पाककृती

पायनॅपल कस्टर्ड

Primary tabs

पायनॅपल कस्टर्ड साहित्य : १ अननस, १ चमचे कस्टर्ड पावडर, १/२ लिटर दूध, २ चमचे साखर, १ चमचा वेलची पावडर, २ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम कृती : मंद आचेवर दूध आटवून घ्या. त्यानंतर १/४ कप वेगळं दूध घेऊन ते गरम करुन घ्या. या दुधात कस्टर्ड पावडर घालून नीट ढवळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. कस्टर्ड घातलेल्या दुधात आटवलेलं दूध घाला. मिश्रण ढवळत रहा. २-३ मिनिटे मिश्रण उकळू द्या. नंतर त्यात वेलची पावडर घाला. अननस चिरुन त्यात साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळाने हे तुकडे मिश्रणात घाला. सव्‍‌र्ह करताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम घाला. ==================================== नमस्कार मि नविन सद्स्य आहे मिपा वर त्यामुळे सुरुवात गोड....... तर सारच काहि गोड.

अरे व्वा छान वाटतेय पाकृ...लोकसत्तामध्ये पण अशीच पाकृ आली होती...
दिपाली :)

झुळूक

स्वागत सायली,
सुंदर पाक आहे. खुपच गोड सुरुवात!

शुचि

मस्त आहे पाकृ. स्वागत आहे मिपावर आपलं : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)