कलादालन

बर्फशिल्प

Primary tabs

'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ... बघा आवडतंय का ! ================================================================================ आज सकाळी ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी जायला निघाले खरी घरातून, पण कालपासून मनात चालू असलेल्या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पावलं (आणि गाडीची चाकं) त्या वेगळ्या दिशेला घेवून गेलीच :) गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात Plymouth Ice Spectacular हा बर्फशिल्पांचा (Ice Sculptures) मेळा बघण्याची संधी मिळाली होती आणि हा जानेवारी उजाडल्या पासूनच या वर्षीचा हा मेळा कधी आहे याच्या तारखांवर लक्ष ठेवून होते. २२-२३-२४ अशा तीन दिवस हा मेळा Kellogg Park, Downtown Plymouth, MI येथे चालू आहे. वेबसाईट आहे http://www.plymouthicefestival.org/ आम्ही म्हणजे फारतर बर्फाचा snowman बनवणार पण इथे सदर होतात त्या खऱ्या बर्फातून निर्माण केलेल्या कलाकृती. अगदी १० बाय १० फुटी सागरकन्या (Little Mermaid) असो की कुणीतरी टाकून दिलेल्या-आजारी आणि कुणा चांगल्या माणसाने औषधपाणी करून पुन्हा 'माणसात' आणलेल्या कुत्र्याचा पुतळा असो ... लहान मुलांचे आवडते cartoon characters, स्थानिक व्यवसायांचे logo, प्राणी, पक्षी ... बर्फाच्या तुकड्यातून साकारलेलं असं बरंच काही बघायला मिळतं इथे. तुम्हाला स्वतः यायला जमणार नसेल तर फोटो हाजीर है ! बर्फातली कारीगरी ... Image removed. Image removed. Image removed. गोठलेले क्षण Image removed. मिकी माउस Image removed. बिग बर्ड आणि सिसमी स्ट्रीट मधील मंडळी Image removed. खारुताई Image removed. हाच तो सुदैवी कुत्रा ... Image removed. नाच रे मोरा ... Image removed. आणखी काही कलाकृती ... Image removed. Image removed. Image removed. बर्फाचं सूर्यफुल Image removed. विचारवंत (The Thinker Statue by Auguste Rodin) Image removed. सागरकन्या Image removed. ( यापैकी काही बर्फ शिल्प २००९ जानेवारीतील आहेत तर काही आजच सकाळी टिपलेली )
चतुरंग

अतिशय कमालीची कलाकारी! आवर्जून दाखविल्याबद्दल धन्यवाद!
(कलाकारांशी काही बोलणे होऊ शकले का? किती वेळ लागतो साधारणपणे? वयाच्या कुठल्या वर्षी अशा शिल्पांना त्यांनी सुरुवात केली? काही फॉर्मल शिक्षण घेतले की आवडीतूनच? हत्यारे कोणती वापरतात? इ....)

चतुरंग

गणपा

मस्तानी इतकी छान प्रकाशचित्र काढुन हे बर्फाच्छादित क्षण आम्हा सर्वांसोबत शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

वा! चित्ताकर्षक, विलोभनीय बर्फशिल्पे.

हे सारे नजारे इथे सादर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

ओरिसात गेलेलो असतांना जगन्नाथपुरीत आम्ही किनार्‍यावरील वाळूशिल्पे पाहिली होती. जगभरही वाळूशिल्पे अनेक ठिकाणी तयार केली जातातच. मात्र अशी बर्फशिल्पेही घडवतात हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे.

आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

मदनबाण

व्वा...सुरेख कलाकृती साकारल्या गेल्या आहेत... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

सुनील

सुंदर कलाकृती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभो

मस्त आहेत शिल्पे.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

फार छान
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

मस्तानी

... बर्फशिल्प आवडली हे आवर्जून सांगणाऱ्या सर्वांचेच आभार !

श्री चतुरंग ... कलाकारांबरोबर काहीच बोलणे होऊ शकले नाही पण मनात असेच बरेच प्रश्न आहेत, बघू कधी संधी मिळते उत्तरे मिळवण्याची ...

श्री गोळे ... वाळू शिल्पांची आठवण खरंच मला पण झाली होती :)

असंच काही वेगळं मिळालं बघायला तर पुन्हा जरूर सर्वांबरोबर शेअर करेन इथे !