जे न देखे रवी...
तू इथे नाहीस...
Primary tabs
तू इथे नाहीस सखये
साङ्ग कसे पटणार मला
गालान्वरती श्वास तूझा
भासतो हळुवार मला
पौर्णिमेचा चन्द्र हा
की लाजरा चेहरा तुझा
चान्दणे की हासणे हे
ना कधी कळणार मला
स्वप्नात तू भासात तू
श्वासात उछ्वासात तू
नसणे तुझे असणे जणू
होउनी छळणार मला
मस्त कविता आहे. आणखी कविता येऊन द्यात तुमच्या....
काही चुका आहेत..
सांग=saaMg पण सुधारतील नक्कीच.
प्रतिसादासाठी आणि सांग=saaMg साठी !!!