जे न देखे रवी...

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

Primary tabs

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

अता उराशी कसा धरावा किरण तरी मी
दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो..
तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ...
तरी कशी पावलांस या ओढ लागलेली?
पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी..
असाच चकवा मला तरी का छळून गेला?

कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?
तयास शब्दात मोकळे मी करुन गेलो..
असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा..
तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो...

कुणी तुझे नाव घेतले अन् उदास झालो ..
जरी किनारे कितीक आले पुढ्यात माझ्या
तरी तयां डावलून मी का निघून आलो?...
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

सुट्यासुट्या ओळी छान आहेत.

अवांतर:
ह्या चित्तरचा कवी रंजनशी काही संबंध नाही, हे निक्षून सांगावेसे वाटते.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

असाच यावा भरून डोळा कधी ढगाचा..
तसाच मीही कधी अवेळी झरून गेलो...

छान. खूप आवडल्या ह्या ओळी.

- सर्किट