पाककृती
मटर पनीर
Primary tabs
साहित्य :
२०० ग्राम पनीर, पाव किलो मटार,१ मोठा कांदा , १ मोठा टोमैटो, १ चमचा आल-लसुण पेस्ट, १ मोठा चमचा काजुची पेस्ट,
१ टीस्पुन काश्मीरी लाल मिर्ची पावडर, १ टीस्पुन गरम मसाला, तेल, १ मोठा चमचा अमुल बटर ,थोडीशी हळद, फोडणीसाठी थोड जिर, मीट चवीनुसार, ग्रेवीसाठी थोडे गरम पाणी.
क्रुती :
प्रथम कांदा उभा चिरुन तेलावर लालसर परतुन घ्यावा, कांदा लाल झाल्यावार त्यातच टोमैटोही चिरुन घालावेत हे दोन्ही परतुन गार झाल्यावर
मिक्सवर त्याची पेस्ट करुन घ्यावी.
पनीर थोड्या तेलात तळून घ्यावे, मटार वाफवुन ठेवावेत.
कढईत थोडे तेल आणि अमुल बटर गरम करुन घ्यावे, त्यात थोडे जिरे आणि कांदा टोमैटोची पेस्ट तेल सुटेपर्यन्त परतुन घ्या,नंत्तर त्यात आल-लसुण पेस्ट, हळद,काश्मीरी लाल मिर्ची पावड,काजुची पेस्ट,
घालुन परत थोड परतुन घ्या,आता त्यात पनीर आणि मटार घाला , मीट घाला चवीनुसार व सगळ्यात शेवटी गरम मसाला घाला, ग्रेवी कशी हवी आहे दाट का पातळ त्यानुसार गरम पाणी घालुन भाजी १० मि.शिजवा.
वरुन थोडे फ्रेश क्रिम आणि कोथिंबीर घालुन सजवा.

छान जमलय ग मटर-पनीर
खल्लास :)
पुर्वी मी वाटाणे काढून मटर पणीर खात असे :)
- मामुली & दुर्लक्षित
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आहाहा... पनीर असलेला कुठलाही पदार्थ आवडतोच. :)
(पनीर क्रेझी)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
=D> =D> मस्त्च
(माधुरिची सुगरण मैट्रिण )चुचु
जितकी झक्कास पाकृ तितकाच झक्कास फोटो.
वाह...
-गणपा.
हेच म्हणतो.
असेच म्हणतो
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे मनापासुन आभार :)
सुंदरच...!
फोटो देखील छान
झ का स ..
सू हा स...
ख ल्ला स !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
वा! वा!
छानच दिसतय मटर पनिर!
रेवती
वा! माधुरी तै मटर पनीर खासंच!!
खुपच मस्त दिसतय गं मटर पनीर.
या पध्दतीन करुन बघेन आता.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)