मलईदार खाती : यथामति उहापोह
💬 प्रतिसाद
(6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/09/2009 - 11:24
नवीन
मास्तर ! मलई कुठे आहे ? [फोटो तर दिसत नाही] 'मलई' एक प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच वेळ गेलेला असतो. तेव्हा त्याचा आस्वाद आपला जन्मसिद्ध हक्क आहे, यासाठी रांगा लावणे यात काही गैर नाही. ;)
चर्चाप्रस्ताव भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण आहे असे वाटत नाही. समाजाला मलईदार विषयाकडे नेण्याचा चर्चाप्रस्तावकाचा उद्देश डोळस आहे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 11/09/2009 - 15:51
नवीन
मलईच्या खात्यात अजून एक बिनमलईचे खाते टाकले तर योग्य ठरेल. मलईचे खाते = कुटुंबकल्याण असे वाटते.
आणि काही फार फरक पडत नसावा असा अंदाज आहे. दोनेक कोटी कमी मिळतील. ते नंतर व्याजासकट वसूल करता येतात कसेही.;)
रेवती
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 11/09/2009 - 19:20
नवीन
ही राज्यस्तरावरची मलई मिळण्याची दुकाने. केंद्रिय स्तरावरची मलई मिळण्याची मुख्य दुकाने-पेट्रोलियम,गृह्,रेल्वे,परराष्ट्र,वाणिज्य्,टेलिकॉम्.खावून पोट फुटेल,मधुमेह होईल पण मलई संपत नाही ईकडे.कोळसा,खाण्,कामगार्,मनुष्यबळ,शेती खात्यात खास मलई मिळत नसावी.'बिचार्या' आमदारालाही मलई मिळते पण लिमिटेड.त्यासाठी मतदारसंघावर नीट लक्ष ठेवावे लागते.रस्ते बांधणी,लहान मोठे दुकानदार्,पब्स्,मदिरा केंद्रे ह्यावर बारीक नजर ठेवली की मलई मिळायला अडचण येवू नये.
अवांतर- कर्नाटकात हल्ली मलई खाण्यावरुन एवढी जुंपली की विचारता सोय नाही. एक गट हट्ट धरुन बसला की काहीनी खूप मलई खाल्ली आहे आता आम्हाला चान्स द्या.शेवटी दिल्लीहून मोठे गवळी ताजे दूध घेवून आले आणि मग तडजोड काढून प्रश्न सुटला.
भेंडी
P = NP
- Log in or register to post comments
क
कुंदन
Tue, 11/10/2009 - 08:19
नवीन
सहमत.
तरीच कृषीमंत्र्यांना मलई साठी क्रिकेटचा टेकु घ्यावा लागतो वाटते.
- Log in or register to post comments
न
नर्मदेत ला गोटा
Tue, 11/10/2009 - 06:35
नवीन
मलई आणि बिनमलई हे जरा मिस्टेक वटते.
मलई आणि कमीमलई असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
मलई सगळि कडेच आहे. कुठे कमी कुठे जास्त .
गाईच्या आणि म्हशीच्या दुधा सरखे. गाईच्या दुधावर मलई कमी येते :) .
केंद्रिय स्तरावरची मलई मिळण्याची मुख्य दुकाने-( अजुन ) डीफेन्स & कृष्ई.
- Log in or register to post comments
स
सुहास
Tue, 11/10/2009 - 07:26
नवीन
नगरविकास खाते मुंबैकरांसाठी महत्त्वाचे आहे आणि प्रचंड मलई मिळते.. बहुतेक मुख्यमंत्री ते खाते आपल्या कडेच ठेवतात..
--सुहास
- Log in or register to post comments