Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

प
पाषाणभेद
Fri, 01/15/2010 - 03:35
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4107 वाचन

💬 प्रतिसाद (15)
भ
भटकंती अनलिमिटेड Fri, 01/15/2010 - 14:38 नवीन
माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
का कॅमेराच्या सेन्सरच्या मुळावर उठलात? -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Sat, 01/16/2010 - 12:09 नवीन
बरोबर आहे. मी एक्स रे फिल्म कॅमेर्‍याच्या लेन्ससमोर धरून हे फोटो काढले. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड
J
jaypal Fri, 01/15/2010 - 14:47 नवीन
सहमत. कॅमेराचा सेन्सर सेन्सलेस होइल. डायरेक्ट सुर्यप्रकाश, तिव्र उजेडाची रोशनाई ई.प्रकार डिजिटल कॅमे-याने टाळावेत अन्यथा हात चोळावेत. :-( *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
संजा Fri, 01/15/2010 - 15:20 नवीन
सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग ऊद्या सकाळी पहा संजा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 01/15/2010 - 21:05 नवीन
सर्वांना धन्यवाद. अर्थातच डिजीटल कॅमेरा वापरणे चुकीचे आहे. सहमत. दुरदर्शन हे उत्तम माध्यम आहे यासाठी. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/15/2010 - 22:15 नवीन
कोणी सुर्यग्रहण पाहीले का? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 01/17/2010 - 14:48 नवीन
मी ५ रु ला मिळणार्‍या खास चष्म्यातून आणि दूरच्या भिंतीवर कवडसा पाडून दोन्ही प्रकारे पाहिले. पण वेल्डर लोक वापरतात त्या काचेतून पाहणे चांगले व पुरेसे सुरक्षित असते. खासचष्म्यातून स्पष्टता कमी होते. Image removed. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रवि Fri, 01/15/2010 - 22:26 नवीन
आमचं एक वरतिमागुन घोड घ्या....... सगळ्यात सोपा पर्याय म्हनजे.......एक छोटा आरसा घ्या, त्यावर एक लहान गोलाकार अथवा चौकोनी भोक असलेला कागद चिटकवा. आनि हा आरसा उन्हात धरुन कवडसा भिंतिवर सोडा. आनि मग भिंतिवरच्या प्रतिमेचे हवे तेवढे फोटो घ्या. हे बघा ...... Image removed. आनि फोटो पन ...... Image removed. रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/16/2010 - 14:44 नवीन
आम्हीबी...दुर्बीणीच्या साह्याने घरातल्या भिंतीवर प्रतिमा पाहिल्या. Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवि
प
पाषाणभेद Sat, 01/16/2010 - 15:46 नवीन
छायाचित्रे डकवल्याबद्दल धन्यवाद. हो पण तरीही अशा कोणत्या पद्धतीलाही आक्षेप घेतल्याचे मला आठवते. तुम्ही हे ग्रहण पाहिलेच आहे अन त्यामुळे तुम्हाला ईजा तर झालेली नाही. तरीही ही योग्य पद्धत आहे का? ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
रवि Sun, 01/17/2010 - 12:50 नवीन
अर्थात, या पद्धतित काहीही धोका नाही. कारण आपण सुर्याकडे न बघता पडद्यावर टाकलेल्या प्रतिमेकडे बघत असतो. त्यामुळे डोळ्यांना कुठलिही इजा होउ शकत नाही. आनि तुम्ही जो आक्षेप म्हनताय तो नककी कशासाठी, त्यामुळे काही इजा होउ शकते असं की नक्की काय ? आक्षेप नक्की कुठल्या मुद्दावर आहे.....?? रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/17/2010 - 13:19 नवीन
>>आक्षेप नक्की कुठल्या मुद्दावर आहे.....?? हेच विचारतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवि
प
पाषाणभेद Sun, 01/17/2010 - 15:12 नवीन
या पद्धतीतही सुर्याचे किरण डोळ्यात जातात त्यास आक्षेप होता. पण मला वाटते तुमची पद्धतच योग्य आहे. त्यात गॉगच्या काचेचाही रंग मिसळत नसल्याने मिळणारी प्रतीमा जास्त नैसर्गीक आहे. पुढील ग्रहणात हिच पद्धत अवलंबणे योग्य होईल. - पाभे/ दफो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चतुरंग Sun, 01/17/2010 - 16:04 नवीन
थेट किंवा भिंगातून्/काचेतून डोळ्यात गेल्यास इजा होण्याची दाट शक्यता असते. शिवाय अशी इजा झालेली आहे हे लगेच समजत नाही हा त्यातला आणखी वाईट प्रकार आहे. प्रखर अतिनील किरणांमुळे रेटीनावरचे कोन्स आणि रॉड्स जळतात आणि काही दिवसांनी दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे, अंधारात नेहेमीपेक्षा अचानक कमी दिसायला लागणे असे सुरु होते असे नेत्रतज्ञ डॉ. लहाने यांचे लिखाण दोन तीन दिवसापूर्वीच्या सकाळमध्ये वाचनात आले! कागदावरुन किंवा भिंतीवरुन परावर्तित झालेली प्रतिमा तशी धोकादायक नसते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/18/2010 - 10:52 नवीन
घ्या आणखी एक वरातीमागून घोडं; फिल्टरशिवाय काढलेला फोटो: Image removed. अदिती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा