पेशव्यांचा काव्यफुफाटा पाहून आजकाल माझी मळमळ फार वाढली आहे. त्यामुळे पेशव्याने विडंबन केलं की आपणही एक पाडलंच पाहिजे असं काहीसं वाटतं. तर हे पहा:
तू उठलास, आज पाऊसही नाही
अंगास पाण्याचा स्पर्शही नाही
विचारात होते शुचितेसाठी अंमळ मी
ठेवणीतला साबण जागेवर नाही
अंगास दर्प जरूर असे स्वच्छतेची
दूर पळती सर्व पास कोणी नाही
खास ब्रश अजूनी स्नानगृहात आहे
पण नळात पुन्हा जीवनच नाही
सांग मजला खाज सुटता काय करशी तू
पाणी नसता खाजेशिवाय हाती काही नाही
* होस्टेलमधल्या एका गलिच्छ "इनमेट"ला अर्पण
अवांतरः पेशवे ... चालू द्यात ..
अदिती
अदिती विडंबन नेहेमीप्रमाणेच छान.
बा द वे (झ लिहीलेला नाहीये हां) हा परा सुद्धा अंमळ वेड*वा आहे. आम्ही पचापच थुंकत नाही. आणि थुंकतो का नाही याचे उत्तर देणे अथवा तद्जन्य पुरावे देण्यास आम्ही कोणत्याही प्रकारे बांधील नाही. म्हणजे पुरावे नाहीत असे नाही पण ते आम्ही कोणाला द्यायचे हे आम्ही ठरवू. पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच. पण त्याबद्द्ल कोणताही पुरावा त्याना द्यायला आम्ही बांधील नाही. असो.
-पामटॉपवरील टचकुमार
धन्यवाद पेशवे. खरंतर मला अशा कविता लिहायला नेहेमीच आवडतं, पण मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं.
कदाचित विडंबन, पान, थुंकणं, साबण यात मिपाकरांना रस नसेल किंवा त्यांना विडंबनाची शैली आवडत नसेल किंवा आणखीही कांहीं अज्ञात कारण असेल. पण > १५० वेळा वाचूनही कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या लेखनावरून, अनुभवावरून विडंबनात कांही सुधारणा सुचवावी, चुका काढाव्या किंवा लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या अनुभवाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विडंबनन करावे असे वाटत नाहीं असे दिसते.
असो.
अदिती
------------------------
करून करून भागला आणि देवपूजेला लागला! (देवपूजा != देवीपूजा)
पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच.
संदर्भाशिवाय असे विधान करणे चुक आहे. आधी संदर्भ द्या. नाहीतर विधान मागे घ्या.
आंबोळी
हुडकत होतो चघळायला जरा मी
ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही
--- क्या बात है! अधूनमधून चघळायला म्हणून ठेवणीतल्या पुडीतून ठरलेल्या शब्दरतीबांचे दळण घालणार्या बहुप्रसव सर्जनकारांना उद्देशून तर ही द्विपदी लिहिली गेली नसावी ना?
महाराज...महाराज...
_/\_ कोटी कोटी प्रणाम!
पुपे, बुधवारचा हँगओव्हर अजुनही????
एकदम ढिंच्याक रचना आहे हो!
आणी मुख्य म्हणजे ऊन,वारा,पाऊस, प्रेम इ.इ. सारख्या अर्थशुन्य अश्रुपातकी फुलपाखरी कवितांपेक्षा ही जनसामान्यांच्या रोजच्या जिवनाशी निगडीत अशी वास्तवदर्शी आणी त्राग्याच्या भावगर्भातील भावनांचे रोचक चित्रण करणारी अशी ही कविता वाटली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी