शिवमुद्रेचा अर्थ हवा आहे.
💬 प्रतिसाद
(6)
ज
जे.पी.मॉर्गन
Tue, 02/23/2010 - 09:58
नवीन
योगात पण एक "शिवमुद्रा" आढळली म्हणून थोडा द्विधेत आहे. पण जर का तुम्ही शिवाजी महाराजांच्या मुद्रेबद्दल बोलत असाल तर त्याचा अर्थ बराच सोपा वाटतो तरी.
प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू - प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे रोज वाढत जाणार्या
विश्ववंदिता - विश्वाने वंदन केलेल्या
शाहसुनो शिवस्यैषा - शहाजीचा मुलगा शिवाजीची
मुद्रा भद्राय राजते - ही मुद्रा भल्या (भद्र) माणसासाठी आहे !
माझ्या समजुतीप्रमाणे अर्थ दिलेला आहे.... जाणकारांनी जास्त प्रकाश टाकावा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 02/23/2010 - 10:20
नवीन
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।
(अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)
--अवलिया
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Tue, 02/23/2010 - 10:30
नवीन
शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. शिवाजीचे राज्य हे (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारे आहे,हे राज्य सर्वांच्या कल्याणासाठी आहे
असा मला माहित असलेला अर्थ ...
binarybandya™
- Log in or register to post comments
द
दीपक साळुंके
Sat, 02/27/2010 - 21:12
नवीन
मुद्रेवरिल भाषा कोणती आहे?
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sun, 02/28/2010 - 06:46
नवीन
भाषा संस्कृत असावी, असे वाटते. राजते (शोभते), भद्राय (कल्याणासाठी), शिवस्यैषा (शिवस्य + एषा = शिवाजीची ही) हे संस्कृत शब्द, रूपे आहेत.
(वाचक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
भ
भाषांतरकार
Sun, 02/28/2010 - 14:58
नवीन
होय ही मुद्रा संस्कृतमध्ये आहे
अर्थ:
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, [अखिल] विश्वाने वंदन केलेली, शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा [सर्वांच्या] कल्याणासाठी शोभून दिसते आहे
भाषांतर अनुदिनी - संचालक
- Log in or register to post comments