Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही तरी करायचे आहे ?

स
सांगलीचा भडंग
Sun, 01/17/2010 - 01:55
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5916 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अमृतांजन Sun, 01/17/2010 - 02:40 नवीन
तुमचे विचार तुम्ही प्रामाणिकपणे मांडले आहेत. हो, सगळ्यांना वाटते की आपणही काही करावे. माझी मते.- १. हा किडा प्रत्येक इंजिनियरच्या डोक्यात जरी वळवळत नसेल तरी ८०% हे प्रमाण मानायला हरकत नसावी. २. बिझनेसमधे जितक्या लवकर उडी माराल तितकी चांगली. शक्यतो तुम्हाला डिग्रीनंतर २ ते ३ वर्षात बऱ्यापैकी प्रॅक्टीकल ज्ञान येते- उदा- मेकॅनिकल इंजि असाल तर मशिनचे प्रकार, त्यांनी होणारी कामे, कॉस्टींग, इस्टीमेट, प्रॉफिट मार्जिन, कच्चा माल कुठे मिळतो, मार्केट कुठे आहे, ई. तितके ज्ञान व्यवसायात उडी घेण्यास पुरेसे असते. ३. शक्यतो एकदम नोकरी सोडून बिझनेस करु नये. ४. २ ते ३ वर्षे बिझनेस मधून काहिच मिळणार नाही हे गृहीत धरा ५. एकदम मालक व्हायची स्वप्ने पाहू नका- तुम्हीच एकटे व्यवसाय चालू करा मग तुमची बॅन्डविड्थ १६/२४ तासांपेक्षा जास्त वापरली जाऊ लागली की, स्टाफचा विचार करा. तो पर्यंत घरातील मेंबर्स कडून शक्य तितकी श्रम-मदत घ्या. ६. कोणीही व्यवसायीक होऊ शकते. ७. तुमची आताची नोकरीची कंपनी/ कार्यालय तुमची असती तर तुम्ही कशी मॅनेज केली असती ते विचार करा ८. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा व बॅंकांना भेटून ते कर्ज देतील का? किती व्याजदर असेल वगैरे गोष्टींची चौकशी करा. ह्या सगळ्या कामालाच तुम्हाला १ ते २ वर्षे लागून जातील. ९. काहिच साध्य झाले नाही तरी तुमची मॅच्युरीटी नक्कीच वाढेल व नोकरीत त्याचा निश्चीत फायदा होईल.
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sun, 01/17/2010 - 04:56 नवीन
माझ्या वर्गातील ६० पैकी ८०% लोकं बिलो-ऍव्हरेज होते; त्यातील ५०% लोकांचे आज सुस्थितीतील व्यवसाय आहेत. जे खूप हुषार होते ते ....यु नो व्हाट आय मीन. अनेक अशिक्षीत लोक- ज्यांना शाळा-कॉलेजने नाकारलं- व त्यांना नोकऱ्याही मिळू शकल्या नाहीत- असे कित्येकजण आज व्यावसायिक आहेत.
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 01/18/2010 - 21:09 नवीन
ज्यांना शाळा-कॉलेजने नाकारलं- व त्यांना नोकऱ्याही मिळू शकल्या नाहीत- असे कित्येकजण आज व्यावसायिक आहेत.
हा हा हा.ज्यांची कुठेही शिजली नाही त्यांनी व्यवसाय काढले असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तुमच्या हिशेबा प्रमाणे भारतातील ८०% विद्यार्थी जर भारतात व्यावसायीक होत असतील (अर्थात तुम्ही यशस्वी वगैरे काही लिहले नाही आहे, कसला व्यवसाय तेही नाही.) तर भारत जगाची आर्थीक महासत्ता २०-२५ वर्षे आधिच झाला असेल नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अरुण मनोहर Tue, 01/19/2010 - 01:09 नवीन
>>>तुमच्या हिशेबा प्रमाणे भारतातील ८०% विद्यार्थी जर भारतात व्यावसायीक होत असतील<<< अमृतांजन ह्यांचा हिशेब असा आहे हा शोध तुम्ही कसा लावला बुवा? अमृतांजन ची मी वाचलेली संबंधीत वाक्ये अशी आहेत. चु.भु.घ्या.द्या. >>>१. हा किडा प्रत्येक इंजिनियरच्या डोक्यात जरी वळवळत नसेल तरी ८०% हे प्रमाण मानायला हरकत नसावी.<<< --भारतातील ८०% विद्यार्थी व्यावसायीक होतात असे लिहीले नाही. >>>माझ्या वर्गातील ६० पैकी ८०% लोकं बिलो-ऍव्हरेज होते; त्यातील ५०% लोकांचे आज सुस्थितीतील व्यवसाय आहेत. <<< --म्हणजे वर्गातील ६० पैकी ८०% बिलो एव्हरेज. त्यापैकी सुस्थितील व्यवसाय असणारे ४०%. --त्यांचा वर्ग म्हणजे भारताचा प्रातिनिधीक गट मानावा असे तुम्हाला म्हणायचे आहे कां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 01/19/2010 - 02:21 नवीन
त्यांचा वर्ग हा जर प्रातिनिधिक मानु नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या उदाहरणाचे कारण कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ख
खादाड Sun, 01/17/2010 - 12:49 नवीन
ज्याच्यासाठि degree मिळाल्यावर नोकरी तयार आहे तो फार क्वचित धन्दा करण्याचा विचार करतो ! आणि family business बद्द्ल मला तरी अस वाट्त कि ज्या पोरानी बापाला struggle करताना पहिल आहे आणि त्याच्यामुळे घरात problems फेस केले आहेत तो नोकरी करणे जास्त पसन्त करेल!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 01/17/2010 - 13:59 नवीन
बर्‍याच जणांच्या मनात येतं. बिझिनेस कधी सुरु करावा ह्याबद्दल मतं वेगवेगळी असतील कारण तुमचं वैयक्तिक कौशल्य, तुम्ही ठरवलेला बिझनेस, भांडवल, जागा, मार्केट इ.चा विचार हा किती ठोस आहे त्यावर तुम्ही उडी कधी मारायची हे ठरतं. माझी मते- १ - शक्यतोवर अशी नोकरी बघा की तिथे तुम्हाला निरनिराळ्या जबाबदार्‍या घेता येतील. तुमच्या कागदोपत्री कामात जरी त्याचा समावेश नसला तरी तीही कामे आवर्जून करा. २ - फक्त ऑफिसचे काम न करता बाहेरच्या जगाशी संपर्क असेल अशी कामेही असूद्यात - परचेस, सेल्स, कस्टमर सपोर्ट, व्यवसायातले स्पर्धक, जाहिरात इ. त्याने तुमची पडद्यामागच्या गोष्टी समजून घ्यायची कुवत वाढते. ३ - तुम्ही जिथे नोकरी करता आहात तिथेच तुम्ही एखादे पुरवठादार म्हणून काम सुरु करु शकता का ह्याची चाचपणी करा उदा. माझ्या एका मित्राने तो काम करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉवर सप्लाय बनवणार्‍या कंपनीतलीतलीच छोटी छोटी कामे स्वतःच्या उद्योगात करायला सुरुवात केली. जुन्या कस्टमर्सच्या सरप्लस ऑर्डर्स जी त्याची मोठी कंपनी पूर्ण करु शकत नसे त्या तो पूर्ण करायचा. असे त्याने जवळपास ३ वर्षे केले. धंद्यात जम बसला, नाव झाले, थोडे पैसे मिळू लागले मगच स्वतःची मोठी कामे सुरु केली. ४ - कामातला प्रामाणिकपणा आणि सचोटी. ही हवीच. पूर्ण बुडून जाऊन काम करायला हवे. त्याकरता इतर नोकरीवाल्या मित्रांना थोडे लांब काही काळ ठेवावे लागेल कारण तुम्हाला ठराविक वर्किंग अवर्सची बांधिलकी परवडणारी नसते! ५ - पैसा फिरता ठेवणे - कामातून आलेला पैसा हा पुन्हा कामातच जायला हवा. तुम्ही तुमच्याच कंपनीत नोकरी करत असलात तर किती पगार घेतला असता तेवढेच पैसे पगार म्हणून घ्या, काटकसरीने भागवा. लोक तुम्हाला काय म्हणतात ह्याकडे चक्क दुर्लक्ष करा! बहुतेक वेळा मराठी माणसाचा धंदा बुडण्याचे कारण तो धंद्यातले पैसे 'स्वतःचे' म्हणून वापरायला काढतो आणि त्याला स्टेटस दाखवण्याची घाई झालेली असते त्यामुळे भांडवलाचा गळा आवळला जाऊन धंदा अकाली घुसमटतो! ६ - खर्च नियंत्रित ठेवा. सेकंडहँड मशीनरी, सेकंडहँड दुचाकी वापरा. जुन्या बाजारात अतिशय चांगली इक्विपमेंट्स, अवजारे असतात तुमच्या कामासाठी लागणारी अशी साधने अतिशय अल्प किमतीला तुम्हाला मिळू शकतात, जुजबी दुरुस्तीनंतर ती तुमच्या कामी येतात. फक्त जरा माहीतगार अनुभवी व्यक्ती तुम्ही सोबत न्या कारण तिथेही भरपूर चालबाजी असते! ७ - कस्टमर लोकांचे फसवणे, पैसे न देणे. हे अनुभव काही वेळा येणारच त्याने हटून चालणार नाही. पण असे लोक ओळखायला शिका. साधारणपणे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक समान धागा असतो. त्यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता. त्यांना माल देणार्‍या इतर ठिकाणी चाचपून बघू शकता.. ८ - तारतम्य - परखड मत कुठे व्यक्त करायचं आणि गोड कुठे बोलायचं हे समजणं ह्यात धंद्याचं निम्मं यश असतं! ९ - 'नथिंग इज फ्री इन थिस वर्ल्ड' हा मंत्र विसरू नका! सध्या इतकेच. तुम्हाला शुभेच्छा!! चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sun, 01/17/2010 - 14:46 नवीन
असे सगळ्यांना वाटते का कि आपण कि काही करावे ? मला तरी वाटते. Network 18 तर्फे Entrepreneur हे मासिक भारतात प्रसिद्ध होतें. नोव्हेंबर/०९ चा अंक वाचण्यासारखा आहे. ५०,००० रुपयांमध्ये तुम्ही कुठले व्यवसाय करु शकता ह्याची त्यांनी तपशीलवार माहिती दिली आहे. किडा अजुनही वळवळत असेल तर- आपली उपजत आवड आणि मिळणारा अनुभव्/कौशल्याच्या बळावर खालील व्यवसाय करता येतील. १)शिकवणी घेणे-Tutoring service, हा शब्द छान वाटतो!!.दहावीच्या विद्यार्थ्यांपासुन ते पदवीधर होइपर्यंत अनेक जण शिकवणी लावतात्.मोठ्या शहरांत काही जण तासाला ३०० रुपये शिकवायला घेतात.स्पर्धात्मक परीक्षांसाठी लोक जेवढी फी देतात ते पाहिलेत तर हा व्यवसाय खूप तेजीत आहे हे लक्षात येईल. २)दुचाकी निरोप्या से॑वा- काही पाश्चिमात्य देशांत ही bicycle messenger service लोकप्रिय आहे.सहसा कुरियर कंपन्या कुरियर शहरातल्या शहरात पोचवायलाही २४ तास घेतात्.भारतात अजुनतरी अशी सेवा नसावी.गर्दीच्यावेळी सायकल लवकर जावू शकते,पार्किंगचे वगैरे अडथळे नसतात्.प्रत्येक कुरियरमागे २०-२५ रुपये कमीशन घेतले ,५० कुरियर पोचवली तर ४५,००० रुपये महिन्याला मिळू शकतात. ३) Wedding planner(विवाह आखणी?)-१,९०,००० कोटी रुपयांची भारतात उलाढाल असलेला हा व्यवसाय कायम तेजीत राहणारच्. लेंमॅन ब्रदर्स कोसळोत वा पुन्हा उभे राहोत, विवाह होणारच!! अन्न पुरवण्याचा व्यवसाय्,सजावट अशा अनेक उपव्यवसाय त्यात आहेत. बरेचजण प्रसंग व्यवस्थापनाचा कोर्स करतात. ४)ज्येष्ठ नागरिक सेवा-नोकरी धंद्या निमीत्त ज्यांची मुले घरापासून दूर आहेत अशा ज्येष्ट नागरिकांना सेवा पुरवणे.ह्यांत भांडवल कमी लागेल.विश्वासू माणसे हाताखाली हवीत. आय.टी.त असाल तर web-startup चालु करता येईल पण आयडिया चांगली हवी आणि तंत्रज्ञान चांगले अवगत पाहिजे. Start with small and simple असे जाणकार म्हणतात.! भेंडी. P = NP
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 01/17/2010 - 15:45 नवीन
चांगला धागा. बरीच माहिती कळली. पण मी स्वतः या भानगडीत पडण्याची शक्यता तशी कमीच वाटते. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Mon, 01/18/2010 - 06:40 नवीन
धन्यवाद अमृतांजन चतुरंग आणी भेंडीबझार ... मनापासून इंटरेस्ट घेवून जर कोणी केला व्यवसाय करणार असेल तर तो व्यवस्थित/चांगला/ नफा देणारा व्हायची शकयता जास्त आहे .एखादे काम करण्याची प्रबळ इच्छा आणि आणि एखादे काम योग्य रीतीने करण्याची क्षमता या वेगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे बिझनेस व्यवस्थित व्हायला चांगली आईडिया आणि त्या आयडिया वर काम करण्याची क्षमता दोन्ही पाहिजे ...पण शेवटी थोडी रिस्क घेतल्याशिवाय कसे कळणार.. मी खालील फोर्मुला असेच नेट वर वाचत असताना कुठे तरी पहिला होता आणि तो एकदम पटला बिझनेस = आईडिया X एक्ज़िक्युशन वाईट आईडिया= -1 साधारण आईडिया=1 उत्तम आईडिया = 5 उत्तम एक्ज़िक्युशन = १,००,००,००० साधारण एक्ज़िक्युशन = १०,००,००० वाईट एक्ज़िक्युशन=१०
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Mon, 01/18/2010 - 16:05 नवीन
अल्केमिस्ट हे पुस्तक जे सांगते, ते आचरणात आणणे फार महत्वाचे ठरते. बिझनेस करतांना मन एकाच गोष्टीत गुंतून चालत नाही, बिझ-स्टॅटेजी जिथे संधी त्याप्रमाणे लवचिक ठेवणे हिताचे ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग
आ
आनंद Mon, 01/18/2010 - 18:55 नवीन
माझा Orbital welding machine & special purpose welding machines व्यवसाय आहे. मना पासुन वाटत असेल तर व्यवसाय करावाच. व्यवसाय करण्यासाठी पॅशंस खुप लागतात. काही तरी वेगळ ,आणि स्पर्धा नसलेल प्रॉड्क्ट हुडकुन काढावे. स्वत:च प्रॉडक्ट असाव. एकाच कंपनी वर कधी ही अवलंबुन राहु नये. एकाच प्रॉड्क्टवरही अवलंबुन राहु नये. खर तर खुप काही लिहण्या सारख आहे. पण नंतर कधी तरी लिहीन. आनंद
  • Log in or register to post comments
अ
अभिशेक गानु Tue, 01/19/2010 - 03:18 नवीन
मित्रा..तू व्यक्त केलेले विचार बर्याच औंशी माझ्या विचान्र्शी जुळतात.कारण मी पण तुझ्याच क्षेत्रात काम करत असून..माझे पण वय साधारण तितकेच आहे ...माझ्या पण डोक्यात असाच किडा वळवळत आहे.!!.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा