Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेनेचा 'आयबीएन लोकमत'वर हल्‍ला

म
मड्डम
Fri, 11/20/2009 - 12:19
🗣 63 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
33460 वाचन

💬 प्रतिसाद (63)
म
मड्डम Fri, 11/20/2009 - 12:22 नवीन
पत्रकारितेवरील भ्‍याड हल्‍ल्‍याचा जाहीर निषेध
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 11/20/2009 - 12:25 नवीन
हे हे हे. तुमच्याकडून धागा आणि त्याचा निषेध अपेक्षित होता. पुढच्या वेळेपासून तुमच्या धाग्याला आमचा प्रतिसाद 'प्रटावाना' पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मड्डम
ट
टारझन Fri, 11/20/2009 - 15:30 नवीन
एकदा बिहारी चॅनल्स ची ऑफिसं फोडली पाहिजेत च्यामायला त्यांच्या. .. पार वात आणेपर्यंत खाजवत असतात हल्ली हे न्युज चॅनल वाले !! जर तोडफोड करणे गुण्हा आहे तर चुकीच्या आणि स्वतःच्या फायद्यानुसार न्युज देऊन लोकांना विचारवंत बनवने हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. असो .. कोणाचेही समर्थन नाही किंवा निषेध नाही :) आपला संदिप खरे ची गाणी ऐकत बसतो ..
मी मोर्चा नेला नाही .. मी संप ही केला नाही ... मी निषेध सुद्धा साधा ... कधी नोंदवलेला नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर काळे Sun, 11/22/2009 - 11:33 नवीन
खरा निषेध करायला हवा श्री राजदीप सरदेसाईंचा! सरकारपुढे गार्‍हाणे मांडून बाहेर आल्यावर झालेल्या पत्रकारपरिषदेत हिंदीत बोलल्याबद्दल. राजाभाऊंच्या एकाद्या कार्यकर्त्याने "कानाखाली" वाजविली पाहिजे त्याच्या! चांगला दिलीप सरदेसाईंचा मुलगा पण असा कसा निघाला? ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मड्डम
श
शाहरुख Sun, 11/22/2009 - 16:32 नवीन
महाराष्ट्र मे जो कोई हिंदी बोलेगा उसके कान के निचे आप आवाज निकालते बैठेंगे क्या ? अपने शाहरुख भाई का क्या होगा फिर ?? [ माझे हिंदी चांगले नाही..शिकतोय मी :-) ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 11/22/2009 - 17:02 नवीन
माझा एक मित्र आहे सय्यद . त्याला ऑफिसमधला एक जण (मराठी ) भेटला तो:- क्या कैसे क्या चल रहा है| सय्यदः- मजेत आहे तो:- बहोत दिनसे दिखे नही सय्यदः- गावाला गेलो होतो तो:- चलु क्या जरा जल्दि मे है सय्यद:- ठीक आहे भेटु नंतर सय्यद मला म्हणाला मी त्याच्याशी मराठीत बोलतोय हे त्याच्या लक्षातच येत नव्हत. दोघांच्याही कैक पिढ्या मराठीच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
श
शाहरुख Sun, 11/22/2009 - 17:19 नवीन
आपले मित्र सय्यद कोणी कानफाटात मारेल या भितीने मराठीत बोलतात की मराठीशी जवळीक निर्माण झाल्याने मराठीत बोलतात याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुधीर काळे Sun, 11/22/2009 - 11:39 नवीन
खरा निषेध करायला हवा श्री राजदीप सरदेसाईंचा! सरकारपुढे गार्‍हाणे मांडून बाहेर आल्यावर झालेल्या पत्रकारपरिषदेत हिंदीत बोलल्याबद्दल. राजाभाऊंच्या एकाद्या कार्यकर्त्याने "कानाखाली" वाजविली पाहिजे त्याच्या! चांगला दिलीप सरदेसाईंचा मुलगा पण असा कसा निघाला? ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मड्डम
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 12:46 नवीन
आपले धागे बघुन अमंळ कामधंदा सोडुन टि.व्ही.पुढे बसाव की काय असे वाटाया लागले... नेहेमीप्रमाणे वैचारिक निषेध !!!! बाकी तो एक दिवस मार खाणारच होता !! शिवराज पाटीलही ईतक्या लवकर कपडे बदलत नाहीत जितक्या लवकर निखील वागळे पार्टी बदलतो !!! सू हा स... आम्ही हल्ली ,मोबाईलच्या प्रकाशात, वहीत, वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Fri, 11/20/2009 - 14:24 नवीन
म्हणजे शिवराज पाटील की काय? सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
न
निमीत्त मात्र Fri, 11/20/2009 - 14:35 नवीन
आम्ही कृतीवाले लोक आहोत. डायरेक्ट अ‍ॅक्शण! हे विसरलात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
ब
बाकरवडी Fri, 11/20/2009 - 12:32 नवीन
पुण्यातील कार्यालयावर पण हल्ला झाल्याची बातमी येत आहे निषेध!!!! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/20/2009 - 12:38 नवीन
निषेध...निषेध.....निषेध.....! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 11/20/2009 - 14:55 नवीन
प्राध्यापक साहेबांशी सहमत. या हल्ल्याचा निषेध नोंदवतो. __________________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आण्णा चिंबोरी Sat, 11/21/2009 - 09:39 नवीन
ही बातमी कळली तेव्हा आपोआपच तोंडातून 'हय शाबास' असे उद्गार निघाले. वटवट वागळ्याला सटकवले हे फार चांगले झाले. वागळे, केतकर यासारख्या उंडग्या पत्रकारांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. मराठे, ब्राम्हण असे सगळेच लोक आपल्यालाच का बडवतात याचा थोडा विचार करावा. वागळ्याला निदान पाचव्यांदा सडकून काढले असेल पण याचे शेपूट अजून सरळ झालेले नाही. मराठी माणसाच्या विरोधात मुद्दाम लिहायचे हा याचा एककलमी कार्यक्रम आहे. परवा बाळ ठाकरेने लिहिलेला लेख मी स्वतः वाचला होता. त्यातले वाक्य, 'सचिन म्हणतो मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर मी भारतीयही आहे. आमचेही हेच म्हणणे आहे. आम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान आहे. त्यामुळेच आम्ही जय महाराष्ट्र च्या आधी जय हिंद म्हणतो' असे स्पष्ट लिहिले होते. आता यात भारतीयत्व वि. महाराष्ट्रीयत्व कुठे आले? पण वागळ्याचा सगळा कार्यक्रम हा बाळ ठाकरे भारतीयत्वाच्या विरोधात या मुद्द्यावर होता. अरे किती खोटे बोलणार? खोट्याच्या कपाळी गोटा बसलाच ना शेवटी. बाळ ठाकरेही काही धुतल्या तांदळाचा नाही पण ठाकरेच्या काठीने वागळे नावाच्या सापाला शिक्षा झाली तर त्यात नुकसान नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा Fri, 11/20/2009 - 13:00 नवीन
कंटाळा आला आहे या प्रसारमाध्यमांचा/वृत्तपत्रांचा. निप्पक्ष पत्रकारीता राहीली बाजुला, नुसता बाजार मांडला आहे यांनी. कधी कधी वाटते की या माध्यमांना उगाच नको तितके स्वातंत्य दिले आहे. आपण जे काही दाखवु तेच लोकांनी खर मानव असा अट्टहास असतो चोच्यांचा. एकवेळ गिधाडं परवडली पण याचें टोचे पत्रकार आवरता येत नहीत. मी शिवसेनेचा वा कुठल्याच संघटनेचा/पक्षाचा पुरस्कारकर्ता नाही. पण सध्या मन मनसे कडे झुकु लागलय..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/20/2009 - 13:00 नवीन
निखिल वागळे हे जर नि:पक्षपातीपणाने पत्रकारीता करत असतील तर त्यांच्यावरचा हल्ला हा निंदनीय आहे असे म्हणावे लागेल! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 13:10 नवीन
तात्या ... न्युज कॅन बी मन्युपुलेटेड !! निड टु चेक !! वागळेंच आणी बाळासाहेबांच भांडण जगजाहीर आहे ..उध्दव ठाकरे कसाही असला तरी ईतका मुर्ख नाही की अश्यावेळेस जेव्हा शिवसेनेची भादरल्या गेलीय तेव्हा असे काही करेल .निड टु चेक... आणी वागळे काय लै धुतल्या तांदळाचा नाही !! आय.बी.एन-लोकमत मध्ये शेयर आहे मालकांचा !! त्याची टी.आर.पी. सध्या चांगली आहे !! २००२ मध्ये जया टि.व्ही. वर पण असाच हल्ला झालता , नंतर कळाले की त्यांचीच माणसे होती ...सध्या केस कोर्टात आहे !! सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बाकरवडी Fri, 11/20/2009 - 13:10 नवीन
हॅ हॅ हॅ तटस्थ भूमिका ... :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनामिका Fri, 11/20/2009 - 20:48 नवीन
तात्यांशी सहमत! निखिल वागळे हे जर नि:पक्षपातीपणाने पत्रकारीता करत असतील तर आणि तरच त्यांच्यावरचा हल्ला हा निंदनीय आहे असे म्हणावे लागेल! अवांतर- अबु प्रकरणात मनसेच्या आमदारांनी अबुला कानफटवल्यावर सेनेने काही ठाम भुमिका घेतली नाही अथवा मनसे आमदारांच्या बरोबरीने विधानसभेत राडा केला नाही म्हणुन बराच खल प्रसारमाध्यमांनी केला..........झी २४ तास या वृत्तवाहीनी वर शिवसेनेची गोची तत्सम शिर्षकाखाली एक चर्चासत्र घडवुन आणण्यात आले .सहभाग ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले व सेनेतर्फे दिवाकर रावते यांचा होता.......मुलाखतकाराने दामले यांना "सेनेचे पुर्वीचे स्वरुप आता बदलत चाललेय ,थोडक्यात सेना सध्या थोडी सभ्य होतेय असे तुंम्हास वाटत नाही का ?"असा प्रश्न विचारला असता "सेनेने राडा संस्कृतीचा त्याग केला आहे हे तुंम्हास पटले नाही का व सेनेने कायम राडेच करत रहावे असे तुंम्हास वाटते का ?"असा उलट प्रश्न निळु दामले यांनी मुलाखतकाराला केल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता........ आज हि बातमी सगळ्या वाहिन्यांवर झळकल्यावर नेहमी प्रमाणे जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या असत्या निदान ७०%लोकांनी निखिल वागळे यांच्यावर व आयबिएन लोकमत वर झालेल्या या हल्ल्याचे समर्थन केले आणि प्रतिक्रिया देणार्‍या बहुतांश लोकांचे म्हणणे असे होते कि निखिल वागळे हे फार उच्चप्रतिची शिवराळ भाषा वापरतात. निखिल वागळेंकडुन नि:पक्षपाती पत्रकारितेची अपेक्षा करणे गैर आहे का? :? संजय राऊत यांच्याकडुन तशी अपेक्षा बाळगण्याचे कारणच नाही कारण ते एका पक्षाच्या मुखपत्राचे संपादक आहेत........ राडा केला नाही तरी बोंब आणि केला तरि बोंब 8} "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शाहरुख Fri, 11/20/2009 - 21:11 नवीन
उद्या मी म्हणालो की "मला असे वाटते की मिपाचा संपादक क्ष हा निपक्षपातीपणे काम करत नाही" आणि म्हणून त्याच्या टक्कुर्‍यात दगड हाणला तर ते चालू शकेल का ? मी ते चॅनल जेव्हडे बघितले आहे त्यातून मला तो माणूस बोंबाबोंब करून सनसनाटी निर्माण करणारा वाटतो पण मग मी फक्त चॅनल बदलतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनामिका Fri, 11/20/2009 - 21:19 नवीन
मी ते चॅनल जेव्हडे बघितले आहे त्यातून मला तो माणूस बोंबाबोंब करून सनसनाटी निर्माण करणारा वाटतो पण मग मी फक्त चॅनल बदलतो . काय पण योगायोग मी पण तेच करते. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
N
Nile Fri, 11/20/2009 - 21:21 नवीन
छ्या! तुम्ही सगळे विचारवंत फक्त चॅनेलच बदला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
प्रभो Fri, 11/20/2009 - 21:25 नवीन
>>उद्या मी म्हणालो की "मला असे वाटते की मिपाचा संपादक क्ष हा निपक्षपातीपणे काम करत नाही" आणि म्हणून त्याच्या टक्कुर्‍यात दगड हाणला तर ते चालू शकेल का ? तुम्ही त्याला ईतर राडेबाजांप्रमाणे शाब्दीक जळजळीचे बटाटे फेकून मरू शकता.... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
N
Nile Fri, 11/20/2009 - 21:53 नवीन
अहो मालक गफलत होत आहे का? शाब्दीक वगैरे जे काही फेकुन मारतात ते 'विचारवंत' ना? राडेबाज तर कृतीशील?? तुम्ही भांड-वल-शाही अमेरीकेत येउन इतक्या लवकर वाया (via) जाल असे वाटले नव्हते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 11/21/2009 - 17:28 नवीन
नाही नाही. एक कृतीशील विचारवंत म्हणून पण गट हल्ली उदयाला आला आहे ते म्हणे केवळ 'जळजळीत शाब्दिक बटाटे' फेकून मारायचे काम करतात. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Sat, 11/21/2009 - 22:57 नवीन
हा उदय एका विचारवंताच्या डोक्यातुन दिसतोय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मुक्तसुनीत Fri, 11/20/2009 - 13:13 नवीन
लवकरच या हल्ल्याबद्दलच्या गमतीदार कॉमेंट्स, एकमेकाना टाळ्या देणे नि शिट्ट्या वाजवणे हे मिसळपाववर दिसेलच. चला . वागळ्यांच्या निमित्ताने सर्व "चैतन्यशील आणि कृतीशील" लोकांनी पुन्हा एकदा आपल्या मनगटावरच्या कड्यांना कल्हई लावून घ्यावी. वागळ्यांना (आणि हो , रिसेप्शनिस्ट सारख्या लोकांनाही - आणि कदाचित येणार्‍या जाणार्‍यांपैकी काही लोकांना) झालेल्या मारहाणीचा , नासधूशीचा संबंध "कर भरणे" "विचार करणे" (किंवा त्यांच्या आहार-भय-निद्रा सारख्या ) एखाद्या गोष्टीशी जोडता येईल. मिसळपाववरील पुढील उरुसाच्या प्रतीक्षेत :-)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 13:17 नवीन
मु.सु. सर्वात पहिली शिट्टी आणी टाळी तुम्हालाच.. एक नंबर प्रतिसाद... सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 13:18 नवीन
मु.सु. सर्वात पहिली शिट्टी आणी टाळी तुम्हालाच.. एक नंबर प्रतिसाद... सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सुमीत Fri, 11/20/2009 - 13:14 नवीन
जोकर आहे तो, त्याला बिग बॉस मध्ये पाठवा, असंबद्ध बडबड करण्यात त्याचा हात नाही कोणी धरणार. निखिल वागळे लोकांच्या मतांन किंमत देत नाही , एसेमस मागवून वर लोकांना सवाल कळालाच नाही अशी मल्लीनाथी करतो.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 11/20/2009 - 13:14 नवीन
उच्च कोटीच्या तुच्छ वागळे विषयी लोक हातातली काम धंदे सोडून चर्चा का करत आहेत ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 11/20/2009 - 13:22 नवीन
तात्या हे म्हणजे "काकुला मिश्या असत्या तर काका म्हटलं असतं" मला तर तो निखिल (वागळ्यांच हो ) पत्रकारां मधला आबुच वाटतो. महानगरचा धंदा चालेना म्हणुन आयबीएन लोकमत आलेला. मिपा मधे गडगंज पगार दे लगेच येईल बघ. यांच्या कडुन कसल्या निषपक्षतेच्या फाजिल आपेक्षा ठेवता. यांच्या फक्त नावात लोकमत पण लोकांच्या मताला सोईस्कर *ट्या वर मारतात. बाकी शिव्या तुच दे.( तुझ्या तोंडुन खुप गोड वाटतात रे Image removed. Image removed. Image removed.) मार खाउन परत कसा हस्तोय बघ (वरील प्रतिसादाशी याफोटोचा काहीही संबंध नाही) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
वि_जय Fri, 11/20/2009 - 13:34 नवीन
जयपाल.. जबरदस्त प्रतिक्रीया दिलीयस.. मानल तुला दोस्ता... तुला मानाचा भगवा फेटा दिला रे मित्रा.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
व
वि_जय Fri, 11/20/2009 - 13:25 नवीन
त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!!१ त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!! त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!! सुमितशी सहमत..निखिल वागळे हा नक्की पत्रकार आहे का?.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 11/20/2009 - 13:50 नवीन
हल्ल्याबद्दल शिवसेनेचा निषेध आणि त्याचबरोबर अशा हल्ल्यांना, विधानसभेतल्या मारामारीला आणि एकूणच अशा कायदा हातात घेणार्‍यांचे समर्थन करणार्‍या मिपावरील प्रत्येकाचा निषेध! जी माणसे विचाराने वाद घालू शकत नाहीत तीच मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर येतात. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/20/2009 - 14:38 नवीन
व्यथित!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दीपक साळुंके Fri, 11/20/2009 - 14:58 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धमाल मुलगा Fri, 11/20/2009 - 15:07 नवीन
ही घटना पाहिल्यावर्/वाचल्यावर अचानक आठवण आली ती आक्रमक पत्रकारीता करणार्‍या वृत्तपत्रात काम केलेल्या एका पत्रकार स्नेहींची. त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा करावी म्हणलं तर त्यांचे असे म्हणणे पडले की... "प्रामाणिकपणे पत्रकारिता केली तर असे हल्ले होत नाहीत. अगदी गल्लीबोळातले टुकार गुंडच ते करु शकतात. राजकीय पक्ष किंवा मोठ्या गँगस्टरवर प्रामाणिक प्रोफेशनल्सचं बरच मोठं दडपण असतं अन ते बफर म्हणुन काम करतं." ह्यानंतर चर्चेत स्वतःचे काही अनुभव सांगताना ते असेही म्हणाले की "आक्रमक पत्रकारिता व सुपारीबाज ठरणारी पत्रकारिता हा भेद करावा लागेलच." आजकाल जे बोकाळलंय ते भावना भडकावणारे आणि विशिष्ट माध्यमांनी विशिष्ट गट/संस्था/पक्ष ह्यांना लक्ष्य करुन प्रसारण करणे. शेवटी ते उपहासाने हेदेखील म्हणाले की, "आता तर मलाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतोय की माझ्यावर, माझ्या कुठल्याच सहकार्‍यावर कधी राजकीय पक्षाकडुन हल्ला झाला नाही म्हणजे आम्हीच बहुधा प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेली नसावी." :) असो, आय.बी.एन.च्या एकापाठोपाठ एक येणार्‍या स्टेटमेंट्समध्ये इतका विरोधाभास होता की हसावं रडावं की त्यांना येड्यात जमा करावं हेच कळेना. असो, एका पत्रकारितेमधल्या मुरलेल्या जेष्ठ पत्रकारांचे विचार इथे कळवावेसे वाटले. बाकी चालु द्या....
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 11/20/2009 - 15:37 नवीन
धम्याने मांडलेले मुद्दे विचारार्ह आहेत. जर टीआरपी वाढवण्यासाठी हे प्रकरण असेल तर त्याचाही निषेध केला पाहिजे. तरीही लोकशाहीत विचारांचा प्रतिवाद विचारांनीच झाला पाहिजे. मुद्दे संपले म्हणुन गुद्द्यावर येणे हा दहशतवादच आहे. जर निखिल वागळे बिनबुडाचे आरोप करत आहेत असे वाटले तर ते त्यांच्यावरच उल्टवता येतात. न्याय्य मार्गाने जर अब्रुनुकसानीचा काही कोटींचा दावा लावला तर निखिल वागळेंची पळता भुई थोडी होईल. पण हल्ला करुन शिवसेना आयबीएन लोकमत चा टीआरपी वाढवत आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/20/2009 - 15:39 नवीन
पण हल्ला करुन शिवसेना आयबीएन लोकमत चा टीआरपी वाढवत आहे.
:-( मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं आणि सामान्यांना बसू देत, टॅक्स भरत, चर्चा-भांडणं करत ... अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
N
Nile Fri, 11/20/2009 - 21:14 नवीन
प्रामाणिकपणे पत्रकारिता केली तर असे हल्ले होत नाहीत
एकदा का, 'कार्यालयं फोडुन' आपण धडा शिकवु शकतो ही वृत्ती बळावली की तोडफोड ही फक्त बदला घेणे यापुरतीच असते. उद्या एखाद्या प्रामाणिक पत्रकारावर खरी(पण स्फोटक) बातमी दिली म्हणुन हल्ला, आरोप, राजकीय दबाव येणार नाही असे वाटते का? मला वाटतं बरेच 'प्रामाणिक' पत्रकार असल्या भानगडीत पडतही नसावेत. ते लोक कसबापेठेत जलवाहिनी फुटली, अमुकतमुक समाजसेवी संघटनेची फलनावी शाखा उद्घाटन वगैरे बातम्या देत सुखी जीवन जगत असावेत. थोडक्यात,(प्रस्तुत वादातील) पत्रकारही 'राडेबाज' आणि राजकीय पक्षही राडेबाज.म्हणुन (असं मानलं तर) सामान्यांनी ही राडेबाजी स्वीकारावी असे काहिंचे म्हणणे आहे का? जाता जाता: All the president's men, सिनेमा सुचवावासा वाटतो! (करमणुक म्हणुन हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मराठे Fri, 11/20/2009 - 16:14 नवीन
सकाळि सहज आंतरजालावर मटा उघडला तेव्हा ही ब्रेकिंग न्युज वाचली. पण अजुन हल्ला का केला ते कळलं नाहि.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 11/20/2009 - 16:17 नवीन
"आम्ही-सुद्धा-राडे-करतो-म्हटलं" सिंड्रोम...!
  • Log in or register to post comments
स
सुहास Fri, 11/20/2009 - 19:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
प
प्रभो Fri, 11/20/2009 - 19:49 नवीन
जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
द
देवदत्त Fri, 11/20/2009 - 17:30 नवीन
शिवसेनेने तर जबाबदारी स्वीकारली आहे. बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले म्हणून त्यांनी हा हल्ला केला असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेबाबत काही विरोधाभास दिसत आहेत. एका ठिकाणी मराठीचा मुद्दा आमचा आहे म्हणताना त्याबाबतीत काही करायचे नाही. वर मराठी माणसानेच खंजीर खुपसला असे म्हणायचे. विधानभवनात तर ते काहीच बोलले नाहीत. सचिनच्या विधानाबाबतीत जो मुद्दा नाहीच त्याला मुद्दा बनवून समोर आणले. तेव्हा हेच शिवसैनिक म्हणाले की सचिन हा बाळासाहेबांना मुलासारखाच आहे. त्यामुळे त्याला समजावून सांगत आहेत. मग एखाद्या मराठी पत्रकाराने घरातीलच लोक समजून त्यांना काही म्हटले/विचारले असे समजू शकत नाहीत का? पण त्यांचावरच हल्ला करायचा? तेच तो बाहेरचा अबू आझमी बाळासाहेबांना काहीतरी बोलून गेला तेव्हा "उद्या बघतो ना त्याला" असे म्हणाले, वर आता अबू आझमीने "विधानसभेत हिंदी आणेनच" म्हटले त्याबाबतीत हे लोक का शांत बसून होते? फक्त तक्रार करत आहे? तेव्हा नव्हती की ही हाणामारी सुचली? मी आयबीएन लोकमतच्या सर्वच मतांशी सहमत आहे असे नाही. तसेच शिवसेनेच्या विरोधात आहे असेही नाही. उलट त्यांचे समर्थन करतोही. शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे. पण असल्या मुद्यांत तरी समर्थन नाही.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/20/2009 - 18:02 नवीन
भावना नेमकी व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते .. देवदत्त ने योग्य शब्दांकन केलं आहे ;) प्रत्येक वाक्याशी सहमत .. - प्रमोद देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान (वरील सही शरदिनीला अर्पण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
स
सुहास Fri, 11/20/2009 - 19:02 नवीन
+२ स ह म त.. --सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
श
शिवापा Fri, 11/20/2009 - 19:19 नवीन
विडिओ पाहिला. बरीच तोडफोड केलीये. विमा होता का? एका माणसाला गुरासारखे मारलेय. तो मराठी होता का? टि. व्ही वाले आहात म्हणुन आमच्या दैवतांचा अपमान कराल का? शेतीविषयक कार्यक्रम करायाला काय होते? ह्या प्रकाराचे शुटींग करणारा मार खाणा-याला वाचवु शकत होता का? त्या ऑफिसातले पडदे काय छान आहेत! राडा करणा-यांचा सत्कार कधि आहे? आणि सर्वात महत्त्वाचे, हि सगळी उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेमकी कोणाला सांगावी?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा