Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छंद दे..

प — प्राजु, Tue, 01/12/2010 - 19:02

प्रतिक्रिया द्या
4459 वाचन

💬 प्रतिसाद (22)
श
श्रावण मोडक Tue, 01/12/2010 - 19:44 नवीन
तिसरी आणि पाचवी द्विपदी वगळून परत वाचली. त्या दोन द्विपदी कुठं तरी गुणगुणताना खटकल्या. 'आक्रंद' हा शब्दही नेमका त्या द्विपदीत काय अर्थाने येतो हे कळले नाही. हे अपवाद सोडले तर... रचना आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/14/2010 - 16:49 नवीन
श्रावणजी, कदाचित व्यक्त करताना मी कमी पडले असेन. भावाना आता बोथट होत आहेत, ते मला नको आहे. जी काही वेदना, दु:ख आहे ते व्यक्त करण्यासाठी माझ्या उरी आक्रंद दे.. तापलेला भूमीला तृप्त करणारा पावसाचा धो धो कोसळ नको.. पण चार शिंतोडे उडले तरी खुलून येईल असा मृदगंध दे.. असं मागणं आहे. थोडक्यात बस इतना सा ख्वाब है! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/14/2010 - 17:14 नवीन
आक्रंद पूर्ण उमगला आता. कोसळ शब्दावर अडलो, अर्थात, तुम्हाला काय म्हणायचे आहे तो भाव मात्र पूर्ण लक्षात आला. आत्ता आक्रंद पुन्हा वाचताना रचना आवडली या प्रतिक्रियेत वाढ झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु गुरुवार, 01/14/2010 - 17:40 नवीन
:) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रशांत उदय मनोहर Fri, 01/15/2010 - 08:43 नवीन
प्राजक्ता,
कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..
इथे मात्रांची संख्या बरोबर आहे पण यतिभंग झाल्यामुळे लोच्या झालाय. पहिल्या ओळीत "कोसळ नको" ऐवजी "नको कोसळ" केल्यास ताल सुधारेल. श्रावण मोडक,
रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..
या कडव्यात ताल बिघडलेला नाही. पहिल्या ओळीत "जोडूनी" या शब्दाकडे नीट लक्ष्य द्या. तो "जोडुनी"सारखा वाचल्यास लोच्या होईल. (जो च्या २, डू च्या २ आणि नी च्या २ मात्रा आहेत त्या तशाच वाचल्या तर तालात बसतंय.) दुसर्‍या ओळीत "प्रेमऽबंध" मधला "ऽ" महत्त्वाचा आहे. मात्रांचं गणित या अवग्रहामुळेच जमतं. असो. कविता आवडली. आपला, (छंदबद्ध) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Fri, 01/15/2010 - 22:20 नवीन
धन्यवाद प्रशांत. नको कोसळ.. हे एकदम जमते आहे. सुधारणा करते. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
प
प्रभो Wed, 01/13/2010 - 01:54 नवीन
मस्त गं... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 01/13/2010 - 01:58 नवीन
छंद फावल्या वेळात करतात. ती आवड असते. तेच जिवन झाल तर त्यापेक्षा उत्तम ते काय? मीनल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 01/13/2010 - 03:08 नवीन
छान आहे काव्य. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/13/2010 - 19:40 नवीन
रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे .. सुंदर रचना... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 01/14/2010 - 06:57 नवीन
अतिशय सूंदर रचना... आवडली...!
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 01/14/2010 - 09:06 नवीन
भावोत्कट रचना आवडली ....अप्रतिम मला छंदाबिंदात काही जमत नाही हो काय करावं...?
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/14/2010 - 15:47 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी गुरुवार, 01/14/2010 - 17:41 नवीन
कविता अत्यंत आवडली.. भावना फारच तरल आहेत.. आणि शेवटच्या ओळीतला ट्विस्ट तर छान च आहे... (अवांतर - छंद फावल्या वेळातला हा एक अर्थ झाला... कधी कधी तो सारे आयुष्य देखील व्यापतो.. उदा. लागलासे छंद.. मुखी गोविंद गोविंद..) श्रावण जींच्या प्रतिक्रिये वरुन खालील सुचले.. अर्थात कवयित्रि ची प्रथम क्षमा मागतो कारण मी काही सुचवावे हा माझा अधिकार मुळीच नाही.. फक्त जे सुचले ते लिहिले.. कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे.. -- झोड हस्ताची नको रे, तापलेल्या या धरेला .. चार थेंबानी खुले तो, आगळा मृदगंध दे.. बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू? वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे.. -- वेदनेच्या कंपनांनी, बधीर ना व्हावे कधी, वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे.. रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे .. -- रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको दरवळे जो जीवनी तो, प्रेम-रस मकरंद दे..
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/14/2010 - 17:46 नवीन
सुचवणी आवडली. मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 01/14/2010 - 19:04 नवीन
स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे. सुंदर ..नेहमीप्रमाणे
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 01/16/2010 - 05:43 नवीन
"मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.." सुंदर ओळी :-) Image removed.Image removed.Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sat, 01/16/2010 - 06:10 नवीन
विडंबन सुधारण्यासाठी मलाही काही वरील प्रमाणे सुचना द्या!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 01/18/2010 - 09:45 नवीन
सुरेख कविता !
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Mon, 01/18/2010 - 12:29 नवीन
शेवटचे कडवे : स्तोम नाही प्रार्थनेचे , आसही कसलीच ना , लीन मी आजन्म व्हावे.....आगळा हा छंद दे ! मी तुम्हाला काहे सुचवणे हे म्हणजे काजव्याने सूर्याला जरा प्रकाश वाढव असे म्हणण्यासारखेच आहे नाही?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/18/2010 - 17:36 नवीन
आपण सुचवलेला बदल ही चांगला आहे. नक्की विचार करेन. आनंदयात्री भाऊ, आपलेही आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/20/2010 - 16:12 नवीन
स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे.. क्या बात है ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा