केला, ती व्यक्ति मुस्लीम धर्माची आहे पण त्या व्यक्तिचा धर्म अधोरेखित करण्याची आवश्यकता नसावी. त्याचा माथेफिरुपणा हे या घटनेस जबाबदार आहे, त्याचे मुस्लिम असणे हे नव्हे. उद्या मालेगाव बाँबस्फोटात हात असलेल्या पुरोहीतांमुळे कोणी 'माजी हिंदु सैनिकाचे दुष्कृत्य' असे म्हटल्यास (वास्तवात जरी पुरोहीत हिंदू असले तरी) विपर्यस्त ठरेल. संपादकांचा निर्णय कौतुकास्पद आहे असे मला वाटते. त्या लेखातील काही वाक्ये खटकणारी आहेत ती संपादीत केल्यास मिपाविषयी वाटणारा अभिमान वृद्धिंगत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
N
Nile Fri, 11/06/2009 - 20:32 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/09/2009 - 05:10 नवीन
सहमत आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/09/2009 - 05:10 नवीन
सहमत आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
प
पक्या Fri, 11/06/2009 - 20:37 नवीन
पण तो सैनिक मुसलमानच आहे ना. मुसलमानाला मुसलमान म्हटले तर काय बिघडले त्यात? जिथे जिथे न्यूज वाचली तिथे तर हसन चा मुस्लीम म्हणून उल्लेख आलेला आहे. संपादकाने शीर्षकाला कात्री लावली असेल तर संपादकाचे चूकलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
म
मदनबाण Sun, 11/08/2009 - 14:04 नवीन
.आनंददायी शिक्षण ही आजची गरज बनली आहे.मुलांना हसत खेळत शिकवले जावे हा उद्देश. अशा जाहिरातीतुन काय शिकायला मिळते ते पहा... http://www.youtube.com/watch?v=8kCDY2oOAWs शिकण्यासाठी आपल्या संस्कृतीत बरेच काही आहे... तेव्हा बाबर नकोच !!! मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2009 - 06:00 नवीन
शिवाजीराजांबद्दल शिकावं लागत नाही, गोष्टी आपोआप लक्षात रहात असाव्यात! परकीय आक्रमकांबद्दल शिकवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात असं लॉजिक तर नसेल ना? अदिती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा