पाककृती

शेझवान

Primary tabs

साहित्य : आलं ( एकदम बारीक चिरून ) , लसूण ( एकदम बारीक चिरून ) ,
हिरवी मिरची ( एकदम बारीक चिरून ) , सेलरी पानं , सोया सास , चिली सास , मीठ , तेल
लाल तिखट.

कृती : एका कढई मधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं आलं व लसूण टाकून चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यावे , मग त्यात बारीक चिरलेली मिरची टाकून पुन्हा परतावे.
व्यवस्थित परतल्यावर त्यात लाल तिखट घालून अजून २ मि. ढवळावे. मग त्यात सोया व चिली सास घालून एकजीव होईपर्यंत ढवळावे.चांगले रटरटल्यावर त्यात बारीक चिरलेली सेलरी घालून एकदा नीट एकजीव करून उतरावे.
गार झाल्यावर चायनीज रोल , स्प्रिंग रोल इ. चायनिज पदार्थांबरोबर सर्व्ह करावे .
हे किमान ७/८ दिवस फ्रिजमधे न ठेवता टिकते.

( लाल तिखट व चिली सास ची मात्रा प्रत्येकाच्या तिखटाच्या आवडीप्रमाणॅ ठेवावी. सोया सास ही फार घालू नये आंबट होईल. )

वेताळ

एकदा हे करताना शिंका चालु झालेल्या लवकर थांबत नाहित.
बाकी चायनिझ पदार्थ खायला आपल्याला खुप आवडतात. त्याची एकादी रेसिपी टाका भाउ.
वेताळ

गणपा

धन्यु रे संतोष,
तु कॉन फ्लॉवर नाही का वापरत?
परवाच बनवला होता. थोडी वगळी पद्ध्त वापरली.

-माझी खादाडी.

जयवी

अरे वा...कधीपासून ही रेसीपी हवी होती.
गणपा, तुझी पण रेसीपी दे ना.