Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........

प
प्रशु
गुरुवार, 11/19/2009 - 17:20
🗣 17 प्रतिसाद
  • धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........ २
  • धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........ ३

Book traversal links for धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........

  • धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........ २ ›

प्रतिक्रिया द्या
9426 वाचन

💬 प्रतिसाद (17)
न
नि३ गुरुवार, 11/19/2009 - 17:24 नवीन
वाचतोय..... ---नि३.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 11/19/2009 - 17:28 नवीन
छायाचित्रांमधे नवीन काहीच नसले तरी अस्वस्थता आली..
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/19/2009 - 17:32 नवीन
वाचून खेद झाला. आश्चर्य वाटले नाही. एकूण परिस्थिती बदललेली नाही इतकेच दिसले.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/19/2009 - 17:37 नवीन
वाचतो आहे. आपली तीर्थ क्षेत्रे गचाळ व घाणेरडी असतात याचे फार दु़:ख होते. तिथे गेल्यावर मन कसं प्रसन्न झाले पाहिजे. मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 11/19/2009 - 17:39 नवीन
मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्वप्निल.. Fri, 11/20/2009 - 02:34 नवीन
>>मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुनील Fri, 11/20/2009 - 06:30 नवीन
आपली तीर्थ क्षेत्रे गचाळ व घाणेरडी असतात याचे फार दु़:ख होते बहुतांशी सहमत. ह्याला गोव्यातील देवळे हा सुखद अपवाद ठरावा. तिथे देवळातच नव्हे तर, आसपासच्या परिसरातदेखिल बर्‍यापैकी स्वच्छता असते आणि भिकारीही दिसत नाहीत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्वाती२ गुरुवार, 11/19/2009 - 18:21 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 11/19/2009 - 19:30 नवीन
एवढी जुनी आणि प्रसिद्ध मंदिरे असताना त्यांची कोणीच काळजी का घेत नाही? मंदिराच्या आवारात आधी लोकांची रांग बघितली की जावेसेच वाटत नाही.त्यात अस्वच्छता असली की उगाच आलो की काय असे वाटून जाते.प्लास्टिक्,मंदिरात प्रमाणा बाहेर वापरलेल्या ट्युब लाईट्स,स्टीलची भांडी,मोठे स्पीकर्स ,हेकट भटजी हे वातावरण महाराष्ट्रातल्या बर्‍याच मंदीरांमध्ये दिसते. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Fri, 11/20/2009 - 02:21 नवीन
काय बोलावे? हे असेच चालते म्हणुन सोडुन देणार, एक सुस्कारा सोडुन आपल्या मार्गाला लागणार.... 'आम्हाला काय त्याचे?' आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 11/20/2009 - 06:16 नवीन
मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल.>>>>> हम्म. शिरगावातील (पुण्याजवळील प्रतिशिर्डी) साई बाबा मंदिर अस आहे. जरी दर्शन जवळून घ्यायला खुप गर्दी असेल तरी मुख्य मंदिराच्या हॉल मधुन दर्शन होतच. तिथे भिकारी दिसलेच नाहित. बहुतेक भिकारी जमा होउ देतच नसतील. हल्लीच तिकडे प्रचंड श्रीमंत लोकांचे लक्ष गेलय हे मंदीरात लावलेल्या सोन्याच्या पत्र्यावरुन दिसल. (माणिकचंद गुटखावाले रसिकलाल धारीवाल ह्यानी देणगी दिला आहे हा पत्रा) बाहेर फारसे विक्रेते नाहियेत. जे मुख्य दरवाज्याजवळ फक्त दोन दुकान आहेत ती देखील संस्थानाने मान्यता दिलेली असावीत. आत प्रत्येकी एक प्रसादाचे पेढे आणि लाडु विकणारी टपरी आहे ती संस्थानाची असावी. तिथे जवळच संस्थानाने चहा, कॉफी, कोल्ड्रिन्क्स विकत मिळण्याची व्यवस्था केली आहे. बास. ह्याच्या पलिकडे एकही दुकान नाही. त्यामुळे मंदीरातच आल्याचा फील असतो. अजुन तरी तिकडे बाजारिकरण झालेल नाहिये. भविष्यात होणारच नाही ह्याची खात्रीदेखील नाही. गाणगापुरातील फोटो पाहुन वाइट्ट वाटल. तिथले ट्रस्ट हे सगळ मॅनॅज करु शकत. फक्त इच्छाशक्ती हवी.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 11/20/2009 - 11:30 नवीन
गम्मत म्हणजे...मला अजूनही अभिषेकाचा प्रसाद व अंगारा मिळालेला नाही :)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 11/20/2009 - 11:33 नवीन
आणि हो...जर १०० - १५० रुपये दिले तर पादुकांना हात वगैरे लावायला मिळतो!
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 11:51 नवीन
प्रशु...चांगला विषय घेतलात ..जेजुरीला तर भिक्षेने आणी दक्षिणेने नको-नको होत...तोच अनुभव मोरगाव ला.....कनिफनाथ मात्र खुप आवडल ..त्याचप्रमाणे निळ्कंठेश्वर ही ...उत्तम व्यवस्था आहेत दोन्हीकडे ...कनिफनाथला जेवण मिळत ते एकदम झकास.... झकासराव ..प्रतिशिर्डीला गर्दी नसते म्हणुन तरी सध्या ठीक आहे ...बाकी मंदीराच्या मागे जो मठ(मठ कसला राजवाडाच तो!!) आहे ..तो एका बाबतीत अतिशय गचाळ आहे ...एका बाईला धंदा करताना पाहिले होत तिथे..मित्राने जाऊन रेट वगैरै विचारला होता...रात्रीचे नऊ वाजता..त्यानंतर परत शिरगावला गेला नाही रात्रीचा....घाण !!! एकविराची तर वाट लागली आहे...खाली पायर्‍या सुरु व्हायच्या आधी लोक्स दारु आणतात मटन आणतात ..खातात पितात .नाचतात...वर मंदीरात दर्शन घ्यायला गेल की पुजारी सौता त्या दक्षीणेच्या थाळीकडे हात करुन दाखवितो...एक वेगळ्याच प्रकारची भीक मागतात साले !! पण आश्चर्य वाटले ते " हारावड्याच्या म्हसोबा"ला ..एकदम क्लीन अ‍ॅन्ड नीट देवस्थान ...कोणी ही कोणाला लूटत नाही !!! मी नेहमी जातो..अजुन एकही वाईट अनुभव नाही... सू हा स...
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 11/21/2009 - 16:17 नवीन
शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचा देखील आवर्जून उल्लेख केला पाहिजे. अतिशय उत्तम व चोख व्यवस्था ठेवली आहे. शिवाय सर्व स्वयंसेवक 'हे महाराजंचे काम आहे' या भक्तीभावाने काम करतात! स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
प
प्रसन्न केसकर Fri, 11/20/2009 - 12:25 नवीन
तर्‍हेतर्‍हेचे भिकारी, ओंगळवाणे पुजारी अन हिणकस लोकांनी विटंबलेली तीर्थस्थानं बघितली की जीव अगदी विटुन जातो. देवानंच स्वतः सगळ्यांना वठणीवर लावावी अशी इच्छा होते. पण देवालापण बहुतेक अश्या लोकांतच रमायची सवय झालेली असावी. उचित विषयावर चांगला लेख. मन खिन्न झालं तरी लेख आवडला एव्हढच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 11/22/2009 - 11:30 नवीन
म्हणूनच मला छोट्या खेड्यातली छोटी छोटी देवळं आवडतात.. सक्काळी किंवा निवांत दुपारी जाव.. थंडगार देवळात डोळे मिटून शांत ध्यान करत बसाव.. त्यात जे समाधान आहे ते अशा रांगा लावून धक्का-बुक्की करून घेतलेल्या दर्शनात अजिबात नाही..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा