Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागे

क
कवटी
Wed, 12/30/2009 - 14:33
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4200 वाचन

💬 प्रतिसाद (23)
अ
अवलिया Wed, 12/30/2009 - 14:37 नवीन
उत्तम धागा. चर्चा वाचुन मलाही थोडी मदत मिळेल. विकिपेडीयावर टाकायला प्राध्यापक मदत करतीलच. --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/30/2009 - 14:46 नवीन
सगळेच एक ओळीचे धागे वाईट असतात असे नाही. बरेचदा सदस्यांना काही माहिती हवी असते आणि त्यासाठी यासारख्या ओपन फोरमचा उपयोग गैर नाही. अर्थात, माहिती मागतानाही जरा नीट खुलवून लिहिता आले तर ठीकच पण प्रत्येकालाच ते जमते असे नाही आणि केवळ त्या साठी त्या सदस्याचा लेखनाचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. या बाबतीत आमच्या एका माननिय मित्राचे ब्रीदवाक्य मला फार चपखल वाटते... 'पटता तो टेक, नही तो रामटेक.' :D प्रत्येकच सदस्याने कथा / लेख / कविता / चर्चा इत्यादी प्रकारचे लेखन करावे असेही बंधन नाहीये. इथे प्रतिसादमात्र अथवा वाचनमात्र असेही सदस्य आहेत. त्यांचेही तेवढेच महत्व मला वाटते. आणि मला तर एक ओळीच्या धाग्यांपेक्षा फालतू अथवा उथळ धागे (मग ते कितीही ओळींचे असोत) जास्त त्रासदायक वाटतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/30/2009 - 14:49 नवीन
आणि मला तर एक ओळीच्या धाग्यांपेक्षा फालतू अथवा उथळ धागे (मग ते कितीही ओळींचे असोत) जास्त त्रासदायक वाटतात अगदी अगदी. काही काही लेखक छान लेख क्रमशः लिहुन नंतर लेखनाची माती करतात ते तर फारच त्रासदायक. देवबाप्पा अशा लेखकांना शिक्षा करो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/30/2009 - 14:51 नवीन
१) रुचिका आत्महत्या प्रकरण आपल्याला काय वाटते ? २) एन.डी.तिवारी यांनी राज्यपालपदाचा राजिनामा द्यायला हवा होता का ? ३) काँग्रेसची एकशेपंचवीस वर्ष ? ४) कारवार-बेळगाव महाराष्ट्रात येतील तेव्हा येतील. गडचिरोली भागातील गावे आंध्रात जातो म्हणतात. आपल्याला काय वाटते ? ५) विकसित,विकसनशील आणि मागासलेल्या लोकांच्या मारामार्‍या म्हणजे 'कोपनहेग' परिषद ? ६) लेखनाची सुरुवात कवितेपासून का होते ? ७) धान्यांपासून मद्यनिर्मितीस शासकीय अनुदान द्यावे का ? ८) भाषिक 'चळवळ' केवळ 'वळवळ' असते ! आपल्याला काय वाटते ? ९) थ्री इडियट्स चित्रपट पाहावा का ? १०) तात्या अभ्यंकर कुठे आहेत ? एक ओळीच्या धाग्याला फार आयुष्य नसते, असे समजून विषय सुचविले आहेत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/30/2009 - 15:13 नवीन
एक ओळीच्या धाग्याला फार आयुष्य नसते, असे समजून विषय सुचविले आहेत. असहमत. काही मरण नसणारे एकोळी धागे. १)संस्कृत शिकावे की नाही ? २)पुण्यात वाहतुकीला शिस्त आहे की नाही? ३) मराठवाडा (किंवा कोणत्याही) विद्यापीठाला दर्जा आहे की नाही ? ४)बिहारींचे काय करावे ? ५)अनिवासी लोक आईवडीलांचे काय करतात? ६)संकेतस्थळ संपादक पारदर्शक कारभार करतात का? ७)मराठी मृत होत आहे काय ? ८)संकेतस्थळावर सदस्य नाव घेतांना पदव्या लावाव्यात का? ९)प्रतिसाद आणि वाचने यांचा लेखाच्या दर्जाशी संबध असतो का? १०) मिपावर कंपुबाजी आहे का? अजुन बरेच सुचतील. सध्या येवढेच. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/30/2009 - 15:27 नवीन
१) श्रेष्ठ लेखनाची भाषा;बोली की प्रमाण ? २) लेखनासाठी नियम असावेत का ? ३) भाषा म्हणजे काय ? ४) कवितेला मात्रा,वृत्तांचे बंधन असावे काय ? ५) दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन दुबईत कशासाठी ? ६) बदलती ग्रामीण कविता ? ७) मराठी शब्दांचे अर्थ हवे आहेत ? ८) 'महानोरी संप्रदाय’ म्हणजे कोणता संप्रदाय ? ९) महानुभावपंथाच्या 'श्रुतिपाठ’ ग्रंथाचा परिचय कुठे वाचायला मिळेल. १०) महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलत आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/31/2009 - 06:02 नवीन
तात्या अभ्यंकर कुठे आहेत ? चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन Wed, 12/30/2009 - 15:18 नवीन
येथे तसे ह्या प्रकारात लेखण करणारे बरेच सिद्धहस्त लेखक आहेत. पण मी जमेल तशी मदत करतो :) बिरुटे-जी प्रमाणे मी सुद्धा काही एग्झांपल देऊन सांगतो. १. गुलाबजामचा पाक उरलाय , काय करावे ? २. टमरेलाची कडी तुटलीये आणि चिरलंय .. कसे पुन्हा वापरात आणता येईल ? ३. घरात ढेकणं फार झालीत , मुक्ती कशी मिळवता येईल ? ४. इकडे चांगला गहू/तांदूळ कुठे मिळतो ? ५. विमान /हॅलिकॉप्टर विकत घ्यायचंय .. कुठलं घेऊ ? ६.रोल्स रॉयस घोस्ट की रोल्स रॉयस फँटम , पैकी कुठली गाडी घ्यावी ? ७. लग्न / हनिमुन / .... चा प्लान आहे , मदत करा ! ८. कोणत्या बिसलरी मधे ( जसं टुथपेस्ट = कोलगेट , तसं मिनरल वॉटर = बिसलरी) सर्वांत चांगलं पाणी असतं ? ९. कोबी काढून झाल्यावर उरलेल्या पाल्याचं काय करावं ? १०. कोणत्या ब्रांडची अँडरवेयर वापरून जिर्ण झाली की फरशी पुसण्याचं फडकं म्हणून वापरायला योग्य असते ? असे/या प्रकारचे एक न अनेक उपयोगी एक लायनीचे धागे मिपावर आलेले आहेत. कवटीजी , तुम्हाला शुभेच्छा !! - गावठी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/30/2009 - 15:25 नवीन
सगळेच विषय गैर वाटत नाहीत. असो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Wed, 12/30/2009 - 16:02 नवीन
मी कुठेही नमुद केलेलं नाही की "सगळेच विषय गैर असतात " म्हणून असो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/30/2009 - 16:15 नवीन
सहमतीबद्दल धन्यवाद. शंका नव्हतीच. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अनुप्रिया Wed, 12/30/2009 - 16:48 नवीन
"धागा काढायला परवानगी द्याल का? " असाही धागा होऊ शकतो का? :
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 12/30/2009 - 16:53 नवीन
१)मातृभाषेतून शिक्षण घेणे योग्य की अयोग्य? २)मराठी माणसाला सगळीकडे का डावलले जाते? ३)मराठी खासदार लोकसभेत गप्प का बसतात? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Wed, 12/30/2009 - 17:12 नवीन
वरील प्रतिसादातील टॉप टेन धागे कोणते?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 12/31/2009 - 05:59 नवीन
एक जुने ज्येष्ठ कौलारु सदस्य **राम *टणे यांचा एक ओळीय धाग्यांचा गाढा अभ्यास होता . ते अधीक माहिती देउ शकतील.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 12/31/2009 - 20:26 नवीन
**राम *टणे
हो कोण बरे? आणि ह्यात चांदण्या घालण्याचे प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ट
टारझन Fri, 01/01/2010 - 14:40 नवीन
धागा का नाही काढत आपण ? - सखात्त गोत्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
अ
अशोक पतिल गुरुवार, 12/31/2009 - 18:15 नवीन
अरे व्वा !!! एक ओळीचे धागे असेही असु शकतात तर ?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/01/2010 - 09:26 नवीन
मनपसंत आहे. खूप छान
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 01/01/2010 - 17:51 नवीन
मिपावर धाग्यांचा दर्जा फारच खालावलेला दिसत आहे. तात्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. त्याविषयीचा धागा संपादकांनी उडवावा हेही लक्षनीय आहे. या धाग्यावर संपादकांचे प्रतिसाद यावेत हे अतिशय चिंतनीय आहे.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 01/01/2010 - 18:26 नवीन
या धाग्यावर संपादकांचे प्रतिसाद यावेत हे अतिशय चिंतनीय आहे.
आणि खुद्द तात्यांची चौकशी करणारा धागा मात्र उडवला जाणे हे अतिशय खेदजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
स
सुधीर काळे Fri, 01/01/2010 - 19:01 नवीन
हा चित्रपट काल फ्रेमाँटच्या "नाझ"मध्ये पाहिला. अलीकडे पाहिलेल्या चित्रपटांत सर्वश्रेष्ठ असेच म्हणेन मी. खरंच एक नवा विषय अतीशय मस्त हातळलाय्. सर्वांनी जरूर पहावा. सुधीर काळे ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 01/01/2010 - 19:06 नवीन
काका तुम्हीही अवांतर प्रतिसाद देता? :) कवटीच्या ह्या धाग्याचा ऑफिशियली खरडफळा झाला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा