Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेंगळुरुमध्ये मराठी शाकाहारी भोजनालये, खानावळी, डबेवाले

प
प्रशांत उदय मनोहर
गुरुवार, 12/10/2009 - 17:54
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10282 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 12/10/2009 - 18:07 नवीन
अरे कोरमंगला आणि इंदिरा नगर ही २ टोकं आहेत. एकीकडून माणूस दुपारचा डबा घेऊन निघाला तर दुसरीकडे रात्रीच्या जेवणापर्यंत पोचेल. नक्की ठिकाण सांग.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर गुरुवार, 12/10/2009 - 19:28 नवीन
कदाचित एक ऑफिसचं ठिकाण आणि एक घर असेल. उद्या सांगतो कन्फर्म करून. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
आ
आशिष सुर्वे Fri, 12/11/2009 - 05:07 नवीन
ऍडी भाऊने सांगितलेले १००% खरे आहे!! नक्की पत्ता सांगा.. आम्ही आहोतच.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Fri, 12/11/2009 - 05:10 नवीन
नित्य भोजनासाठी माहित नाही पण अधुन मधुन जायला पै रिफ्रेशमेंट्स नावाच्या उपहार गृहात उत्तम मराठी (वेगवेगळ्या भाकर्‍या, त्यावर लोणी, भरीत वगैरे वगैरे) जेवण (अमर्याद थाळी) मिळते. मॅजेस्टिक जवळ आनंद राव सर्कल वरुन शेशाद्री रोडवरुन रेसकोर्स कडे जाताना उजव्या हाताला हॉटेल मौर्य समोर आहे. --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Fri, 12/11/2009 - 05:10 नवीन
नित्य भोजनासाठी माहित नाही पण अधुन मधुन जायला पै रिफ्रेशमेंट्स नावाच्या उपहार गृहात उत्तम मराठी (वेगवेगळ्या भाकर्‍या, त्यावर लोणी, भरीत वगैरे वगैरे) जेवण (अमर्याद थाळी) मिळते. मॅजेस्टिक जवळ आनंद राव सर्कल वरुन शेशाद्री रोडवरुन रेसकोर्स कडे जाताना उजव्या हाताला हॉटेल मौर्य समोर आहे. --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/11/2009 - 09:12 नवीन
बेंगलोरमध्ये कामत हॉटेल्सची चेन आहे.तिथे ज्वारीच्या भाकरीचे जेवण झकास मिळते. एक कामत हॉटेल एस्.वी रोडवर आहे,दुसरे बसवनगुडी मध्ये आहे आणि तिसरे आनंदरावसर्कल जवळ आहे.(महाराष्ट्रभवन जवळ.) महाराष्ट्र भवन मध्येही असे जेवण मिळते. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 12/11/2009 - 10:04 नवीन
महाराष्ट्र भवन मधील रेस्टॉरंट कामतच चालवतो. तेथून जवळच (हॉटेल्स स्ट्रीट वर) हॉटेल कामत यात्री निवास आहे. येथे गच्चीवर नॉर्थ कॅनरा मिल्स विभाग आहे. त्यात ज्वारीची भाकरी, भरली वांगी , लसूण-लाल मिर्चीचा खर्डा, कच्चा (पातीचा कांदा), तूप मेतकूट भात, मेथी अथवा पालकची पातळ भाजी, ताक व गोड पदार्थ (रोज वेगळा) असा जंगी मेनू मिळतो (भोजनपश्चात इलायची केळे व विडा). ज्वारीच्या भाकर्‍या जाड नसून मऊसूत असतात. भाकर्‍या बडवायला डझनभर माणसे बसलेली दिसतात. त्यांच्या खडखडाच्या तालावर तब्येतीत हात मारावा. दक्षिण भारतीय प्रथेनुसार केळीच्या पानावर जेवण वाढतात. केळीचे पान महाराष्ट्रीय प्रथेपेक्षा वेगळे म्हणजे आडवे ठेवतात( पानाचा निमुळता भाग डावीकडे). पान समोर ठेवल्यानंतर ते पात्रातील पाण्याने हबकून धुवावे. पानावरचे पाणी टिश्यू पेपरने टिपावे अथवा टेबलाखाली सांडावे (असे केलेले दिसल्याशिवाय बहुसंख्य हॉटेलात, वाढपी वाढायला येते नाहीत. परंतू, कामतच्या ह्या हॉटेलात मरणाची गर्दी असते, त्यामूळे हा नियम धाब्यावर बसवला जातो). जेवण झाल्यानंतर पानाची घडी घालावी, घडीत आपल्या कडची बाजू पलिकडच्या बाजूवर परतावी. त्यावर वाटी ठेवावी. दक्षिण भारतीय लोक प्रथेच्या बाबतीत जागरूक, त्यांच्या प्रथा कळाव्यात म्हणून सविस्तर लिहिले. दर बहुदा रु. १००/- अनलिमिटेड (नॉन स्टॉप). संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/11/2009 - 09:15 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट Fri, 12/11/2009 - 10:20 नवीन
राजवर्धन मधे मस्त शाबुदाणा खिचडी, वडा पाव, मिसळ, तर्री वडा, वांगे-भाकरी (ज्वारी), श्रिखंड्-पुरी, पोहे, शिरा, कोथिंबिर वड्या आणि बरेच छान छान पदार्थ मिळ्तात...... पत्ता :- जयनगर, ९ ब्लॉक, बिग बजार जवळ, ICICI ATM शेजारी... बेंगलोर. (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/11/2009 - 12:02 नवीन
मागे एकदा राजवर्धनमध्ये मिसळ खाल्ली होती.दर्जा यथातथाच होता आणि महागही फार होती...पण तरी आज तिथे जावे म्हणतो..! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट
न
नि३ Fri, 12/11/2009 - 10:46 नवीन
अरे अहाहा काय काय मिळते यार बेंगळुरुमध्ये !!! अरे कोणीतरी चेन्नई साठी पण असली ठिकाणे सांगा रे रोज मरतोय ईथे भात खाऊ - खाऊ ---नि३.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/11/2009 - 12:05 नवीन
रजनीअण्णाच्या घरी जा! कदाचित तिथे काहीतरी मराठी पध्दतीचे मिळु शकेल.!(अर्थात रजनीअण्णाने आपला मराठी बाणा जपला असला तर!) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
आ
आशिष सुर्वे Fri, 12/11/2009 - 12:39 नवीन
चला, ह्या धाग्याच्या निमित्ताने एक गोष्ट तर्र कळाली की, बेंगळुरुमध्ये बरेच मिपाकर आहेत.. म्या एकलाच नाह्य इथं!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Fri, 12/11/2009 - 13:54 नवीन
यम्म हेच्च १२ च्या पुढे "मिपा" असेही लिहावे असे वाटते. मी उद्याच ते करणार मग बंगळूरुला माझी गाडी तुम्हाला दिसेल तेह्वा जरुर विचारा. मराठी माणूस आणि उद्यमशीलता ह्यांचे वावडे असल्याने बंगळूरात कसली आली मराठी हाटेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
म
मेघना भुस्कुटे Fri, 12/11/2009 - 13:43 नवीन
जयनगर-पोलीस स्टेशनच्या जवळ 'रंगशंकरा' नाट्यगृह आहे. तिथल्या कॅन्टीनमधे उत्तम साबुदाणा वडा मिळतो.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 12/11/2009 - 14:40 नवीन
हि महाराष्ट्र मंडळाची लिंक बघा इथे काहि पत्ते दिले आहेत - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Fri, 12/11/2009 - 19:00 नवीन
आज फोनवर बोलणं झालं मित्राशी. त्यांचा मुलगा कोरमंगलम जवळ राहतो. या भागातल्या खानावळींबद्दल सांगितल्यास खूप मदत होईल. आपला, (कृतज्ञ) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 12/11/2009 - 19:30 नवीन
महाराष्ट्र मंडळाची सोय काही खास नाही. एक अनाहुत सल्ला. मित्राला म्हणावं बंगलोरी, उडपी खायला लाग ते उत्तम. त्याशिवाय बंगलोर मध्ये उत्तर भारतीय पदार्थ सहज मिळतात. इंदिरानगर जवळ कामाकरिता जात असल्यास, डोमलुर जवळ काही बर्‍यापैकी हॉटेल्स आहेत. त्याशिवाय मणिपाल हॉस्पीट्लच्या खानावळीत मस्त (आणि स्वस्त) पदार्थ मिळतात. (माझी माहिती जवळजवळ दोन वर्ष जुनी आहे, आशा आहे फार बदल झाला नसेल.) -नम्मा बेंगळुरु! ;)
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 12/12/2009 - 01:28 नवीन
>>एक अनाहुत सल्ला. मित्राला म्हणावं बंगलोरी, उडपी खायला लाग ते उत्तम. असेच म्हणतो..तसेच कन्नड शिकण्यासही लगेच सुरुवात करावी.उगाच कन्नडिगांचा रोष कशाला पत्करायचा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
J
jaypal Sat, 12/12/2009 - 09:31 नवीन
कही तरी मदत होईल अस वाटत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा