>> प्रसंगी आपल्याच देशातल्या इतरांवर गोळ्या झाडायला भाग पडेल अशा प्रकारची परक्यांच्या सैन्यातच नोकरी का केली असावी?
हे एकच उदाहरण नाही. आझाद हिंद सेना, वा ब फडके अशी अनेक उदाहरणे आहेत.
घासकडवींच्या युक्तिवादात चूक असं काहीच नाही. मात्र बर्याच लोकांना वाटू शकतं कि त्यांच्या चिमटीत 'मंगल पांडे'च कसा आला? हा प्रश्न मात्र सयुक्तिक आहे. अगदी इंद्र, राम, कृष्ण यांना पण धर्मायुद्धात सहभाग घेतल्याचे पातक लागले नसेल काय? उ.प्र.चा विरोध करणारे मनसेवादी मिसळपावकर आणि ते स्वतः अशी एक बहारदार जोडी त्यांना बनवायची असावी. पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे.
भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार, काळ जर खराच असेल तर, आणि आपण त्यापुढे गेला असाल तर, आपण ज्या दिशेने त्याच्यापुढे गेला आहात तिकडे आपण एकटेच गेले असण्याची शक्यता फारच जास्त असते असे मी ऐकले आहे. मी असंही ऐकलं आहे कि बिग बँगच्या त्या 'आपल्या*' विश्वाच्या पार्टीकलामधे मंगल पांडे आणि निदाल शेजारीच बसले होते. तेव्हा म्हणे कोणत्याही धर्माची आणि देशाची स्थापना झाली नव्हती. घासकडवी साहेबही तिथेच चार खुर्च्यांची जागा सोडून त्यांचे बोलणे ऐकत होते. हुप्प्या मात्र पाठमोरा बसलेला. त्यांचा विषय होता -'किती साम्य म्हणजे ओव्हरऑल साम्य?'. विषय रंगला पण निष्कर्श काही निघेना. दोन विद्वान आपल्या चर्चेत तिसर्याला 'खरे कि नाही?', 'काय म्हणता?' असे प्रश्न विचारून मान हलवायला लावतात. घासकडवींना चक्क ती भूमिका घ्यायला लागली. तितक्यात तिथे बिग बॅंगेच्या पार्टीकलाचा चालक आला आणि म्हणाला, "आपापले बेल्ट बांधा. आपल्यापैकी काहीजण मॅटर, काहीजण डार्क मॅटर, अँटीमॅटर, इ इ बनणार आहेत. सावधान." तो केबिनमधे परत गेल्यावर पार्टीकलाची शकले झाली आणि कितीतरी 'जण' irretrievably (कि कसे) दूर गेले. अगदी त्या नाजूक काळी पण घासकडवी काळाच्या थोडे पुढेच होते. त्यांना अचानक साक्षात्कार झाला. "श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:" असा ग्रंथ सुचला म्हणे! 'माता, गौ, त्यांचे दूध आणि त्यांची तुलनात्मक उपयुक्तता (दूधांची नव्हे)' हा त्यातील पहिला चरण म्हणे.
* मी असे ऐकले आहे कि आपले जसे एक विश्व आहे तशी कितीतरी विश्वे या जगात उ़कळत्या पाण्याच्या भांड्यातून बुडबुडे निघावेत तसे निघतात. पण ते भांडे, त्याचा स्टोव्ह, किचन जिथे आहे ते विश्वही कोण्याना कोण्या बिग बँगेपासून आले असावे. म्हणून साम्य वैषम्य यांवर भाष्य करतात वरचा संदर्भ ग्रंथच वापरावा.
** सबब प्रतिसाद विनोदी बनण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपले सर्व ज्ञान अगोदर मांडून नंतर असहमती दाखवणे योग्य नाही. आपण केव्हा सहमती दाखवणार आहोत हे अगोदर सांगून मग त्यादिशेने आपापले मुद्दे मांडावेत.
*** समाजाची आदरस्थाने कशी परिक्षावी? त्यांना कुणाशी तोलावे? याची एक मर्यादा असते. दांडीयात्रेत महात्मा गांधींनी 'आयोडीन' नसलेले मीठ उचलले म्हणून त्यांना झाप झाप झापणे अप्रस्तुत आहे. सबब प्रतिसादाचा उद्देश 'बाब्या आणि कार्टं' मधील फरकांचे निकष आणि निकषांची मात्रा जाणणे असा तात्विक आणि तांत्रिक आहे. घासकडवींचे युक्तिवाद मला आवडतात पण त्यांनी इथे जो युक्तिवाद मांडला आहे त्याने माझी थेट आणि अप्रत्यक्ष सारीच आदरस्थाने पुसली आहेत.
पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे
ते एकटे नाहीत त्यांना काळाच्या पुढे असणार्या (प्रकाशाकणांपेक्षा वेगाने धावणार्या) देवतांचा आशीर्वाद आहे. असा अंदाज आहे.
माझ्या प्रतिसादात मी तसे व्हायला चान्स सोडलेला नाही. संपूर्ण ब्रह्मांड संपूर्णतः एकजीव असतानाची पार्श्वभूमी आहे. सबब वेळी प्रकाशाचा जन्म झालाच नव्हता. अशी पुरोगामी दृष्टी अशावेळीच प्राप्त होऊ शकते.
बाय द वे आपण उपरोल्लिखित 'श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:' ग्रंथातील श्रीमती इदिरा गांधी आणि मोहम्मद गझनी यांची तुलनात्मक अभ्यास वाचला आहे काय? याच अध्यायात श्री लालकृष्ण आडवाणी, औरंगजेब आणि पुनर्बांधणीसाठी घर पाडणारा माझा दिल्लीतला शेजारी यांचेही रोचक साम्य वर्णिले आहे. अगदी घरातल्या दिमकाचे वारुळ पाडताना सामान्य माणसाला थरथरे कापावे इतक्या प्रभावीपणे सबब साम्य वर्णिले आहे.
आशुजी,
मी ही काही कोणी दिग्गज लागून गेलो नाही. मला देखिल आजकालच्या प्रतिगाम्यांसारख्या बौद्धिक आणि वैचारिक मर्यादा आहेत. आता हेच पाहा ना, बिग बँगेच्या पार्टीकलातली ती घटना जेव्हा मी कळून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती कशी कळून घ्यावी आणि कशी मांडावी हेच कळेना. वास्तविक भौतिकशास्त्रात शिकवलेल्या काळाच्याही जन्माअगोदर (जसा प्रकाशाचा जन्म चर्चिला आहे) सबब लोक काळाच्या पुढे होते. आता हे कसे ते चमकेना. म्हणून माझ्या विषयाच्या आकलनाच्या मर्यादा आणि मांडणीच्या मर्यादा सबब वर्णनात चिकार आहेत.
मंगल पांडे : ह्याच्या धर्मभावना दुखावणारे, त्याला त्या गाईच्या चरबीत बुडलेल्या गोळ्या तोंडाने तोडायचे आदेश देणारे त्या सैनिकी तळावरचे अधिकारीच होते. त्यामुळे तो राग मंगल पांडेने त्या अधिकार्यांवर थेट व्यक्त केला तर समजण्यासारखे आहे.
हसन निसारः त्या टेक्ससमधी फोर्ट हूडमधील किती लोकांनी अमेरिकेच्या युद्ध घोषित करण्याच्या निर्णयात भाग घेतला? शून्य. राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री, सुरक्षा सल्लागार, सेनापती असा कुठलाही उच्चपदस्थ त्या सैनिकी तळावर उपस्थित नव्हता. अमेरिकेने मुस्लिम देशांविरुद्ध घोषित केलेले युद्ध हा असंतोषाचा विषय असता तर अशा लोकांवर हल्ला करून आपला राग व्यक्त करणे एक समजू शकतो. पण कुठल्याही अमेरिकनाला त्याकरता मारणे कशाबद्दल?
पण त्या चरबी प्रकारावरुन हिंदु मुस्लिमानी भांडायचं कशाला? गोळ्या आपापसात बदलल्या असत्या तर चालणार नव्हते का? म्हणजे हिंदुना डुकराची चरबी, आणि त्याना गाईची चरबीची गोळी... म्हणजे भांडणाचे कारणच नव्हते नै का? उगाचच उठाव बिठाव कशाला?
इंग्रजानी देश गिळला, मुघलानी गिळला वगैरे इतिहास रोजच काही लोक कोलकत असतात. पण मुघलानी पराक्रम करुन देश मिळवला.
आणि इंग्रजानी व्यापारी मार्गाने. बहुतांश संस्थानिकानी इंग्रजांकडून कवायती सैन्य आउटसोर्स केले होते. त्याच्या मोबदल्यात इंग्रजाना क्याश, कर वसुली किंवा संस्थानिकाकडून कर्जवसुली असे अधिकार मिळालेले होते. खुद्द झाशी संस्थानचीही अवस्था तीच होती.
काही कारणानी बोलं तटली, तर इंग्रजाना ते प्रदेश करारानुसार ताब्यात मिळाले.
मग सगळा प्रांत गेल्यावर आता तसेही भुकेनं मरणारच होते, ते लागले पराक्रम करायला.
एकंदर, कर्ज बुडवण्याची भारताला मोठी परंपरा आहे.
पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहेते एकटे नाहीत त्यांना काळाच्या पुढे असणार्या (प्रकाशाकणांपेक्षा वेगाने धावणार्या) देवतांचा आशीर्वाद आहे. असा अंदाज आहे.