Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राजू परुळेकर : राजकीय पत्रकार ?

भ
भडकमकर मास्तर
Mon, 01/25/2010 - 21:14
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
39330 वाचन

💬 प्रतिसाद (58)
च
चिरोटा Mon, 01/25/2010 - 22:03 नवीन
परुळेकरांचे लोकप्रभातले personality cult छापाचे लेख वाचून पूर्वीच अंदाज आला होता. कुमार केतकरही हेच करतात. हे पत्रकार खरोखर **** आहेत की वाचकांना **** समजतात तेच कळत नाही. असो. लेखातूनच-
नितेश खूप समजूत असलेला, खोल माणूस आहे
खोल माणूस म्हणजे कसा?
मुख्य म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत शिवसेना टाइप नाही. त्या टाइपची झाक असली तरी मूलत: त्याची खोली काँग्रेससारखी आहे.
काँग्रेसची खोली हा काय प्रकार आहे? आपण काँग्रेस हाउस ऐकून आहोत.!!
तो कार्यक्रम एका समूह चर्चेसारखा होता. राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था याबाबत चर्चा होती. सर्व चर्चा छान झाली.
क्लास !!. नितेश राणे,प्रणिती शिंदे,पंकज भुजबळ्,पूनम महाजन ह्यांनी राज्य आणि देशाबद्दलची दूरदृष्टी आणि शासन संस्था ह्याबद्दल चर्चा केली!! ह्याचा अर्थ आता मी पण आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलू शकतो. :) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 01/25/2010 - 23:04 नवीन
लेखात मांडलेल्या निरीक्षणांशी सहमत आहे. काही नेत्यांशी असलेली सलगी सतत दाखवत राहणे, आपल्याभोवती स्वतःच आरती ओवाळून घेणे आणि बेधडक विधाने करणे हे त्यांचे अजून काही विशेष.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/26/2010 - 06:56 नवीन
अंडरस्टेटमेंट का काय म्हणतात ना ती हीच नंदनराव. हेच परुळेकर विचारवंत म्हणून उद्या पुढे येतील तेव्हा ही स्टेटमेंट अंडरस्टेटमेंट कशी आहे हे समजेल आपल्या सगळ्यांना. बादवे, मास्तर ती सही भोचक यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile Mon, 01/25/2010 - 23:33 नवीन
परुळेकरांनी जेव्हा सुरुवातीला राज यांची मुलाखत घेतली (अन छापली) तेव्हापासुनच राजु परुळेकर यांना वाचणे बंद केले. एकदा का पत्रकार 'पक्ष'पाती झाली की तो पत्रकार म्हणुन संपला. त्यापेक्षा मग पक्षाचे जाहिरनामे वाचलेले काय वाईट? ;)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 01/26/2010 - 01:14 नवीन
उपरीनिर्दिष्ट लेख आणि एकूणच परुळेकरांचं आजकालचं लेखन गंडलेलं आहे असे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Tue, 01/26/2010 - 02:46 नवीन
परूळेकरांचे लेखन अगदीच सुमार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 01/26/2010 - 03:01 नवीन
हा सरळ सरळ लाळघोटेपणा आहे. खरोखरच मराठी पत्रकारितेची अवस्था इतकी बिकट झाली आहे का? श्री मास्तरांच्या निरीक्षणांशी सहमत. ...................................... I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 01/26/2010 - 03:24 नवीन
उगवत्या सुर्याला नमस्कार....सरशी तिथे पारशी..और क्या?
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Tue, 01/26/2010 - 03:46 नवीन
राजू मूळातला गुणी पण बिघडला आताशा.. वरील सर्वांशी माझी सहमती.. बंडू बावळट.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 01/26/2010 - 04:16 नवीन
पूर्वीच्या काळी राजेमहाराजांच्या पदरी भाट,चारण वगैरे लोक बाळगलेले असत. जे त्यांच्या स्वामींची आरती/स्तुती गायचे. आजकालच्या काळात नेते/सत्ताधारी हे देखिल एकप्रकारचे राजे महाराजे आहेत आणि त्यांनी पदरी बाळगलेले पत्रकार म्हणजे त्यांच्या आरत्या गाणारे भाट. ह्या लोकांकडे फारसे गांभीर्याने पाहू नये. राजु परूळेकर ह्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. ते तर स्वत:ला फार मोठे राजकीय विश्लेशक समजतात पण प्रत्यक्षात ते 'राज'कीय पत्रकार आहेत. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/26/2010 - 04:31 नवीन
मास्तर निरिक्षणाशी सहमत. लोकप्रभेचा लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यु....!!! पत्रकारांना आपले कोणाशी कसे घनिष्ट संबंध आहेत हे दाखविण्याची खाज असतेच, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राजू परुळेकर असावेत.[अजूनही असतील असेच] असो,... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/26/2010 - 04:37 नवीन
आधी हौसेने ते सदर वाचायचो. आत कुठे पटत नसतांनाही सगळे भारी म्हणतात म्हणुन तोंडदेखली का होईना मान हलवायचो ! पण आता मात्र अती झालेले आहे, दोनेक महिन्यांपासुन त्यांना वाचणे बंद केलेय, आपल्यातला केतकर म्हणुन दुर्लक्ष .. इतकेच.
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Tue, 01/26/2010 - 05:17 नवीन
>>सगळे भारी म्हणतात म्हणुन तोंडदेखली का होईना मान हलवायचो ! का?! ह्या लेखकांचीही काही बांधिलकी आहे; अकोंटीबिलीटी आहे. आणि त्यांना आपण धारेवर धरले पाहिजे, नाही का? महाराश्ट्रात १९९७ पासून दोन लाख शेतकर्यांनी आत्म्हत्या केल्या आहेत; हा आकडा देशात सर्वाधीक आहे. (हा दुवा) असे चित्र असताना परूळेकरांच्या बालिशपणाचा आणि लाळ्घोटेपणाचा तिरस्कार करावा तेवढा कमि च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
बंडू बावळट Tue, 01/26/2010 - 04:41 नवीन
ह्या चर्चेचा दुवा राजूला त्याच्या विरोप पत्त्यावर कळवला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/26/2010 - 04:47 नवीन
>>ह्या चर्चेचा दुवा राजूला त्याच्या विरोप पत्त्यावर कळवला आहे. शाब्बास...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडू बावळट
म
मदनबाण Tue, 01/26/2010 - 05:14 नवीन
श्री.बावळट, समाज कार्यात हातभार लावल्या बद्दल अभिनंदन... ;) बाकी मास्तरांशी सहमत... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडू बावळट
स
सुधीर काळे Tue, 01/26/2010 - 17:33 नवीन
मला राजाभाऊंचा (याने कि 'राज'साहेबांचा) विरोप पत्ता हवा आहे! असल्यास कृपया द्यावा. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडू बावळट
प
प्रकाश घाटपांडे Fri, 01/29/2010 - 06:06 नवीन
हॅहॅहॅ आम्ही बी त्तेंच्या ब्लॉगवर प्रतिक्रियेत लिवलय. http://rajuparulekar.blogspot.com/ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडू बावळट
स
सहज Tue, 01/26/2010 - 05:27 नवीन
कदाचित पत्रकारीतेचा कंटाळा येउन आता त्यांना माध्यमसम्राट वगैरे बनायचे असेल. असो. >राजने एखाद्याला माफ केलं की धोका लाखपट जास्त हा माझा अनुभव... राज ठाकरे यांना विनंती त्यांनी लवकरात लवकर परुळेकरांना माफ करावे. बाकी सारेगमपा कार्यक्रमात परिक्षकाचे काम करणारा अवधूत गुप्ते का दुसरा कोणी? त्याच्या करियरचे वाटोळे झाले, कधी, कसे?
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Tue, 01/26/2010 - 05:29 नवीन
>>राज ठाकरे यांना विनंती त्यांनी लवकरात लवकर परुळेकरांना माफ करावे. =D> मस्त. कोणत्याही कारणानं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/26/2010 - 07:00 नवीन
मला परूळेकरांचा संवाद हा कार्यक्रम आवडायचा, बर्‍यापैकी आवडायचा. त्यात खरंच खूप छान आणि मुख्य म्हणजे जास्त प्रसिद्ध नसलेले पण उत्तम कार्य करणारे लोक आमंत्रित असायचे. परूळेकरांचे प्रश्न पण अभ्यासपूर्ण वाटायचे. मधून मधून त्यांची सदरं वाचायचो, लेख वगैरे वाचायचो. मध्यंतरी, त्यांनी तेंडुलकरांवर लिहिलेले वाचले. त्यांची 'तें'शी असलेली सलगी कळली. आणि मग एकदम ते मनसेच्या वर्तुळात दिसायला लागले. मग ते अल्केमिस्ट्री सुरू झालं... त्यांचे काही लेख ठीक होते. पण या वेळचा लेख मात्र काही केल्या समर्थनिय वाटत नाही. अजिबातच नाही. परूळेकर हुशार आहेत, त्यांना भवतालाची उत्तम जाण असावी असे अजूनही मला वाटते. त्यांनी वेळीच योग्य त्या सुधारणा कराव्यात. आम्हाला अजून एक कुमार केतकर नको आहेत... एक आहेत तेच झेपत नाहियेत. असो. वर उल्लेखिल्या प्रमाणे परूळेकर हे वाचत असतील तर त्यांनी यावर जरूर विचार करावा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Tue, 01/26/2010 - 07:22 नवीन
कुमार केतकरांचा संदर्भ कळला नाही. त्यांच्याशी मतभिन्नता असेल पण ते 'प्रश्नांवर'(ही) लिहीतात. ह्या साहेबांनी टीन-एज मासिकातली गोष्ट लिहिली आहे. जाता जाता: आज मी मझ्या डायरीत एक नोंद करणारः "राजू परूळेकरः शोभा डे चा पुरूषी पण कल्पनाशून्य, पाणी घातलेला अवतार."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ज
ज्ञानेश... Tue, 01/26/2010 - 12:43 नवीन
अगदी अगदी...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
अ
अनामिका Tue, 01/26/2010 - 14:34 नवीन
आज मी मझ्या डायरीत एक नोंद करणारः "राजू परूळेकरः शोभा डे चा पुरूषी पण कल्पनाशून्य, पाणी घातलेला अवतार." =)) =)) » "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
अ
अनामिका Wed, 01/27/2010 - 10:34 नवीन
प्रकाटाआ "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
स
संजा Tue, 01/26/2010 - 07:19 नवीन
प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे. मि. परूळेकर कीप ईट अप. संजा
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Tue, 01/26/2010 - 07:25 नवीन
प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे.
एक वेगळा विचार! आवडला...! :) बंड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/26/2010 - 08:35 नवीन
प्रत्येकाला आपापला धंदा नफ्यामधे आणण्याचा अधिकार आहे. स्सही ! =D> यालाच म्हणतात दृष्टीकोण ! [अशा लाजवाब प्रतिसादामुळे मिपावर मजा येते.] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा
म
मी_ओंकार Tue, 01/26/2010 - 11:14 नवीन
मास्तर , अगदी नेमका विषय मांडलात. परवाच एका ब्लॉगवर परुळेकरांचा सचिन तेंडूलकर वरचा लेख आणि त्या ब्लॉग लेखकाने त्यांच्यावर केलेली टिका वाचली. तेव्हाच परुळेकर बिघडले हे लक्षात आले. हा लेख तर कहर आहे. सचिन वर लिहिलेले लेख. http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 01/26/2010 - 11:54 नवीन
परुळेकरांचे लेख मला विनोदी वाटतात. वरच्याच लेखातून-
सचिनचं एक मला आवडतं. त्याला उकडीचे मोदक आवडतात. मला पण.
लोकप्रभेसारख्या साप्ताहिकात परुळेकर लिहितात आणि लोकप्रभावाले ते खपवतातही ह्याचे आश्चर्य वाटते. क्रिकेटबरोबरच राजकारण आणि चित्रपट ह्या गोष्टींचा भारतिय(मराठी) नागरिकांना मूर्ख बनवण्यास उपयोग होतो हे परुळेकर विसरलेले दिसतात. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
द
देवदत्त Tue, 01/26/2010 - 14:58 नवीन
राजू परूळेकरांचा 'संवाद' कार्यक्रम मी आवडीने पहायचो. तसेच त्यांचे 'माणसे: भेटलेली, न भेटलेली' हे पुस्तक ही चांगले वाटले होते. पण अल्केमिस्ट्रीनंतर ती आवड कमी झाली. ते लेख मी वाचून सोडून द्यायचो. पण सचिनवरच्या लेखाने कहर केली. मी ही त्यावर दोन प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. http://maajhianudini.blogspot.com/2009/11/blog-post_22.html http://maajhianudini.blogspot.com/2009/12/blog-post_14.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
प
प्रदीप Tue, 01/26/2010 - 15:02 नवीन
राजू परूळकरांची शैली कशी आहे, ती आपणास आवडते की नाही, त्यास काही दर्जा आहे अथवा नाही, ह्याबद्दल दुमत असू शकते. परंतु त्यांच्यावर लाळघोटेपणाचा आरोप येथे काही जणांनी केला आहे. त्याचे कारण, मी तरी त्यांचे गेल्या वर्षब्भरातील जे काही वाचले आहे त्यावरून, आणि त्यांचा वर निर्देशीत केलेला लेख वाचून मला कळू शकले नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाने भारून जाऊन त्याविषयी काही चांगले लिहीणे म्हणजे लाळघोटेपणा? म्हणजे पत्रकारांनी नेहमीच 'आठ्याळ राखुंड्यां'ची भूमिका घ्यावी की काय? पूर्वापार मराठी पत्रकार राजकिय नेत्यांविषयी व्यक्तिगत भलावण करणारे लिहीत आले आहेत. आणी तसे करतांना त्यांची काही त्या त्या नेत्यांशी राजकिय बांधिलकी होतीच असे नाही. शरद पवार, कॉ. डांगे, बाळासाहेब ठाकरे, मधू दंडवते, ना. ग. गोरे, जॉर्ज फर्नांडिस.. अशी अनेक स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांच्या काही न काही गुणांविषयी लिहीणे झालेले आहे, ते आपल्या वाचनात आलेले आहे. त्यात, तसेच सदर लेखातही गैर नेमके काय आहे? येथे नितेश राणे हे त्यांचे मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या सामाजिक/ राजकिय कार्यासाठी करत आहेत, त्याविषयी जे काही लिहीले आहे, त्यात नक्की काय आ़क्षेप आहे, हे मला समजलेले नाही. खरे तर नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते. आता ते ह्या नेत्यांच्या पुढील भवितव्याकडे नजर ठेऊन त्यांची आतापासूनच खुशामत करत असतील असे म्हटले तर त्यांच्या रिस्क-टेकिंगची दाद द्यायला व्हावी. कुमार केतकरांचा उल्लेखही ह्या निमीत्ताने काही जणांनी केलेला आहे, आणी तोही ह्याच लाळघोटेपणाच्या संदर्भात. मला व्यक्तिशः केतकरांच्या लिखाणाविषयी तिटकारा आहे, कारण त्यात व्यक्त केलेली मते (व अलिकडे तर अगदी काँस्पिरसी थेयरीचा पाठपुरावा) मला अजिबात पटत नाहीत. त्यांची सोनिया- आरती मला पटत नाही. तरीही ते जे काही लिहीतात ते काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन लिहीतात असला आरोप मी करणार नाही-- अगदी उद्या ते काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले तरी.
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Tue, 01/26/2010 - 15:03 नवीन
प्रदीप यांचा प्रतिसाद विचार करण्याजोगा आहे. आवडला! --बंड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
श्रावण मोडक Tue, 01/26/2010 - 17:36 नवीन
नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते. परुळेकरांना काही फायदा होतोय की नाही हे क्षणभर बाजूला ठेवूया. विचार करूया तो, समाजाचा, वाचकाचा काही फायदा होतोय का, याचाच. परुळेकरांनी लिहिलेलं चित्र हे संपूर्ण चित्राचा काही भाग आहे, असं मानायचं, की तेच पूर्ण चित्र आहे, असं मानायचं असा प्रश्न आहे. परुळेकरांनी हे सारे लेखन या अशा राजकीय नेत्यांचे चरित्रकार म्हणून जरूर करावे, पत्रकाराच्या भूमिकेत आल्यानंतर या लेखनाचे स्वरूप बदलेल. पाण्याच्या आंदोलनावर पोलिसांनी उगाचच लाठीमार केला, यासारखी परुळेकरांची,निष्कर्षी स्वरूपाची वाक्ये हे लेखन प्रचारकी बनवत असतील तर तो दोष त्यावरून त्यांच्या लेखनासंदर्भात निष्कर्ष काढणाऱ्याचच नाही, लिहिणाऱ्याचाही आहे. संपूर्ण लेखात नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या लेखनाच्या कटुतेचा मुद्दा येतोय वारंवार! परुळेकरांनी केलेले ते त्या-त्या वेळेचे लेखन निर्दोष होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय या वारंवारितेमुळं. हे परुळेकरांच्या लक्षात येत नसेल असे म्हणणे धाडसाचे आहे. समर्थ युनियनशी संबंधित घटना तर अजबच आहे. परुळेकरांचा आक्षेप कशाला आहे? 'स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांनी नितेशचा फोटो तिथं नेणं याला, की तो तिथं नेलेला असल्यानं छापून येणं याला? तिथं नितेशचा फोटो न घेता 'स्वाभिमान'च्या माणसांनी जावं असं परुळेकरांचं म्हणणं असेल, तर त्याचा हेतू काय? नितेशला समोर न आणत त्यांच्या माणसांनी जे करायचे ते उद्योग करावेत? हे आणि असे प्रश्न या (आणि परुळेकरांच्या बऱ्याच इतरही) लेखनातून उपस्थित होतात. लोकापवादांचा विचार न करताही राणे कुटुंबाच्या भरभराटीविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचाही वेध घेतला गेला पाहिजे. लोकापवाद त्यात आणले तर चित्र आणखी भयंकर होतं म्हणून ते बाजूला ठेवू. पण अशा कुटुंबाविषयी (इथे राणे म्हणून मी फक्त राणे यांचा उल्लेख करतोय. उद्या त्यात सर्वपक्षीय इतरही अनेक जण येतील...) हे प्रश्न असताना, होणारे लेखन असे एकांगी किंवा प्रचारकी असेल तर त्याबाबत टीका होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 01/26/2010 - 18:05 नवीन
श्री प्रदीप, श्री परुळेकरांच्या लेखाप्रमाणेच आपला प्रतिसादही हास्यास्पद वाटला. तुमच्या प्रतिसादाचा विषय आहे 'हेत्वारोप'.
खरे तर नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय, हे दोन्ही अगदी (आपापल्या) कोपर्‍यातील नेते आहेत, त्यांची भवितव्ये अजून स्पष्ट नाहीत, तेव्हा त्यांची खुशामत करून परूळकरांना काही फायदा असे म्हणणे जरा खेचून ताणून आणल्यासारखे वाटते.
आता आमचा काय फायदा आहे परुळेकरांवर टिका करण्यात? वर अनेकांनी माझ्यासकट लाळघोटेपण किंवा तत्सम शब्द वापरला आहे. या सर्वांच्या फायद्याचे/ हेतूचे गणितही मांडा. एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? पत्रकारांनी व्यक्तिमत्त्वास भारावून जाऊन लिहिले आहे. त्या व्यक्तिमत्त्वांचा खोलात जाऊन का प्रभाव पडला याचा आढावा घेतला आहे. परुळेकरांच्या लेखात दोन-तीन वेळेला 'खोली' शब्द सोडून इतर काय आहे? बाकी श्री मोडक यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत. ................................. I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
भ
भडकमकर मास्तर Tue, 01/26/2010 - 20:08 नवीन
या सर्वांच्या फायद्याचे/ हेतूचे गणितही मांडा. एक महसूल मंत्र्याचा मुलगा आणि दुसरा ११ आमदार असलेल्या पक्षाचा प्रमुख. यांचा उदोउदो केल्यास काय फायदा मिळतो? कितीतरी पत्रकारांची विधान परिषदेत, राज्यसभेत वर्णी लागते ती कशामुळे? >>>>>>>>>>>>>>>> > सहमत सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 01/29/2010 - 02:12 नवीन
श्री प्रदीप, माझा पुर्वीच्या प्रतिसादात हेत्वारोप या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्याबद्दल क्षमस्व. माझा आणि धनंजयची याबाबत झालेली ख्ररडचर्चा:
प्रेषक : अक्षय पुर्णपात्रे, शुक्र, 01/29/2010 - 02:46 धनंजय, मदत हवी आहे. हेत्वारोप या शब्दाचा अर्थ काय? काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?
प्रेषक : धनंजय, शुक्र, 01/29/2010 - 03:45
काहीतरी हेतू मनात ठेऊन केलेले आरोप की इतरांच्या हेतूंबाबत केलेले आरोप?
पैकी दुसरा अर्थ. "हेतूचा आरोप". उदाहरण : मित्र वेळेवर माझ्या मदतीला आला नाही. माझी फजिती व्हावी असा त्याचा हेतू होता, असे मी म्हणतो. अशा हेतूचा आरोप त्याच्यावर करतो. मित्राच्या वागण्याबाबत, किंवा मित्राबाबत मी हेत्वारोप करतो. सामासिक शब्दाची फोड (रूढ अर्थ वेगळा नसल्यास) "अमुकचा/ची/चे तमुक" असा करणे, हा 'डीफॉल्ट' अर्थ. (शालेय व्याकरण आठवत असेल तर "षष्ठी तत्पुरुष". हा समासाचा सर्वात सामान्य प्रकार. अन्य प्रकार त्यामानाने अपवादात्मक असतात.)
श्री प्रदीप यांनी 'परुळेकरांवर आम्ही (मी व इतर) काहीतरी हेतू मनात ठेऊन आरोप करत आहोत' असे म्हणायचे आहे, असा चुकीचा अर्थ मी लावला. या चुकीबद्दल श्री प्रदीप यांची माफी मागतो आणि त्यांच्या प्रतिसादासाठी वापरलेला 'हास्यास्पद' शब्द मागे घेतो. लेखास 'लाळघोटेपणा' म्हणणे यावर आक्षेप घेणे निश्चितच हास्यास्पद नाही. हे स्पष्ट करूनही श्री प्रदीप यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत मी असहमत आहे. ते म्हणतात तसे नितेश राणे व राज ठाकरे 'कोपर्‍यातले नेते' वाटत नाहीत. (वरच्या प्रतिसादात कारण स्पष्ट केलेले आहे.) ते म्हणतात:
येथे नितेश राणे हे त्यांचे मॅनेजमेंटच्या शिक्षणाचा वापर त्यांच्या सामाजिक/ राजकिय कार्यासाठी करत आहेत, त्याविषयी जे काही लिहीले आहे, त्यात नक्की काय आ़क्षेप आहे, हे मला समजलेले नाही.
सर्वप्रथम श्री परुळेकर यांनी केवळ 'परदेशात उच्च डिग्री घेतलेला*' एवढाच उल्लेख केला आहे. त्यात व्यवस्थापनाच्या अभ्यासाचाही उल्लेख नाही तसेच त्या अध्ययनाचा (व्यवस्थापन असो किंवा इतर काही) वापर केल्याचाही उल्लेख नाही. त्यामुळे 'शिक्षणाचा वापर करत आहे' हे दाखवणारा हा लेख नाही. लाळघोटेपणाचा आरोप करण्याचे कारण म्हणजे लेखात खोल, A man to be watched, मानवी अँगलने विचार करणारा, सुसंस्कृतपणा, धारदार आणि स्पष्ट, स्वत:ची आयडेन्टिटी असलेला व इतर विशेषणे श्री नितेश राणे यांचे वर्णन करण्यासाठी वापरली आहेत आणि या विशेषणांना पाठबळ देणारे काहीच नाही. 'धारदार आणि स्पष्ट' नंतर त्याला एसी बाधतो, याचा उल्लेख आहे. प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल कळकळ आहे पण एकाही प्रश्नाबद्दल तो कसा सोडवणार आहे याचा उल्लेख नाही. मानवी विचार अ‍ॅंगलने विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? हे काहीच धड स्पष्ट नाही. मग वाचक म्हणून एखाद्याने हे श्री नितेश राणे यांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न असा अर्थ काढल्यास त्यात काय वावगे आहे? पत्रकार लिहितात तेव्हा हजारो लोक वाचतात. त्या लोकांना फक्त मतेच नाहीतर त्या मतांचे स्पष्टीकरणही हवे असते. लाळघोटेपणाचा वापर करुन बर्‍याच पत्रकारांनी काय-काय पदरात पाडून घेतले आहे हेही लोकांनी पाहिलेले असते. वाचकांनी का म्हणून एखाद्या पत्रकाराविषयी होमवर्क करावा? त्यांच्याकडे या सर्व उठाठेवी करायला वेळ नाही म्हणूनच तर ते पत्रकारांचे लिखाण वाचतात ना. हा लेख वाचल्यास वाचकांचा काही एक समज झाल्यास तो दोष लेखकाचा आहे, वाचकांचा नाही. मी व अनेकांनी केलेले आरोप हे आता बरोबर अर्थाने हेत्वारोप आहेत, हे मान्य आहे. पण श्री परुळेकरांच्या लेखात असे अनेक आरोप आहेत. उदा. "दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. " अधोरेखित केलेल्या आरोपांना काय पुरावा आहे? या विधानात काय 'सॅक्रेड फॅक्ट्स' आहेत आणि काय 'फ्री कमेंट्स' आहेत. आता लेखाबद्दल काही मत व्यक्त करण्यासाठी वाचकाने पुरावे शोधायला जायला पाहीजे आहे का?
तरीही ते जे काही लिहीतात ते काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन लिहीतात असला आरोप मी करणार नाही-- अगदी उद्या ते काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले तरी.
हा श्री प्रदीप यांच्या मनाचा मोठेपणा आहे. माझे मन दुर्दैवाने तितके मोठे नाही. श्री केतकर यांचे लिखाण काँग्रेससोडून काही वेळा वाचनीय असते. पण केवळ ते चांगले लिहितात म्हणून लाळघोटेपणा करत नसतील (म्हणजे सध्या ते करत आहेत असे म्हणायचे नाही) असे काही मी मान्य करणार नाही. *परदेशात एसी असलेल्या वर्गात श्री नीतेश कसे बरे बसत असतील? त्यांना रोजच ताप येत असावा. त्यांच्यासाठी विद्यापीठाला वेगळीच व्यवस्था करावी लागली असेल. **श्री प्रदीप यांनी अत्यंत सभ्यपणे मला हेत्वारोपाच्या अर्था संदर्भात तसेच त्यांची भुमिका स्पष्ट करणारा व्यनि पाठवला. त्यांच्या सभ्यपणाचे अतिशय कौतुक वाटते. ............................. मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/27/2010 - 05:23 नवीन
पत्रकार हा सदा सर्वदा आदर्शवादी असु शकत नाही. ती व्यक्तीच असल्याने राग लोभ हेवा असुया यापासुन मुक्त असु शकत नाही. त्याने कुठलीही भुमिका घेतली तरी ती न पटणार्‍या लोकांना पक्षपाती वाटणारच आहे. पत्रकारांना 'खूश' करणार्‍या लोकांना माहित असते की आज ना उद्या हे विरघळणारच. तो खर्च त्यांचा भांडवली असतो. पत्रकारांना आपण नि:पक्ष आहोत याची कसरत करताना कधी कधी बौद्धीक दांडगाई करावी लागते. कुमार केतकर त्याचे उदाहरण आहे. ते राज्य सभेवर खासदार होणार असल्याचे भाकीत आम्ही केले आहेच. यासाठी त्यांच्या देह व लेख बोली तुन पत्रिका मांडुन आम्ही ते भाकित केले आहे. प्रदीप म्हणतात तसे पत्रकारांनी आठ्याळ राखुंड्याची भुमिका घेतलेली लोकांना नि:पक्ष वाटते.नावडतीचे मीठ अळणी ही भुमिका विवेकी नाही. पत्रकार हा माणुस असल्याने प्रवाहपतितच असतो. मागेवळुन पहाताना त्याला काय वाटते हे त्याची सदसद विवेकबुद्धीच सांगेल बाकी कोण? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ज
जीएस Wed, 01/27/2010 - 08:21 नवीन
लाळघोटेपणापेक्षाही 'मी लय भारी', माझ्या सगळ्यांशी कशा ओळखी हे बिंबवून काही फायदा उपटण्याचा प्रयतनच जास्त वाटला. त्या प्रयत्नात लेख इतका असंबद्ध झाला आहे की लेख असे म्हणवत नाही...
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Wed, 01/27/2010 - 11:22 नवीन
आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.
म्हणजे काय? आरतीला एकत्र असणार्‍या माणसांपैकी एका बाजूला राज होता, म्हणून दुसर्‍या बाजूचा माणूस to be watched का? तोंड भरून स्तुती करताना किमान एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध ठेवण्याची काळजी घेतली असती, तर थोडी अब्रू वाचली असती.
नितेश कोणत्याही विषयावर बोलताना खूप मानवी अँगलने विचार करतो. शक्यतोवर सुसंस्कृतपणा सोडत नाही
अच्छा, म्हणजे अवधूत गुप्तेला धमकी देण्यात सुध्दा 'सुसंस्कृतपणा' आणि 'मानवी अँगल' होता का? झेंडा हा विकृत सिनेमा आहे, असं वादापुरतं मानलं, तरीही एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो. - चिंतातुर जंतू :S "तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या | उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/27/2010 - 11:33 नवीन
...एका पत्रकारानं झुंडशाहीचा उदोउदो करणं, म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणं होतं. आम्ही यालाही विकृतच म्हणतो.
खरंय आणि गंभीर आहे. आणि हे सारं ते करताहेत ते समाज लयाला चालल्याचा 'आक्रोश' करीत. दोन हजार वर्षांनी आपलंच लेखन कसं योग्य ठरेल याच्या गर्जना करीत. हास्यास्पद हे विशेषणही तोकडे पडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
च
चतुरंग Wed, 01/27/2010 - 15:41 नवीन
मास्तर एक चांगला मुद्दा ऐरणीवर आणल्याबद्दल अभिनंदन! :) वरती बिका म्हणतोय तसे मलाही काहीवेळा राजूचे 'संवाद' आवडायचे. त्यातले प्रश्नही चांगले आणि बर्‍याचदा चाकोरीबाहेरचे असायचे. व्यक्तीही सर्वसामान्यपणे 'लाईमलाईट' मध्ये नसलेल्या असायच्या. पुढे पुढे आपली एक 'वेगळ्याच धाटणीचा पत्रकार' ही तयार झालेली (की केलेली?) इमेज जपता जपता राजू परुळेकरांची वाटचाल पत्रकारितेचा मूळ गाभा सोडून भलतीकडेच झालेली दिसते आहे! माध्यमे आपल्या कह्यात आहेत ह्या भ्रमात राहून जे लोक पुढे जातात ते तोंडावर पडतात हे नवीन नाही. पत्रकार हा माणूस आहे आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी त्याने काही क्लृप्त्या केल्या तर काय बिघडले? हे समजूनही नि:पक्षपातीपणाशी इतकी तडजोड बरी वाटत नाही! 'राजू बन जा जंटलमन!' ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 01/28/2010 - 05:50 नवीन
धन्यवाद रंगाकाका _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही...अंमळ असूया वाटली... .... तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो... गणपाची पहिली रेसिपी वाचली त्याच रात्री मी डायरीत नोंद केली.. ही इज अ मॅन टु बी वॉच्ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रीयुत संतोष जोशी गुरुवार, 01/28/2010 - 05:35 नवीन
हा राजु परुळेकर काय किंवा तो निखिल वागळे काय एक नंबरची येड_वी माणसं आहेत. या लोकांबाबत चर्चा करून उगाच वेळ वाया का घालवायचा ? हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 01/28/2010 - 12:34 नवीन
छान विषय आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार चो रामस्वामी यांनी या विषयावर चर्चा सुरु केली ती आजतागायत सुरुच आहे. प्रथमतः अनेकांसाठी मीडीया हा उदात्त व्यवसाय राहिला नसुन धंदा झाला आहे हे तर मान्य करावेच लागेल. जशी टुथपेस्ट विकली जाते, तश्याच प्रकारे पेपर, नियतकालीकेपण विकली जातात अन चॅनेल्सबाबतही तसेच आहे. अनेक पत्रकार अप्रामाणिक असतात हा टोन तर प्रत्येकजणाच्या बोलण्यात वारंवार येतो. फक्त अश्या चर्चेत विचार होत नाही तो असे का होते, ते कसे टाळता येईल अश्या मुद्यांवर. सर्वप्रथम विचार व्हायला हवा तो समग्र सामाजिक नैतिकतेचा. शेवटी मीडीया समाजाबाहेरुन येत नाही तर तो समाजातुनच येतो अन समाजाचाच अपरिहार्य भाग असतो. पत्रकार देखील या समाजातलाच एक घटक असतो अन सभोवतालच्या परिस्थितीचा त्याच्यावर देखिल बदल होत असतो. संपुर्ण समाजाची नैतिकता शाबुत आहे अन फक्त मीडीयाचीच गेली आहे अशी तर परिस्थिती नाही ना? आजही अनेक मतदार पैसे घेऊन मत विकतात, अनेकजण मतदान तर करतच नाहीत पण राजकीय व प्रशासकीय यंत्रणेवर संपुर्ण माहिती न घेता टीका करतात, काहीजण मतदान करतात पण राजकीय यंत्रणेची कुठलीही माहिती न घेता ही परिस्थिती आहेच ना? ट्रॅफिक पोलिसानं अडवल्यावर अनेकजण चिरीमिरी देऊन सुटण्यात धन्यता मानतातच ना? हे सगळी अधोगतीचीच लक्षणे नाहीत? अन ती सर्व समाजातच दिसत असतील तर मीडीया यातुन कसा अन कितीकाळ बाहेर राहु शकेल? दुसरा भाग येतो व्यावसायिकतेचा. वर म्हणले तसे मीडीया हा देखिल व्यवसाय आहे. त्यापेक्षादेखिल तो आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. बाजारात एखादे वृत्तपत्र/ नियतकालीक ज्या किमतीत वाचकाला विकले जाते, त्यापेक्षा त्याच्या निर्मितीवर अनेकपटीने जास्त त्याच्या निर्मितीवर खर्च येतो. नव्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेने वाढणार्‍या दर्जाची अपेक्षा नेहमीच वाचक करतात अन ते तंत्रज्ञान मिळवण्याने हा खर्च अधिकच वाढत जातो. या जमा खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी मीडीया हाऊसेसना अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट कमी करणे. अर्थातच पत्रकारांचे पगार नेहमीच त्यांचे शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कष्ट आणि व्यवसायानुरुप करावे लागणारे खर्च या तुलनेत अन्य बर्‍याच क्षेत्रापेक्षा खुपच कमी असतात. अनेकदा पत्रकारांना त्यांच्या पगारात घरखर्चही भागवता येत नाही. अश्या पत्रकारांकडुन मग पेड न्युज सारखे प्रकार होतात. पत्रकार अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाने, विचारसरणीने भारावलेला असतो आणि यात गैर काहीच नाही. हा प्रभाव देखिल अनेकदा त्याच्या लिखाणात येतो अन ते साहजिकच आहे. पत्रकारितेच्या नैतिकतेनुसार `फॅक्टस आर सेक्रेड, कॉमेंटस आर फ्री' असे समजले जाते. याचा अर्थ असा की घटना, घडामोडी देणार्‍या बातमीत शक्यतो मतप्रदर्शन असु नये परंतु लेखांमधे ते चालते. हा निकष लावला तर उपरोक्त लेखामधे काहीही गैर दिसत नाही. येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही. शेवटी जर पत्रकार समाजाचे प्रबोधन करणार असेल, समाजाला दिशा देणार असेल तर तो त्याची मते मांडणारच. भले ती कुणाला पटो अथवा न पटो. असे न करणारा पत्रकार त्याच्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहे हेच संशयास्पद ठरेल. शिवाय स्वतःची मते मांडण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र त्याले द्यावेच लागेल. ती मते पटत नाही म्हणुन कुण्या पत्रकाराला लाळघोट्या म्हणणे, काही पत्रकारांना मिळालेली राजकीय पदे अश्या वर्तनानेच मिळाली असा सरसकट दावा करणे ही देखिल झुंडशाही आहे असे मला वाटते. ही सर्व तात्वीक चर्चा वाचक पत्रकारांची भलावण म्हणुन बाजुला ठेवावी. त्यांना ते स्वातंत्र्य नक्कीच आहे. परंतु जर ही चर्चा माध्यमांच्या उपयुक्ततेत वाढ व्हावी म्हणुन असेल तर मी आशा करतो की वाचक जो न्याय बाजारात विकल्या जाणार्‍या अन्य प्रॉडक्ट ना लावतात तोच मीडीयालाही लावतील अन शिवाय कोणतीही टोकाची मते व्यक्त करण्याआधी वस्तुस्थिती काय आहे याबाबत माहिती घेतील.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/28/2010 - 12:58 नवीन
उत्तम विवेचन. पत्रकार म्हटले की लोकांना टिळक्-आगरकरांची पत्रकारीता आठवते आणि त्यांच्या मापाने ते आजच्या पत्रकारांना मोजायला जातात! बाजारात एखादे वृत्तपत्र/ नियतकालीक ज्या किमतीत वाचकाला विकले जाते, त्यापेक्षा त्याच्या निर्मितीवर अनेकपटीने जास्त त्याच्या निर्मितीवर खर्च येतो. इथे तुम्ही वुत्तपत्र विकत घेणार्‍या व्यक्तीला त्या वृत्तपत्राचा ग्राहक समजत आहात, असे वाटते. ते चुकीचे आहे. एखाद्या व्यवसायाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या वर्गास त्याचा ग्राहकवर्ग असे संबोधायचे असल्यास, जाहिरात कंपन्या हेच वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक ठरतात. वृत्तपत्र विकत घेणारे नव्हेत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 01/28/2010 - 13:30 नवीन
तुम्ही वुत्तपत्र विकत घेणार्‍या व्यक्तीला त्या वृत्तपत्राचा ग्राहक समजत आहात, असे वाटते. ते चुकीचे आहे. एखाद्या व्यवसायाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या वर्गास त्याचा ग्राहकवर्ग असे संबोधायचे असल्यास, जाहिरात कंपन्या हेच वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक ठरतात. वृत्तपत्र विकत घेणारे नव्हेत! हे प्रमेय पुर्णतः चुकीच्या समजुतीवर आधारित आहे. वृत्तपत्रांचे मुख्य ग्राहक (टार्गेट ऑडियन्स) वाचक हेच असतात. तेच जाहिरात कंपन्यांचे आणि इतर प्रॉडक्टसचे पण ग्राहक असतात. या ग्राहकांकडुन वृत्तपत्र तयार करण्याकरता आलेल्या एकुण खर्चापैकी फारतर ४० टक्के पैसे मिळतात. उरलेल्या ६० टक्केची तोंडमिळवणी करणे जाहिरातींना जागा विकुन शक्य होते. हे प्रमाण बिघडले तर धंदा चालणारच नाही. वाचक/ दर्शकांच्या संख्येनुसारच जाहिराती मिळतात. म्हणुन तर टीआरपी/ सर्क्युलेशन फिगर्स ना सर्वाधिक महत्व येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/28/2010 - 14:23 नवीन
प्रसन्न... विस्तृत प्रतिसाद वाचला. या प्रतिसादात मला कळले ते असे : "माध्यमं आणि ती चालवणारे, या समाजाचेच भाग आहेत. समाजातील चांगल्या वाईटाचेच प्रतिबिंब दिसणार माध्यमातून. तस्मात... दोष असलाच तर माध्यमांचा नाही तर पूर्ण समाजाचा आहे." पर्फेक्ट. सहमत आहे. फक्त त्याच अनुषंगाने असे म्हणावे लागते... असे असेल तर माध्यमांनी / पत्रकारांनी आता 'होलिअर दॅन दाऊ' प्रकारचा दृष्टिकोन सोडून इतर धंदेवाईकांसारखे वर्तन करावे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 01/28/2010 - 14:59 नवीन
मी मांडलेल्या मुद्यांपैकी एक कळीचा मुद्दा बरोब्बर उचललात बिपिनदा. तुम्ही म्हणता माध्यमांनी / पत्रकारांनी आता 'होलिअर दॅन दाऊ' प्रकारचा दृष्टिकोन सोडून इतर धंदेवाईकांसारखे वर्तन करावे. ओक्के! मला एक गोष्ट सांगा हा अ‍ॅटीट्युड कुठली माध्यमे आत्ता दाखवताहेत. किंबहुना माध्यमेच स्वतःची परखड समिक्षा करत आहेत. माझ्या प्रतिसादाची सुरुवात चो रामस्वामी या नावाने होते, कोण होते ते? नुकतेच पेड न्युज प्रकरण गाजले, ते काढणारे पी साईनाथ, प्रभाश जोशी कोण? टीका करण्याला माझी कधीच हरकत नव्हती, आत्ताही नाही अन पुढेही असणार नाही. पण इथे जी टीका सुरु आहे त्या टीकेमधे अनेक सदस्यांनी स्वतः पत्रकारितेबाबत कोणतीही माहिती न घेता होलीअर दॅन काऊ दृष्टीकोन घेतलेला आहेच ना? वरील प्रतिसादांमधे किमान आठ तरी विधाने परुळेकरांवर व्यक्तीगत किंवा एकुणच पत्रकारांवर सवंग टीका करणारी आहेत. ती विधाने आणि परुळेकरांनी केलेली विधाने यात माझ्या मते गुणात्मक फरक काहीच नाही. परुळेकर किंवा केळकर लिहितात ते स्वतःची खरी ओळख देऊन ही उलट त्यांच्या दॄष्टीने जमेची बाजु ठरते. अन सर्वात खेदजनक आहे ते हे की या माननीय सदस्यांनी काही पत्रकारांच्या त्यांना अयोग्य वाटलेल्या गोष्टींचे सार्वत्रिकीकरण केले आणि मीडीयाने केलेल्या अनेक उपयुक्त, समाजहिताच्या बाबींकडे पुर्ण दुर्लक्ष केले. मीडीयामधे दोष आहेत, पत्रकारांमधेही दुर्गुण आहेत. परंतु त्याचा अर्थ सर्वच मीडीया दोषयुक्त आहे असा सर्रास काढता येतो? अन मीडीयामधे अनिष्ट, चुकीच्या गोष्टी चालतात तरी का? कारण सरळ आहे, वाचकांना त्या हव्यात म्हणुन. मी आधीच म्हणले वृत्तपत्रे, नियतकालिके, चॅनेल वगैरे टुथपेस्ट सारखेच प्रॉडक्ट आहेत. जर एखादा प्रॉडक्ट दोषयुक्त वाटत असेल तर आपण तो घेऊ? अन जर तो प्रॉडक्ट कुणी घेणार नसेल तर तो निर्माण तरी होईल. शेवटी डिमांड, सप्लाय आणि मॅन्युफॅक्चअरिंग हे कायमच परस्परांवर अवलंबुन असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 01/28/2010 - 16:59 नवीन
पत्रकारिता समाजाचाच एक घटक आहे, व्यवसाय आहे वगैरे मान्य आहे. पण श्री परुळेकर यांच्या लेखाबाबत हे मुद्दे गैरलागू आहेत. पत्रकारांनी भारावून जाऊन चरित्रपर लेख लिहावे, यातही वावगे काही नाही. तुम्ही केलेल्या विवेचनाने माझ्या मतात काडीचाही फरक पडलेला नाही. श्री परुळेकरांनी लेखन करू नये असे कोणीही म्हटले नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांचे लेखन वाचून त्यांच्यावर टिका करणार्‍यांना करु द्या. परुळेकर पत्रकार आहेत, त्यांना स्वतःच्या लिखाणातून त्यांच्या भुमिकेचे समर्थन करू द्या. तुम्ही त्यांचे वकिलपत्र घेऊन, परकायाप्रवेश करून त्यांची भुमिका मांडण्याची आवश्यकता नाही.
शिवाय स्वतःची मते मांडण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र त्याले द्यावेच लागेल.
अहो परुळेकरांनी जे अभिव्यक्तीस्वातंत्र वापरले तेच आम्ही वापरले तर आम्हालाही ते वापरू द्या. श्री परुळेकर यांचे लेखन लाळघोटेपणा वाटणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्हाला तसे वाटत नाही तर ठीक आहे. माझे असे मत असणे आणि मी ते मिपावर मांडणे ही झुंडशाही कशी झाली ब्वॉ. आता पत्रकारितेच्या व्यवसायात जाण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्याग करावा लागतो आणि काहींना तो झेपत नाही तर बाजारांच्या नियमाप्रमाणे पत्रकारितेकडे वळणारे लोक कमी होतील, प्रसारमाध्यमांची संख्या कमी होईल. भारतभर ती वाढतेच आहे म्हणजे चांगलाच तेजीचा व्यवसाय असावा. आजकाल लोक जाहीरातसंस्था काढण्याऐवजी वृत्तपत्र काढतात की काय? कारण तुमचे विवेचन वाचल्यास या दोन व्यवसायांत फारसा फरक नाही उलट वृत्तपत्रे भारीच पडतील. ग्राहक पैसे देऊन जाहीराती वाचतो यापेक्षा आणखी फायदेशीर काय असू शकेल.
येथे लेखकाने स्वतःची मते त्याच्या लेखात मांडली आहेत आणि त्यात लिहिलेल्या घटनाबाबतच्या फॅक्ट्स चुकीच्या आहेत असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही.
कोणाला एसीत थंडी भरते आणि कोणाला ते भयानक वाटते आणि कोणता चित्रपट विकृत आहे आणि कोण कोणाला माफ केल्यास कोणाच्या जीवनाचे कल्याण होते अशा लेखात काय चुकीचे दाखवावे? आम्ही उगाच जगभर पत्रकार जीव धोक्यात घालून जे लेखन करतात, प्रामाणिकपणे, तटस्थपणे आपली मते मांडतात त्यांना पत्रकारितेतील गुणवत्ता समजत होतो. पण आता हे निकष तपासून पहायला हवेत कारण पत्रकारिता हा व्यवसाय आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट हे त्यांचे लिखाण आहे. तुमच्या गाडीत दोष असला तर तुम्ही गाडी उत्पादन करणार्‍या कंपनीस जबाबदार धरता का? तुम्ही तसे धरत नसल्यास श्री परुळेकर यांच्या लिखाणाबाबत प्रश्न न विचारणे योग्यच आहे. ........................................ I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा