क्रान्तितै, अतिशय सुंदर कविता. शेवटच्या दोन कडव्यांवरून महानोरांच्या पुढील ओळी आठवल्या. ('मुक्ता' चित्रपटातही ही कविता आहे. ती कविता प्रेयसीला उद्देशून आहे.)
तू तलम अग्निची पात
जशी दिनरात जळावी मंद
तू बंधमुक्त स्वछंद
जसा रानात झरा बेबंद
मस्त..आवडली
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुंदर... :)
तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले
झकास्स्स...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
बरेचदा शोध म्हणजे घरदार, सगेसोयरे सोडून , मोहात न पडता दूर कुठे जाउन प्राप्त / सिद्ध करायचा गोष्टी डोळ्यासमोर येतात.
घरसंसारात बसल्या बसल्या कवितेचा हा शोध म्हणजे सावता माळ्याने आपल्या मळ्यातच देवाला खेचुन आणले, तसे कवयित्रीने कवितेला आपल्याकडे खेचुन आणले.
वाह! जीवन त्यांना कळले हो अशीच कविता!!!!!
आवडली.
तीच ती मीरा, तोच तो पाऊस..
तोच तो साजण, तीच ती भूपाळि..
एकंदरीत जुनी वारुणी नव्या बाटलीत..
यॉन...
किमान सहज किंवा अवलिया साहेबांनीतरी त्यांचे खरे विचार लिहायला हवे होते. पण एकंदरीत वातावरण बघता, तेदेखील कंपूबाजीत अथवा चपलांत मग्न. संपादकांच्या कळपाकडून तर काही अपेक्षाच नाहीत. छ्या ! चला, आम्हीच चपलांची तयरी करतो, मग.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
'तोच तो आणि तेच ते' वर आमचे दोन पैसे.
'भावगीत' या काव्यप्रकाराच्या जन्म संगीत नाटकांच्या पदांमधूनच झाला असे म्हणतात.(चुभुदेघे) संगीताचा अतिरेक झाला आणि संगीत रंगभुमीला वाचवण्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला. पदाची रचना, सुलभपणा, चाली, गाण्याच्या पद्धती. इत्यादी. त्यामुळे झाले काय की, या निमित्ताने वेगवेगळ्या रचना निर्माण झाल्या आणि लोकप्रियही झाल्या. 'कविता गायन' या प्रकाराचा प्रवास असाच झाला असावा.
मीरा,साजन,पाऊस,भुपाळी, या किंवा अशा नियमित येणार्या शब्दांच्या रचनांमधून एक नवअनुभव वाचायला मिळतो का, तो अनुभव आनंद देतो का ? ते वाचकांनी शोधले पाहिजे असे वाटते. सो-सो वाटणार्या रचनेपासून ते 'आनंदाचे डोही आनंद तरंगपर्यंतचा' प्रवास जरासा मागे आणि जरासा पुढे असाही होत असतो. तेव्हा आपण निर्मळ मनाने काव्यवाचनाचा आनंद घेतला की, 'तोच तो पणा दिसणार नाही' आणि दिसला तरी, कधी तरी त्यात बदलही होतील असे समजून, लिहिणार्याचा उत्साह वाढविला पाहिजे असे मनापासून वाटते.
-दिलीप बिरुटे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी