पाककृती
मैत्रीचे लोणचे
Primary tabs
आजचा मेन्यु खुप खास आहे सगळ्यांसाठी....खास आजच्या दिवसाकरीता की जो आयुष्यभर पुरेल....
साहित्य : प्रेम, दुःख, आनंद, सत्य, विश्वास, मदत, गुप्तता
कृती : खुप सारे प्रेम द्या व घ्या....
आपले दुःख शेअर करा दुसर्याचे शेअर करुन घ्या....
जीवनात खुप आनंद आहे...तो आनंद मिळवा इतरांना पण आनंद द्या....
सत्याचीच कास धरा...कधिही असत्याचा पाठपुरावा कधीच करु नका....
विश्वास ही आयुष्यातील फ़ार महत्वाची गोष्ट आहे...विश्वास ठेवा....
नेहमीच सगळ्याना मदत करा....मदतीचा हात कायम पुढे ठेवलात तर तुम्हाला हवी तेव्हा मदत मिळु शकते
गुप्तता ही तर महत्वाची आहेच...कोणी तुम्हाला स्वताबद्दल काही शेअर केले असेल तर ते मनातच ठेवा
तर या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की बघा कसे मैत्रीचे मस्त लोणचे होते ते...आणि हे लोणचे मुरेल तेवढे जास्त रुचकर
लागते......यात अधुन मधुन भांडणाची फ़ोडणी दिली तरी चालेल पण ती वर वरच ठेवा...लुटुपुटीचे भांडण केले तरी
चालेल त्याने चव छान येयील पण जास्त फ़ोडणी झाली तर मात्र लोणच्याची वाट लागेल बर का...
टीप :- याचा मात्र फ़ोटो देता येत नाही बरं का.............
बकवास ! फालतु !
लोणचं मुरायला मीठ लागतच !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
आ रा रा रा रा रा रा रा
पहिलाच प्रतिसाद तो पण इतका स्पष्टवक्ता.... =))
ते मीठ खारे नव्हते!
+१
नुसतेच उपदेशाचे डोस ................
:(
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
श्रद्धा, सुरेख पाककृती. मला आवडली.
प्रिया
मागं एकदा या "बाकरवडी" न खेट्रान स्वागत केल्त एकाच
हिथली गी-हाईकच हायथी महा **ची.
मनावर नगा घेउ त्याच वागनं खरं सांगु का? कशी बी आसली तरी "फणस" बघा आतन मऊशार. तुमी आपल लीवा हायगय करु नका. आस्ते आस्ते अंगवळणी पडल त्यांच बोलन,वागन
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आहाहा पर्फेक्ट बोललात बघा.
खरचं मिपाकर फणसासारखे आतून मउ आणि गोड आहेत,
मी आपली गंमत केली ओ, अशी पद्ध्तच आहे मिपाची !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
नविन मनसाला ठसका लगतुय त्याच काय?


धसका घेतला अन याच बंद झालं तर? गि-हाईक तुटल की राव.
*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयपालशी १०१% सहमत! :)
आपण नेटानं लिहायचं...बिंधास्त, सगळे आपले दोस्तच हैत! टेंशन नाय घ्यायचं, आपोआप दोस्ती होउन जाइल :)
मैत्रीचं लोणचं चांगलंय, पण जरा मुरु द्या, मग एकदम झक्कास लागेल बघा :)
.
समजा जास्तीची फोडनी बस्ली. त्यातुन बी नवीन पदार्त तर्यार व्हतोय . काही लोकान्ला त्यो बोचतोय. त्येला नाव द्या शैत्रीचे बोणचे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
.
समजा जास्तीची फोडनी बस्ली. त्यातुन बी नवीन पदार्त तर्यार व्हतोय . काही लोकान्ला त्यो बोचतोय. त्येला नाव द्या शैत्रीचे बोणचे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
ऐला, मैत्रीचंच लोणचं घातलं ... चालू द्यात!
अदिती
आपण मैत्रीचे लोणचे घातलेत !! नान्यानी आपलेच लोणचे घातले आणी बाकी प्रतिसादांनी धाग्याचेच लोणचे घातले ..
असो ...लिहित रहा ..हळुहळु माझ्यासारख फालतु लिहायला शिकालच !!
सू हा स...
फोटो नसलेल्या पाककृतींवर आम्ही प्रतिसाद देत नाही!
सम्पादक झोपले आहेत की काय?
'पाकक्रुती' मध्ये हा लेख काय करतोय?
हे जिन्नस आजकाल फार दुर्मिळ झाले आहेत. कुठे मिळतात त्याचा पत्ता पण द्या.
विश्वास पानिपतावर मेला
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..