Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झुंडशाही म्हणजे देशद्रोहच

प
प्रकाश घाटपांडे
Tue, 02/23/2010 - 08:53
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23545 वाचन

💬 प्रतिसाद (58)
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/25/2010 - 04:15 नवीन
आमची एक मैत्रिण संजीवनी हिने मिपावर सदस्यत्व नसल्याने खालील प्रतिक्रिया ईमेलद्वारे मिपासाठी पाठवली आहे. ---- झुंडशाहीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि झुंडशाही प्रामुख्याने कायदाबाह्य/घटनाबाह्य गोष्टींसाठी होते. उदा. शाहरुखखान (किंवा कोणीही) पाकिस्तानी खेळाडूंविषयी काय म्हणाला, मुलीनी पबमध्ये जावे कि नाही, Valentine day साजरा करावा कि नाही, अन्य प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात (किंवा इतर राज्यात) यावे कि नाही, कुणी कुठल्या भाषेत बोलावे इत्यादी सर्व गोष्टी घटनेने प्रत्येक नागरीकाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या कक्षेत मोडतात. एखाद्या चित्रपटाचे नाव काय असावे, कुठल्या देशाबरोबर क्रिकेट किंवा अन्य खेळ खेळावेत किंवा साहित्य सम्मेलनाध्यक्ष कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा हेही निश्चित केलेले आहे. ज्यात कायदेभंग होतो त्यासाठी न्यायालयात दाद मागणे, विविध माध्यमातून आवाज उठवणे किंवा संपासारखे अनेक प्रभावी उपाय आहेत. भारतात अजून शासकीय यंत्रणा पूरेशी प्रभावी नाही हे खरेच. पण म्हणून आत्तापर्येंत केलेली civilized society बनण्याची वाटचाल शून्यवत करून पुन्हा टोळी अवस्थेत जाणे हा उपाय कसा असेल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 02/25/2010 - 20:37 नवीन
आपण ज्याला कायदाबाह्य/घटनाबाह्य म्हटले आहे, त्या घटनेतल्या त्रुटी असू शकतात. असाही टोकाचा वाद करता येतो की घटना तयार केली ती मंडळी जरी शहाणी सुरती असली, तरी त्यांना संपूर्ण समाजाच्या आत्म्याची जाण नव्हती. त्यामुळे ती बदलण्यासाठी अनेक मार्ग आहेत - आक्रमक आंदोलन हा त्यापैकी एक. त्यासाठी घटनेचेच मार्ग वापरावे हा हट्ट आक्रस्ताळी होऊ शकतो - शेवटी घटनेतच त्रुटी असेल तर काय?
civilized society बनण्याची वाटचाल शून्यवत करून पुन्हा टोळी अवस्थेत जाणे
हाच विचार जर आपण ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात वापरला असता तर? नाही, ते वेगळं, ते परके होते - असं म्हणून चालत नाही. शेवटी अन्याय तो अन्यायच. कायद्याने केलेला असला तरी. civilized society ची माझी व्याख्या सामाजिक न्यायाची आहे. तिच्यावर वाटचाल चालू आहे का? त्या वाटचालीची प्रगती कशी मोजायची? प्रगतीला पूरक घटक कुठचे - त्यांची वाढ कशी करायची? याकडे विचारवंतांनी लक्ष दिलं पाहिजे. काहीतरी फुटकळ गोष्टींसाठी लक्ष वेधून घेण्यासाठी कोणीतरी आक्रमण हे टॅक्टीक म्हणून वापरतो, आणि विचारवंत त्याला बळी पडून, महत्त्वाचे प्रश्न विसरतात. ही नामुष्की आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रावण मोडक गुरुवार, 02/25/2010 - 09:09 नवीन
फक्त थत्ते यांनी मांडलेल्या उदाहरणापुरते पुन्हा लिहितोय - त्या शेतकऱ्यांनी एक आंदोलन म्हणून 'हमारे गावमें हमारा राज'चा पुकारा केला आणि ते प्रत्यक्षात आणताना सशस्त्र पोलीस बंदोबस्तातच अशावेळी गावात येणाऱ्या एखाद्या सरकारी पथकावर आधी दगडफेक केली, मग त्यांनीही हाती काठ्या घेतल्या तर त्याला झुंडशाही म्हणायचे की उठाव?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/25/2010 - 11:59 नवीन
प्रश्न खरा अडचणीत टाकणारा आहे. त्याला विद्रोह म्हणता येईल. प्रस्थापित व्यवस्थेतील अन्याया विरुद्ध पुकारलेले बंड. इंग्रजांच्या काळात ही व्यवस्था परकीय म्हणता येत होते आता स्वकीय म्हणावे लागेल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चिरोटा गुरुवार, 02/25/2010 - 19:11 नवीन
बहुतांशी भारतिय राजकारण्यांकडे बराच काळा पैसा आहे. भाषेचे,धर्माचे राजकारण करणारे लोकही ह्यात मागे नाहीत.हा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यांच्या घरावर हल्ला केला तर देशद्रोह ठरेल का? की तेव्हा राजकारणी लोकांना घटना/कायदा वगैरे आठवेल? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रमेय Fri, 02/26/2010 - 02:59 नवीन
मला एका कळत नाहिये, वरील प्रकरणात, शेतकरी मंडळी जमीनीच्या बदल्यात जमीन का नाही मागत? सरकारवर हे बंधन राहील की, सर्वांना जमीनच हवी आहे पैसा नाही. अजून एक, शेतजमीनीवर ही कंपनी लगेच बाधंकाम कसे काय करू शकते? नॉन-अ‍ॅग्री (NA) होण्यास ५ वर्षे नाही का वाट बघावी लागत? का पैशाने सगळे नियम विकत घेता येतात? आणि, ही मंडळी मिळून त्या कंपनीशी वाटाघाटी का नाही करत? ती पडीक जमीन आम्ही कमी किमतीत समपातळीत आणून देउ, पण आमची जमीन नाही देणार. कंपनीस जागेची सोय पाहता, ही काय आणि ती काय? शहरापासून जवळ असणे महत्वाचे! नाही काय? आडमूठपणा असल्यास IT सेक्टर कडे तक्रार केली जाउ शकते की नाही?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/01/2010 - 08:12 नवीन
राजीव साने यांच्या पर्यंत सर्व प्रतिक्रिया पोचवल्या आहेत. त्यावर त्यांचे असलेले विवेचन हे एखाद्या लेखातुन प्रितिबिंबित होईल. स्वतंत्रपणे लिहिणे व्यावहारिक दृष्ट्या त्यांना शक्य होणार नाही. असा काही लेख आला कि आम्ही तो आपल्यापर्यंत पोहोचवू. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ट
टिम्बु Tue, 03/02/2010 - 13:49 नवीन
एक्नदरीत सगळ्या चर्चेवरुन असे दिसते की भारतात लोकशाही फार दिवस तग धरु शकनार नाही. नन्तर काय यावर चर्चा व्हायला हवी. आम्ही आपुले लिम्बु - टिम्बु......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा