Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज ठाकरे डोंबिवलीत

स
सुमीत भातखंडे
Sat, 02/20/2010 - 03:47
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3365 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
पाषाणभेद Sat, 02/20/2010 - 06:01 नवीन
नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंना डोळे झाकून पाठिंबा. मी मराठी!! जय मराठी!! Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 02/20/2010 - 09:23 नवीन
जर राज ठाकरे रंगबदलू नसतील तर माझा पण पाठिंबा आहे. अशी आशा करुया की ते बाळ ठाकरें प्रमाणे वागणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 02/20/2010 - 11:37 नवीन
ह्म्म्म्म... पण लक्षणं तशीच दीसतायतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
C
chipatakhdumdum Sat, 02/20/2010 - 16:44 नवीन
कोणती लक्षण म्हणताय भाऊ ? आम्हाला तरी कळू दे. लक्षण लिहायला लाजता कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
स
सुधीर काळे Sat, 02/20/2010 - 16:59 नवीन
मराठी माणसाला जो मनापासून पाठिंबा देईल तो "आपला"! जय राजाभाऊ! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
ग
गजा गाजरे Sat, 02/20/2010 - 18:44 नवीन
मागे सकाळ मधे एक ले़ख वाचन्यात आला , कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात , हिन्दि वा ईन्गजी चालत नाहि पन अप्ल्यकडे ..........
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 02/23/2010 - 23:13 नवीन
माझ्या नात्यातली काही मंडळी कन्नड बोलत नाहित, पण कर्नाटकप्रवासावर आहेत. त्यांना चोर-दरोडेखोरांनी लुटले-मारले, तर कन्नड शिकेपर्यंत पोलीस मदत करणार नाहीत, तक्रार नोंदवणार नाहीत, हे वाचून अत्यंत काळजी वाटू लागली आहे. मात्र कर्नाटकातील गुन्हेगारांसाठी उत्तम बिझिनेस प्लॅन आहे : कन्नड न-येणार्‍या व्यक्तीला हेरून त्यांची चोरी-बलात्कार वगैरे करा. पोलिसांपासून कायदेशीर सूट आहे! (हा बिझिनेस प्लॅन गोव्यात चालत नाही. छे, छे गोव्याचे नतद्रष्ट सरकार नेहमी बिझिनेस-विरोधी असते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजा गाजरे
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 02/24/2010 - 02:23 नवीन
धागा उघडला बरेच झाले. धनंजयनी चांगलाच मजेदार प्रतिसाद लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नितिन थत्ते Wed, 02/24/2010 - 09:57 नवीन
धनंजय यांचा प्रतिसाद मजेशीर आहे पण मुद्द्याचा विपर्यास करतो आहे का? कन्नड यायला हवे असे अधिकार्‍यांना सांगितले आहे. कन्नड न येणार्‍याची तक्रार नोंदवू नका असे सांगितले नसावे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 02/24/2010 - 15:30 नवीन
धनंजयच्या प्रतिसादात काही विपर्यास जाणवला नाही. काही विपर्यास असेलच तर तो श्री गाजरे यांच्या 'कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात' या वाक्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 02/24/2010 - 15:34 नवीन
खरेच की. चुकलेच माझे. पण आता दुरुस्ती करता येणार नाही. :( धनंजयनी समजून माफी द्यावी. :T :S नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
ध
धनंजय Wed, 02/24/2010 - 18:22 नवीन
:-) माझा स्वानुभव आहे, की महाराष्ट्रात पोलीस मराठीत(ही) नोंदणी करतात. (महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्यसेवेत नोकर असताना पोलिसांशी व्यवहार करण्याचा प्रसंग आला होता - १०-१५ वर्षांपूर्वी. माझा पोलिसांशी बहुतेक व्यवहार मराठीत होता, पण वैद्यकीय चाचणीचा अहवाल तेवढा मात्र मी इंग्रजीत लिहिला होता, हे आठवते आहे. पोलिसांची पंचनामा नोंदही मराठीतच होती.) **"अमुक राज्यात अमुक होते, आणि तमुक राज्यात तमुक होते" वगैरे विधानांमध्ये "आपल्या राज्यात मात्र वेगळेच काही होते" असा गर्भित आरोप असतो. अशी विधाने अन्य राज्यांबाबत चुकलेली असतात, आणि आपल्या राज्याबाबत चुकलेली असतात, असे पुष्कळदा लक्षात येते. पण तर्कातील बहुतेक विधाने गर्भित ठेवलेली असतात, त्यामुळे प्रतिवाद करण्यासाठी शब्द नसतात. सर्व गर्भित विधानांपासून "मी असे कुठे म्हटले" म्हणून हात झटकता येतात. अशा परिस्थितीत युक्तिवाद सुरुवातीला गर्भितांसह जसाच्यातसा स्वीकारून त्याच्या पुढील पायर्‍या दाखवून "रिडुक्सियो आड आब्सुर्डुम" करण्यावेगळा पर्याय मला दिसत नाही. अनर्थक निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी "तुमचे अमुक गर्भित विधान होते" असे मला म्हणावे लागत नाही, आणि त्या गर्भित विधानापासून कोणाला हात झटकून वेगळे होण्याचाही मार्ग नसतो.**
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
I
II विकास II Wed, 02/24/2010 - 04:06 नवीन
धंनजय यु टु =)) असो. कर्नाटकविषयी काही माहीती नाही. मोठा भाउ बरेच दिवस कर्नाटकमध्ये होता. त्याला विचारुन बघतो. -- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चिरोटा Wed, 02/24/2010 - 10:26 नवीन
फार कमी पोलिसांना हिंदी येते. तेव्हा हिंदी येते पण बोलत नाहीत असा प्रकार नाही आहे. वरील भाषणात राज ठाकरे "भाषेची भिंत उभी केली पाहिजे" असे म्हणतात. हिंदी मराठी बाबत ते कठिण आहे. हिंदी आणि मराठीची लिपी देवनागरी आहे.दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आहे. हिंदीचा प्रामुख्याने प्रसार महाराष्ट्रात(मुंबई/ठाणे/पुणे) होण्याचे कारण- १)बॉलिवूड आणि त्यातून होणारी सांस्कृतिक देवाण घेवाण.(बॉलिवूड म्हणजे केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी निगडीत असंख्य व्यवसाय्-ह्यात लाखो लोक आहेत.) २)अगणित बँका,कंपन्यांच्या मुख्य कचेर्‍या. ३)अनेक केंद्रिय संस्थाची कार्यालये येथे आहेत. (वरील तिन्ही गोष्टींचा मुंबईकरांना अभिमान वाटतोच की!!) शिवाय राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणांमुळे राज्यात हिंदीचा वापर गेले अनेक वर्षे केला जातो. दाक्षिणात्या भाषांचे तसे नाही. बेंगळुरु पासुन ४०किमी वर होसूर गाव आहे. हे तामिळनाडूत येते.तिकडच्या माणसाला इकडे काम करायचे म्हंटले तरी कन्नड लिपी शिकावी लागेल.काम इंग्रजीतून होत असेल तर भाग वेगळा. भेंडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
व
विशाल कुलकर्णी Wed, 02/24/2010 - 10:42 नवीन
कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात , हिन्दि वा ईन्गजी चालत नाहि>>>> थोडीशी शब्दरचना बदलण्याची गरज आहे असे वाटते..... कंप्लेंट कन्नडमध्येच लिहून घेतली जात असेल कदाचित, सांगणार्‍याने कन्नडमध्येच सांगायला हवे असे थोडेच आहे. एखाद्या परभाषिकाला ज्याला कन्नड येतच नाही त्याने काय तक्रार नोंदवायचीच नाही? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजा गाजरे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा