पाककृती

पनीर माखनवाला

Primary tabs

साहित्य : १/२ कि. पनीर , १/२ कि. कांदा , आलं पेस्ट , लसूण पेस्ट , हळद , लाल तिखट , काजू पेस्ट ( १ वाटी ) , तेल , तूप , मावा , साखर , मीठ , टमाटू प्युरी १/२ वाटी , लवंग , काळी मिरी , दालचिनी , तमालपत्र , मासाला वेलची .
खायचा रंग ( लाल ) , कोथिंबीर.

कृती :
प्रथम कांदा लांबडा चिरून घ्यावा , पनीरचे बारीक तुकडे करावे .
कढईमधे थोडं तेल गरम करून त्यात लवंग , काळी मिरी , दालचिनी , तमालपत्र , मासाला वेलची घालून तडतडू लागलं की त्यात चिरलेला कांदा घालून तो लाल होइपर्यंत परतून घ्यावा , हा कांदा गार करून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावा.
आता दुस-या पातेल्यात तेल व तूप एकत्र करून ते तापल्यावर त्यात वाटलेला कांदा घालून परतावा
( कांद्याचे पाणी जावून तो बाहेर उडायला लागतो ) हे वाटण चांगले परतल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालून ती नीट शिजेपर्यंत अजून परतत रहावे. नंतर त्यात काजूची पेस्ट घालून किमान १५ मि. ती पेस्ट परतली जायला हवी . नाही तर नंतर ती कच्ची रहिल्याचा वास येतो.काजू पेस्ट चांगली शिजल्यावर त्यात टमाटू प्युरी घालून मिश्रण एकजीव होइपर्यंत ढवळावे. अगदी थोडी हळद व लाल तिखट घालून ( तिखटही कमीच घालावे कारण हा पदार्थ गोड असतो ) ढवळत रहावे.
थोडा रंग घालून एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे साखर व १/२ वाटी मावा घालून मावा विरघळेपर्यंत ढवळत रहावे.
सर्वात शेवटी कच्चा पनीर घालून तो शिजला की कोथिंबीरीने सजवून पोळी , पराठा , नान इ. बरोबर गरम सर्व करावे.

टारझन

व्व्वा !!! संतोष राव .. "हे आमचं पनीर माखनवाला .. ह्याच्यावर आमचा भारी जीव" ...
खल्लास आयटम आहे हा :) त्यात आपल्या हातची चव अप्रतिम आहे हे ठाणे कट्ट्यात कळलं होत .. :) लाजवाब !!

अवांतर : नाव वाचून दोन सेकंद दुनियादारी मधली "मिनु मकवाना " आठवली होती :)

- श्रीयुत टारझन चापेकर

सहज

डीष भारी हो जोशीबुवा. पण सध्याचा रागरंग पाहता तुम्ही अस्सल मराठमोळ्या पाककृती द्या हो. ते एकदा खाल्ल्यावर बराच काळ अंगावर ठाणं मांडून बसणारी "नॉर्थ इंडीयन" डीश नको. ;-)

अमोल केळकर

मस्त पा़कृ जोशी साहेब
धन्यवाद

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अवलिया

8> हीही
गणु

बाकरवडी

:D खुखु
बाक्रु

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

गणपा

जोशीबुवा, मस्त हो.
लेकीची आवडती डिश. :)
तंदुरी रोटीची पण कृती द्यान राव.

समंजस

मला आवडणार्‍या पदार्थाची कृती दिल्याबद्दल धन्यवाद श्रीयुतराव.

jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रभो

सुंदर......भूक लागली सकाळ सकाळ..

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!