पाककृती
गाजर संत्र्याचे सुप (ऑरेण्ज कॅरट सुप)
Primary tabs
साहीत्य: गाजर, संत्र्याचा रस, मीठ, मीरपुड, सजावटी साठी दही व कोथिंबीर
कृती: कुकर मधे गाजर पाणी घालुन शिजवुन घ्या. थंड झाले की मिक्सर मधुन वाटुन घ्या. त्यात संत्र्याचा रस घाला.
हे सुप दाटसर ठेवा. चवीनुसार मीठ घाला. मध्यम आचेवर एक उकळी येउ द्या. हे सुप दाटसर ठेवा. वाढताना थोडंसं
दही, कोथिंबीर सजावटी साठी व मिरपुड चवीसाठी घाला.
(तेलावर कांदा, तमालपत्र, गाजर परतुन मग हे सर्व संत्र्याच्या रसात शिजवुन पण हे सुप बनवता येते.
पण मला साधंच जास्त आवडलं कारण गाजर व संत्र्याचि मुळ चव टिकुन राहते.)
अरे व्वा... गाजर + संत्रा. चवीला लयं भारी लागत असणार !!! :)
फोटु सुद्धा मस्त आला आहे. :)
(सुप प्रेमी)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
फोटो फारच जिवघेणा आहे......
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
फोटो फारच जिवघेणा आहे......
+२ सहमत!
सुरेख
हे कसे लागेल त्याची कल्पना करायचा प्रयत्न करतोय. पण फोटो खरंच छान आहे.
बिपिन कार्यकर्ते
मस्त पाकृ. साखर घालायची गरज नाही का? जिम मध्ये जावून हेल्थ मेंटेन करणार्या लोकांची ही आवडती पाकृ असावी. ;)
ह्या आठवड्यात करुन बघतो. सोपी वाटतेय.
भेंडी
P = NP
फोटो खूपच छान !!!!
माझ्या मुलाला सूपचे प्रकार फार आवडतात.हे बनवायलाही सोपं वाटतय आणि गाजर म्हणजे पौष्टीक पण आहेच,नक्की करून पाहणार.
मानस
फोटो पाहुनच वेडा झालोय. कसला तो टेंप्टींग रंग आलाय चवीलाही तितकच यम्मी असणार.
जबरी फोटो!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
धन्यवाद !!
गाजर आणि संत्रे यांचे काँबिनेशन कसे लागेल ठाऊक नाही पण चित्र तरी मस्त दिसतय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.