Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दार्थ हवा आहे.

अ
अन्या दातार
गुरुवार, 03/04/2010 - 10:22
🗣 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6182 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/04/2010 - 11:09 नवीन
पहिल्यांदा ऐकतोय. चांदोबाच्या कथेतील पात्राचे नाव वाटते प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/04/2010 - 14:58 नवीन
>>पहिल्यांदा ऐकतोय सहमत आहे. शब्द पहिल्यांदाच ऐकतोय. आपल्याला हवा असलेला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी 'मराठी शब्दरत्नाकर' उचकून पाहिला. पण शब्दाचा अर्थ काही सापडला नाही राव. क्षमस्व. :( उद्या नव्याने प्रयत्न करुन पाहीन. फक्त या शब्दावर आपण का अडलात ? कशासाठी त्या शब्दाचा अर्थ शोधत आहात ? का उगाच आम्हाला कामाला लावत आहात, जर खुलासा झाला तर बरं वाटेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
भ
भिडू गुरुवार, 03/04/2010 - 15:46 नवीन
पहिल्यांदाच ऐकतोय विताभय म्हणजे शंकर्,विष्णू विताहरया म्हणजे कृष्ण http://www.indiaparenting.com/names/index.shtml
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन गुरुवार, 03/04/2010 - 15:32 नवीन
हॅहॅहॅ .. युआरएल चुकलीये :)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 03/04/2010 - 15:45 नवीन
"वितांशक" म्हणजे............म्हणजे हा बोल........हा आलो चल........... १ मिनिट हा........आलो :?
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/04/2010 - 15:55 नवीन
दातार वाक्य द्या ज्यात हा शब्द वापरला आहे. असं काही आहे का - तो वितांशक वृतीचा होता.मी म्हणेन ते विध्वंसक च्या जागी चुकून पडलय. तसं असेल तर टारगटांच्या भाषेत सांगायचं झालं तर "पब्लीक का उगा टिपर्‍या बडवून राहीलय" ...... सोडा ना राव. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 03/04/2010 - 16:20 नवीन
आमच्या एका फॅमिली फ्रेंडना त्यांच्या मुलाचे थोडे "ऑफबीट" नाव ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांनी हा शब्द निवडला. पण त्याचा अर्थ काय हे काही केल्या सापडेना. म्हणून मी इथे पोस्ट टाकली. असो. बघा सापडतोय का काही अर्थ ते! 8>
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 03/04/2010 - 16:32 नवीन
नावाची निवड मात्र दाद देण्याजोगी आहे राव! हे बरंय .. आधी नाव निवडा मग अर्थ शोधा?? चायला भलता काही अर्थ निघाला झाल्या?? पोराच्या भवितव्याचा प्रश्न आहे!! कशाला नस्ते उपद्व्याप.. उद्याच्या जमान्यात त्या पोराला तरी त्याचं स्वतःच नाव असं 'ऑफबीट' (खरंतर विचित्र!) असलेलं आवडेल का हो? -- विध्वंसक. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
च
चतुरंग गुरुवार, 03/04/2010 - 16:41 नवीन
नावच "ऑफबीट" असं का नाही ठेवत? :? (ह.घ्या.) ---------------------------- मोल्सवर्थ शब्दकोषात सगळ्यात जवळचा शब्द सापडला तो "वीतशंक" असा आहे. वीत - ह्या शब्दाचा एक अर्थ 'च्या पासून दूर गेलेला' असा आहे - वीतराग (हे महावीराचं एक नाव आहे - रागापासून दूर गेलेला, रागाव्र विजय मिळवलेला), वीतभय, वीतशोक इ. नावे आढळतात. त्या अनुषंगाने वीतशंक - म्हणजे जो नि:शंक आहे असा अर्थ असावा. चूभूदेघे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ध
धनंजय गुरुवार, 03/04/2010 - 17:37 नवीन
ज्याचा थोडासा अंश (अंशक) गळून पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नितिन थत्ते गुरुवार, 03/04/2010 - 17:46 नवीन
हा तर भयंकर अर्थ आहे. पोरगा मोठेपणी (त्याला जेव्हा अर्थ कळेल तेव्हा) शिव्या घालील. काय गळून पडले असेल असे समजायचे? =)) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 18:50 नवीन
भयानक अर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नाद्खुळा Fri, 03/05/2010 - 08:46 नवीन
वितांशक हे काहि अर्थि. निगेटिव्ह नाव वाटते पन अर्थ कळायला हवा .. शोधुयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
त
तिमा Fri, 03/05/2010 - 15:17 नवीन
नांवच 'ऑफबिट' ठेवा की! सगळ्यांच्या लक्षांत राहिल कायमचे! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
म
मी-सौरभ गुरुवार, 03/04/2010 - 19:10 नवीन
नाव हे असलं ठेउन पुड पोराला हाका मारणं म्हंजे तापच की???????? "वितांशक" चा 'वित्या' करनार बगा सग्ळे :) :) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 03/04/2010 - 20:42 नवीन
पण जर पोरांनी त्यातलं पहिलं अक्षर बदललं तर ... :? ;) ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
प
पक्या गुरुवार, 03/04/2010 - 20:08 नवीन
आमच्या एका ओळखीतल्यांना पण असेच ऑफबीट (संस्कॄत) नाव ठेवायचे होते मुलाचे. त्यांनी शैवल हे नाव निवडले. नंतर त्यांना समजले की त्याचा अर्थ शेवाळ असा आहे मग दुसरे साधे सरळ नाव शोधले. आपल्या मित्राचे असे होऊ नये. तसेही वितांशक चा अर्थ काही ही असला तरी (चांगला / वाईट) नाव मात्र कानाला अजिबात गोड वाटत नाहीये. विद्वंसक , विनाशक , विघातक अशा पठडीतला शब्द वाटतोय. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/05/2010 - 00:22 नवीन
एकांनी कृतांत नाव ठेवलं. बारशाच्या वेळीच लोकांच्यात दबकत कुजबूज सुरू झाली. ते यमाचं नाव हे आईबापांना नक्की कोणी सांगितलं कळलं नाही. पण सगळ्यांना एकदम फार्मल धन्यवाद पत्रिका गेली व धन्यवाद करणाऱ्यात पोराचं नाव कृतार्थ होतं. (म्हणजे, तुमचीच ऐकण्यात चूक झाली बरंका...) राजेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 03/05/2010 - 00:39 नवीन
कृतार्थ झाल्यानंतर आईबाप आता संन्यास घ्यायला मोकळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शाहरुख Fri, 03/05/2010 - 01:21 नवीन
हा हा हा..असली ऑफबीट खाज का असते लोकांना ?? सरळ बबन, राजू असले काहीतरी नाव ठेवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
J
jaypal Sat, 03/06/2010 - 18:39 नवीन
काय आहे , आज काल हमदो हमारा एकच असल्याने आई-बापाकडे असल्या (नाव ठेवायच्या) गोष्टींसांठी भरपुर वेळ असतो. पुर्वी बघा १०/१२ पोर असायची एक जोडप्याला, वेळ असा मिळायचाच नाही फालतु गोष्टींसाठी.. लै बिझी असायची राव कामात Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
न
नाद्खुळा Fri, 03/05/2010 - 11:40 नवीन
वितांशक हे नाव एखाद्या काढ्यासारखे वाटते वितांशक चुर्ण वितांशक वटी अस काहिसं ... अर्थ शोधत बसण्या पेक्षा या नावाचा काढाच काढावा ....... म्हणजे नन्तर वितांशक = ( विता (विटामिन चा) अंश वाढ्वणारे ऑषध असा होइल ) चु भु दे घे
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 03/05/2010 - 17:40 नवीन
एकाच वेळी दोघांनी चुका केल्याने निष्पन्न झालेल्याचे नाव 'एकसमयावेच्छेदेकरुन' कसे वाटेल? ;)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 03/06/2010 - 09:55 नवीन
एकाच वेळी दोघांनी चुका केल्याने निष्पन्न झालेल्याचे नाव 'एकसमयावेच्छेदेकरुन' कसे वाटेल?
:)) ती जर मुलगी असेल तर हाक मारण्यासाठी शॉर्टफॉर्म... 'अगं, एकीकरून ये'...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विसोबा खेचर Sat, 03/06/2010 - 06:34 नवीन
वितांशक हे जुलाबाच्या किंवा मुरड्यावरच्या एखाद्या आयुर्वेदिक औषधाचं नांव वाटतं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा