Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आम्हाला मेट्रो हवी आहे- आमचे प्रश्न सोडवणारी

अ
अमृतांजन
Fri, 01/22/2010 - 02:12
🗣 70 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15250 वाचन

💬 प्रतिसाद (70)
स
सुधीर काळे Sat, 01/23/2010 - 17:57 नवीन
पेट्रोल-डिझेल इंजिनांपेक्षा वीजनिर्मिती करणारी जनित्रे जास्त कार्यक्षम असतात. त्यामुळे गृहीत किलोवॅटअवर मागे प्रदूषण नक्कीच कमी होईल (Pollution for a given MW production or a given kWh consumption will surely reduce) ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 01/24/2010 - 05:20 नवीन
>>पेट्रोल-डिझेल इंजिनांपेक्षा वीजनिर्मिती करणारी जनित्रे जास्त कार्यक्षम असतात मुळातूनच चूक. वीजनिर्मिती मुख्यत्वे कोळशावर होते. कोळसा- उष्णता - वाफ - वाफेचे इंजिन- जनित्र - वीज - वीज वहन - मोटर - यांत्रिक शक्ती एवढ्या लांबलचक मार्गापेक्षा पेट्रोल/डिझेल - उष्णता - यांत्रिक शक्ती हा मार्ग अधिक कार्यक्षम असावा. तसेही बाह्यज्वलन इंजिनापेक्षा अंतर्ज्वलन इंजिने जास्त कार्यक्षम असतात. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sun, 01/24/2010 - 10:16 नवीन
मी मोटरगाड्यांमधल्या इंजिनांबद्दल लिहिले आहे जी वेगवेगळ्या वेळी (गरजेप्रमाणे) कमी-जास्त वेगाने चालवावी लागतात व त्यामुळे ती कमी कार्यक्षम असतात. या उलट वीजनिर्मिती करणारी उपकरणें optimum conditions मध्ये चालविली जातात त्यामुळे overall efficiency जास्त असते असे मला वाटते. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 01/24/2010 - 14:25 नवीन
वीज निर्मिती करणारी उपकरणे ऑप्टिमम कंडिशनला फार कमी वेळ चालतात. overall efficiency जास्त असते ती इंधन ते वीज निर्मिती या भागात. ती सुद्धा कोळशाच्या उपकरणाची नाही. पुढे त्याविजेचे वहन, त्यावर मोटर चालवणे यात मिळणारी efficiency अजून कमी होते. मेट्रोसाठी तयार केलेल्या खास मार्गावरून बससेवा चालवली (एलेवेटेड - भुयारी मार्गाने बस चालवता येणार नाही) तर जास्त फायदा होईल. बससाठी वेगळी मार्गिका ठेवण्याची कल्पना यशस्वी झाली नाही पण अशा मुद्दाम बनवलेल्या मार्गांवरून बसेस चालवल्या तर ते यशस्वी होऊ शकेल. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 01/23/2010 - 18:09 नवीन
माझा आक्षेप प्रदूषण कमी होईल अशा सहजपणे केल्या दाव्याबाबत आणि त्यासाठी अशा प्रकल्पांना दिल्या जाणार्‍या पाठिंब्याबाबत आहे
खरे आहे. तसेच एका ठिकाणी प्रदूषण कमी होण्याकरता इतरत्र जनतेस वेठीस धरले जावे याबाबतही सहमत आहे. पण काही आकडेवारीच्या आधारावर चर्चा व्हावी जेणेकरून मत बनवता यावे. ............................... I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुधीर काळे Sat, 01/23/2010 - 07:22 नवीन
मेट्रोचा जो मार्ग आहे तो जमीनीखालूनच असणार व तिथे पाणी नक्कीच साचणार कारण पंप चालू कारायला हवेत अशी परिस्थिती आल्यास वीज असली पाहिजे व पुण्यात त्या बाबतीत आनंदी आनंद आहे! प्रभोंनी सांगितलेला 'मोनोरेल' हा पर्याय मलाही सर्वोत्तम वाटतो कारण तो जास्त उंचीवरून जातो व त्यामुळे पाणी साचून सर्वांची (म्हणजे प्रवासी व रेल्वे इंजिने, डबे वगैरे) वाट लागणार नाहीं. जकार्ताही असेच वारंवार पूरग्रस्त होणारे शहर आहे व इथेही मोनोरेल हाच उत्तम पर्याय आहे असे मानले जाते! मेट्रो किंवा मोनोरेल कशाला? तर रस्त्यावरून रेल्वे व बसेस काढून इतर रहदारी सुकर करण्यासाठी. दर दोन-तीम निनिटानी धावणार्‍या रेल्वेला पर्याय फारच कमी आहेत. वीजनिर्मिती शहरापासून दूर केली जाते त्यामुळे शहरात प्रदूषण होत नाहीं. तसेच वीजनिर्मिती करणारी उपकरणे डिझेल-पेट्रोल-गॅसवर चालणार्‍या इंजिनांपेक्षा जास्त कार्यक्षम (efficient) असतात. थोडक्यात प्रदूषण शहरांपासून दूर नेऊन जनतेचे स्वास्थ्य सुधारणे व शहरांच्या रस्त्यांवरून जाणारी वहाने कमी करणे हे दोन उद्देश नक्कीच साध्य होतील. मोठ्या प्रमाणावर वहातूक (Mass transit) करण्यासाठी रेल्वेला दुसरा पर्याय अद्याप तरी कुठला दिसत नाहीं. अमृतांजन मॅडमनी विषय सुरेख निवडला आहे. अभिनंदन! ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 01/23/2010 - 11:05 नवीन
खुप काळा नंतर एक छान चर्चा वाचनात आली. पुपेंशी पुर्ण पणे सहमत. सध्या मुंबईत जसे स्काय वॉकच्या फॅडचे पेव फुटले आहे तासाच हा मेट्रोचा फार्स वाटतोय. एकंदर मेट्रो उभारणीचा खर्च, विजेचा प्रश्न वगैरे बाबी लक्षात घेता जर तोच पैसा पि एम टी / पी.एम.पी.एम.एल लडे वळवला तर ते जास्त सोइस्कर होईल असे माझे मत आहे.कारण बसेस जिथे कोपर्‍या कोपर्‍या पर्यंत पोहचु शकतात तिथे मेट्रो पोहचु शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मि.इंडिया Sat, 01/23/2010 - 12:40 नवीन
चर्चेचा काय उपयोग आहे ? अडाणी जनतेच्या अडचणींपासून स्वतःची उन्नती साधण्यासाठी पालकमंत्री आहेतच. जाणत्या राजाच्या मार्गदर्शनाखाली ते पुण्याची योग्य काळजी घेतील असा आम्हा पुणेकरांचा विश्वास आहेच. उगाच अशा चर्चा करून त्यांना अडचणीत आणू नये. जास्त खोलात जाणार्यानी शेट्टी लक्षात ठेवावेत. प्रदीप
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 01/23/2010 - 19:37 नवीन
>>जास्त खोलात जाणार्यानी शेट्टी लक्षात ठेवावेत. मेट्रो / मोनो रद्द रे . विषय बदला. सायकल रिक्षा कशी वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया
स
सुधीर काळे Sat, 01/23/2010 - 12:41 नवीन
कोलकाता व दिल्ली येथील मेट्रोचा अनुभव काय आहे? मी स्वतः त्यांचा वापर केलेला नाहीं पण त्या सेवेबद्दल खूप स्तुती लोकांच्याकडून ऐकली आहे. आपल्या 'मिपा'समूहावर या शहरातले कुणी असल्यास जरूर त्याबद्दल कळवावे व चर्चेत प्रथमपुरुषी-एकवचनी रंगत आणावी. ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 01/23/2010 - 15:00 नवीन
कलकत्त्यातल्या मेट्रोतून प्रवास केला आहे. चांगली सर्विस वाटली. कलकत्त्यात पावसाचे पाणी भरलेले असूनही मेट्रोमध्ये पाणी नसते आणि मेट्रो चालू असते. दिल्लीतली मेट्रो वातानुकूलित आहे असे ऐकले आहे तशी कलकत्त्यातली नाही. पण ती जमिनी खालून जात असल्याने उन्हाने तापत नाही आणि तसा काही त्रास वाटला नाही. पण एसी नसल्याने खिडक्या उघड्या असतात आणि त्यामुळे फार नॉईज असतो. बोगद्यातून गाडी जाते तेव्हा येतो तसा. गर्दी मुंबईच्या लोकलच्या १/४ असेल. पीक अवरला ही चेंगराचेंगरी होत नाही. दरवाजे बंद होतात. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sat, 01/23/2010 - 17:48 नवीन
आभारी आहे! ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
I
II विकास II Sat, 01/23/2010 - 14:47 नवीन
रोचक चर्चा
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 01/24/2010 - 05:20 नवीन
मेट्रो -- मोठ्या साहेबांनी दुरदृष्टी ठेवुन आपल्या नंतर छोट्या साहेबांची केलेली पोटापाण्याची व्यवस्था !!
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 01/27/2010 - 12:08 नवीन
दुर्दैवानी आपण काहीच करत नाही आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अमृतांजन Tue, 01/26/2010 - 13:04 नवीन
http://www.parisar.org/urban-transport.html
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 01/27/2010 - 11:49 नवीन
ह्या दुव्यावर ह्या समस्येवर थोडी अधिक माहिती दिली आहे. आयाआयटी पवईनी दिलेला अहवाल ह्या दुव्यावर बघता येईल. शेवटी काय आहे ना.... तुम्ही बसेस चालवा... मेट्रो बांधा... मोनोरेल करा... बी आरटी करा...जमीनी वरून - खालून कसेही काहीही करा. पण किमान वर्षाला हजारो रुपये टॅक्स म्हणून तुमच्या घशात घालतोय त्यासाठी आम्हाला किमान घरून कचेरीत नीट पोचवायची / आणायची जबाबदारी घ्याच. सालो.... इतकी वर्षं तुमच्या वाट्टेल त्या सबबी ऐकत आलोय. "चुकून" बांधलेले फ्लायओव्हर्स, भो** वाजलेले रस्ते, सीवायजीच्या वेळी २४ तासांत केलेली रस्त्याची मलमपट्टी आणि अनेक गोष्टींना रोज २ वेळा तरी फकाफका धूर नाका-तोंडात घेत शिव्या मोजतोय. च्यायला... इतकी वर्ष स्वतःच्या तुंबड्या भरल्यात.... आता जरा कामं करा की ! अंत नका पाहू. वैतागून सगळे रस्त्यावर आलो ना.... तर काही धडगत नाही तुमची. लई लई राडा केलाय भाई न दादांनी.... एक दिवस मोटार अडवून भो****ला लागणार. (उद्विग्न) जेपी
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 01/29/2010 - 01:43 नवीन
माझे एक जुने तामिळ सहकारी श्री राजू इस्पातच्या पॉवर-प्लँटचे CEO होते व त्यांनी इस्पातच्या या प्रोजेक्टसाठी कुठली प्रोसेस निवडायची याचा खूप अभ्यास केला होता. त्यांना मी या विषयावर लिहिले होते. त्यांचे आंग्लभाषेत आलेले उत्तर खाली दिले आहे. त्यातून प्रत्येकाने आपापले तात्पर्य काढावे! मी विचारलेले प्रश्न इटॅलिक्स Italics मधे आगेत, राजूंची उत्तरें बोल्ड Bold अक्षरात आहेत. A) KBK: What is the average efficiency of Coal fired boiler-steam-turbine-generator: Mr. Raju: Average Coal fired Power Plant efficiency is around 35% KBK: What is the average efficiency of Diesel genset i.e diesel engine-Generator: Mr. Raju: Diesel engines operate at 45% fuel conversion efficiency, as opposed to gasoline units around 30%. C) KBK: What is the average efficiency of Diesel-fired boiler--steam-turbine-generator: Mr. Raju: There is little difference between gas and diesel fired boilers in terms of performance. The choice between gas and diesel is usually based on the comparative cost and availability of the two forms of fuel. D) KBK: What is the average efficiency of Natural gas fired boiler-steam-turbine-generator: Mr Raju: A typical Single-cycle gas turbine offer thermal efficiency of about 35–40%. Combined Cycle gas turbine plants are driven by both Natural gas & Steam. They generate main power by burning Natural gas in a Gas Turbine and use residual heat from exhaust gases to produce steam & generate additional electricity from steam. These plants offer efficiencies of up to 60%. E) KBK: What is the thermal 'average' efficiency of a 4-stroke petrol engine and a 4-stroke diesel engine that drives cars and trucks? (because a car/truck engine doesn't always run at optimum levels due to traffic conditions and traffic jams) Mr. Raju: I am not able to answer this point. KBK: To MiPa members: Can one of us calculate the efficiency of a car that runs 7-8 km in city traffic? F) KBK to Mr. Raju: This info is required for a comparison of adding a railway line to reduce number of motor vehicles on the road. If the traffic doesn't increase, will the electricity generated by one of the methods mentioned above will consume less fuel than a motor vehicle? Mr. Raju: For this end use, Diesel electric driven train is the best option, since the engine will run at optimum (Constant) speed and speed control of the vehicle can be managed electrically. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sat, 01/30/2010 - 06:47 नवीन
"Diesel electric driven train is the best option, since the engine will run at optimum (Constant) speed and speed control of the vehicle can be managed electrically." हा विचार मला खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
नितिन थत्ते Sat, 01/30/2010 - 07:58 नवीन
डीझेल इलेक्ट्रिक ट्रेन किंवा बस हा सर्वोत्तम उपाय आहे. पण डीझेल इलेक्ट्रिक ट्रेनला पुन्हा शहरात प्रदूषण या नावाखाली विरोध होईल. ही बस सुद्धा चांगली सेवा देईल असे वाटते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा