Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

I
II विकास II
Sun, 01/03/2010 - 13:34
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4032 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/03/2010 - 13:40 नवीन
विकास माहितीबद्दल धन्यु.....! पण घटनेत राष्ट्रभाषा कोण-कोणत्या आहेत असा उल्लेख आहे. उद्या पुस्तक पाहून सांगतो. हिंदी को राष्ट्रभाषा घोषित करने के संबंध मे भारत के संविधान मे कोई प्रावधान नही है अनुवाद समजून घ्यावा लागेल..! बाकी, माहितीअधिकाराचा चांगला उपयोग केला आहे. सलील कुलकर्णी यांनी. अवांतर : आपल्या मराठी माणसाची एकजुट आहेच, कुठे जॉइन वगैरे व्हायला नका सांगू राव. लै कंटाळा येतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sun, 01/03/2010 - 14:33 नवीन
चांगली माहिती. उत्सुकतेने भारतिय घटना कशी असते ते पाहुया म्हणून शोधले.http://indiacode.nic.in/coiweb/welcome.html PART XVII मध्ये ही माहिती आहे-- The official language of the Union shall be Hindi in Devanagari script. Official म्हणजे कचेरीसंबंधीत.तेव्हा national आणि official मधला हा घोळ आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या संस्था सोडल्या तर दुसरीकडे हिंदी वापरलेच पाहिजे असे तरी दिसत नाही. वर गळचेपी म्हंटले आहे ती कुठल्या संस्थांमध्ये होताना दिसते? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/20/2010 - 14:24 नवीन
भारताचे संविधान भाग सतरा प्रकरण एक संघराज्याची भाषा ३४३. (१) संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल.संघराज्याच्या शासकीय प्रयोजनांसाठी वापरावयाच्या अंकाचे रुप हे भारतीय अंकाचे आंतरराष्ट्रीय असेल. (२) खंड (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षाच्या कालावधीपर्यंत, संघराज्याच्या ज्या शासकीय प्रयोजनासाठी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी इंग्रजी भाषा वापरली जात होती. त्या सर्व प्रयोजनांसाठी तिचा वापर चालू राहील. परंतु, राष्ट्रपतीला उक्त कालावधीत १ आदेशाद्वारे, संघराज्याच्या शासकीय प्रयोजनापैकी कोणत्याही प्रयोजनाकरिता इंग्रजी भाषेच्या जोडीस हिंदी भाषेचा आणि भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय रुपाच्या जोडीस देवनागरी रुपाचा वापर प्राधिकृत करता येईल. (३) या अनुच्छेदात काहीही अंतर्भूत असले तरी, संसदेला कायद्याद्वारे उक्त पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर त्या कायद्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनासाठी - - (क) इंग्रजी भाषेचा, किंवा (ख) अंकाच्या देवनागरी रुपाचा, वापर करण्याकरता तरतुद करता येईल. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- II विकास II, घटनेत हिंदीचा राजभाषा म्हणून उल्लेख आहे. आता हिंदी ही राजभाषा नाही. याबाबत घटनेत दुरुस्ती झाली तर कधी झाली असे विचारले पाहिजे. नसेल झाली तर ''संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल'' त्यामुळे माहिती अधिकार्‍याला पुन्हा पत्र लिहून विचारले पाहिजे. किंवा त्याबाबत अधिक खुलासा झाला पाहिजे असे वाटते. महाराष्ट्रात तर प्रादेशिक भाषा म्हणून मराठी बोलल्या जाईल यात वाद नसावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा