खबद हाउस आणि मोसाद च्या कारवाया यांचा एकत्र उल्लेख कुमार केतकरांच्या एका लेखात वाचला होता. पण त्याबद्दल बाकी कुठे वाचण्यात आले नाही..... याबद्दल काही दुवे देऊ शकेल काय कोणी?
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
या संस्थळावर आणि इतरत्रही 'पोलीस शाहरुखच्या चित्रपटाच्या संरक्षणात गुंतलेले होते, म्हणून अतिरेक्यांचे फावले', असा एक सूर आहे. मुळात जर्मन बेकरीला पोलीस संरक्षण मिळणे हे सर्वांच्याच गैरसोयीचे होते, त्यामुळे ती अशक्य कोटीतली बाब होती. त्याची कारणे खालीलप्रमाणे:
बेकायदेशीर अतिक्रमण करून अगदी चिंचोळ्या जागेत ही बेकरी चाले. संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी बेकरी पाडूनच टाकली असती. अशी कारवाई करण्याचा पूर्वी प्रयत्न झालाही होता, असे वाटते.
जागा अतिशय चिंचोळी असल्याने आत प्रवेश करण्याआधी पिशव्या/शरीरे वगैरे तपासणे अशक्य होते. रस्त्यावरची रहदारीच अडली असती, किंवा मुळातच कमी असणारी आतली आसनक्षमता जवळजवळ शून्य झाली असती. हे बेकरी चालकांना चालले नसते.
अशी तपासणी केली असताही बाँबस्फोट घडवणे फारच सोपे होते. गल्ली इतकी चिंचोळी आहे, की समोरच्या पदपथावर किंवा शेजारील बोळात एक साधी सायकल उभी करून बेकरी उडवता आली असती.
याशिवाय बेकरीत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवनही चालत असे. त्यामुळे पोलिसांपासून दूर राहणे बेकरी चालकांनाही सोयीचेच होते.
'पोलीस शाहरुखच्या चित्रपटाच्या संरक्षणात गुंतलेले होते, म्हणून अतिरेक्यांचे फावले', असा एक सूर आहे
देशाचा आकार्/लोकसंख्येची घनता बघता पोलिस सगळीकडे संरक्षण देवू शकणारच नाहीत. गेल्या २० वर्षात लोक आणि पोलिस्/गुप्तचर संस्था ह्यांत बरेच अंतर निर्माण झाले आहे.स्थानिक लोकांच्या मनात काय चालु आहे ह्याचा मागोवा घेण्यात पोलिस्/गुप्तचर संस्था अनेक कारणांमुळे अपयशी ठरतात.
भेंडी
P = NP
- बेकायदेशीर अतिक्रमण करून अगदी चिंचोळ्या जागेत ही बेकरी चाले. संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी बेकरी पाडूनच टाकली असती. अशी कारवाई करण्याचा पूर्वी प्रयत्न झालाही होता, असे वाटते.
- जागा अतिशय चिंचोळी असल्याने आत प्रवेश करण्याआधी पिशव्या/शरीरे वगैरे तपासणे अशक्य होते. रस्त्यावरची रहदारीच अडली असती, किंवा मुळातच कमी असणारी आतली आसनक्षमता जवळजवळ शून्य झाली असती. हे बेकरी चालकांना चालले नसते.
- अशी तपासणी केली असताही बाँबस्फोट घडवणे फारच सोपे होते. गल्ली इतकी चिंचोळी आहे, की समोरच्या पदपथावर किंवा शेजारील बोळात एक साधी सायकल उभी करून बेकरी उडवता आली असती.
- याशिवाय बेकरीत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवनही चालत असे. त्यामुळे पोलिसांपासून दूर राहणे बेकरी चालकांनाही सोयीचेच होते.
- चिंतातुर जंतू :S "तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या | उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||