पाककृती

चीझ स्कुअर्स

Primary tabs

Image removed.Image removed.From Untitled Album" alt="" />साहित्य बेसिल १ जुडी (१५ - २० मध्यम आकाराची पाने) पुदिना १/२ जुडी (१५/२० पाने) कोथिंबीर १ जुडी २ टेबल स्पून ऑलिव ऑइल पेपर जॅक चीझ १ बार ४/५ हिरव्या मिरच्या लाल द्राक्षे १ कॅन पाइनाअ‍ॅपल (चंक्स) मीठ (चवीप्रमाणे) टूथप्रिक्स. क्रुती फूड प्रोसेसर मधे बेसिल, पुदिना, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ऑलिव ऑइल घालून चटणी करून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. पेपर जॅक चीझ चे बाइट साइझ तुकडे करून घ्यावे. आता हे तुकडे वरील चटणीत घालून सारखे करावेत. सगळ्या तुकड्यांना चटणी नीट लागली पाहिजे. हे तुकडे एका डब्यात घालून १ दिवस फ्रीज मधे ठेवुन द्यावेत. छान मॅरिनेट झाले पाहिजेत. दुसर्‍या दिवशी एकेका टूथप्रिक मधे प्रथम पाइनाअ‍ॅपल चा तुकडा ओवावा, मग एक द्राक्ष ओवावे आणि शेवटी चीझ चा १ तुकडा ओवावा. आणि गट्टम करावे माहितीचा स्त्रोतः आंतरजालावरून Image removed. Image removed.
jaypal

चाखायलाच हवा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण

छ्या... अशा पदार्थांची चवं घेऊन पाहण्याची सोय निर्माण व्ह्यायला हवी आता... ;)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

भानस

चीज-चेरी-अननस नेहमीच केले जाते पण हे जरा तिखटमाखट .....सहीच लागेल. धन्यवाद.