Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेनेचा गुन्हा काय?

न
नील_गंधार
गुरुवार, 03/11/2010 - 08:06
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2891 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चिरोटा गुरुवार, 03/11/2010 - 10:27 नवीन
मला नाही वाटत कोणी जाणून बुजुन टिका करत असेल. काँग्रेस्/राष्ट्रवादी/मनसे ह्या पक्षांवरही टिका अनेकवेळा होते.गेल्या पाच वर्षातला कारभार बघितला तर मनमोहनसिंग ह्यांचा अपवाद वगळता सर्वच व्यक्तींवर/पक्षांवर टिका झाली आहे. शिवसेनेवर जास्त टिका होण्याचे कारण त्या पक्षातील व्यक्तींकडून वापरली जाणारी भाषा. गेल्या काही महिन्यांतली उद्धव ठाकरे ह्यांची वक्तव्ये तपासा-थोबाड फोडू,जिवंत ठेवणार नाही... एकदम बाळासाहेब इश्टाईल. ज्या व्यक्तींना समाजात स्थान आहे अशा व्यक्तींबद्दल सेनेच्या मुखपत्रात बर्‍याच वेळा अत्यंत हलकी भाषा वापरली जाते.मात्र तशीच भाषा सेनेबद्दल वापरली गेली की मग काळे फासणे,हल्ले करणे. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
अ
अनामिका गुरुवार, 03/11/2010 - 11:19 नवीन
माझ्या मते आपण वर नमुद केलेल्या कारणांची दखल घेता सेनेची चुक एकच पक्ष स्थापनेच्या वेळी घेतलेल्या "८०% समाजकारण व २०% राजकारण" या मुलभूत भुमिकेशी कालांतराने घेतलेली फारकत.........सेनेने समाजकारण सोडून राजकारणाच्या या दलदलीत उतरायलाच नको होते असे मनापासुन वाटू लागले आहे.अर्थात हे माझे व्यक्तिशः मत आहे....... बाकी कुणी कितीही आग पाखड केली म्हणुन कुणी संपत नाही.......... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 03/11/2010 - 12:47 नवीन
अगदी १००% सहमत! मूळ धोरणाशी फारकत घेतली हे मुख्य कारण! त्याशिवाय काँग्रेसला वैतागलेल्या मराठी मनाला यांचा आधार वाटत होता. पण नंतर अवाच्यासवा बेहिशोबी संपत्ती कमावणे, राडेबाजी, दादागिरी या अवगुणांमुळे यांच्यात आणि काँग्रेसमधे फरक काय असे वाटत असतानाच 'घराणेशाही' चालवून काँग्रेसमधे व आमच्यात काहीच फरक नाही हे ह्यांनी दाखवून दिले आहे. एवढे झाल्यावर कोण समर्थन करणार ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
क
कवितानागेश गुरुवार, 03/11/2010 - 14:13 नवीन
..म्हातार्या वाघाला दगड मारायला सगळेच येतात पूढे! ============ माउ
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 03/11/2010 - 18:10 नवीन
मूळ लेखाशी सहमत. समस्त माध्यमे शिवसेना, भाजप(त्यातही जास्तीकरुन मोदी) यांना लक्ष्य करुनच बातम्या(?) देत असतात. राजदीप सरदेसाई तर जे ओपन डिबेट वगैरे घेतो, त्यात कधीच या पक्षाच्या लोकांना बोलण्याची पुरेशी संधी देत नाही आणि इतर पक्षांची तरफदारी करतो. शिवसेनेचा प्रभाव कमी होण्याची कारणे: १. कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद- जेंव्हा शिवसेना जोशात होती (म्हणजे बाळासाहेबांचा काळ) तेंव्हा कोणताही कार्यकर्ता मातोश्रीवर जाऊ शकत होता; कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय! नंतर मात्र दलालांचे प्रस्थ वाढल्यावर तेथे जाणे मुश्किल तर झालेच; वर कार्यकर्त्यांचा उत्साहही कमी झाला. २. बेताल वक्तव्ये: कोणत्याही व्यक्तिवर केलेली अवास्तव चिखलफेक शाहरुखबद्दल जी भूमिका घेतली ती योग्यच होती. जर शाहरुखला असे वाटत असेल की पाक खेळाडूंनी आयपीएल मधे खेळावे तर त्याने बोली लावायला हवी होती. नंतर त्यांची बाजू घेण्यात काय मतलब आहे? रॉल (राहूल) गांधीना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत असताना केलेली पोलिस कारवाई ही नक्कीच भूषणावह नव्हती.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 03/11/2010 - 19:55 नवीन
मुळ लेख आणि ह्या प्रतिसादाशी सहमत.. बाळासाहेबांविषयी खूप सहानभूती वाटते.... उद्धव शिवसेना इतकी काही वाईट चालवत नाही आहे. पण चहूबाजूंनी होणार्‍या हल्ल्याने बावचळल्यासारखा वाटतोय. त्यातही घरचीच मंडळी (राज, स्मिता) अधिक... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
न
नील_गंधार Fri, 03/12/2010 - 06:44 नवीन
उद्धव शिवसेना इतकी काही वाईट चालवत नाही आहे. पण चहूबाजूंनी होणार्‍या हल्ल्याने बावचळल्यासारखा वाटतोय. त्यातही घरचीच मंडळी (राज, स्मिता) अधिक... अगदी हेच म्हणु इच्छितो. कालच स्मिता ठाकरे(कि चित्रे?) ह्यांची मुलाखत पाहण्याचा योग आला. शिवसेनेत वा ठाकरे परिवारात २३ वर्षे काढल्यानंतर ,शिवसेनेची भुमिका योग्य नसल्याचा साक्षात्कार ह्या बाईंना झालाय व आता ह्या काँग्रेस प्रवेशाच्या वाटेवर आहेत. वास्तविक ह्यांचे आडनाव ठाकरे नसते तर ह्या बाईंनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला असता तरी ह्यांना एवढी प्रसिध्दी मिळाली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
न
नम्रता राणे Fri, 03/12/2010 - 08:45 नवीन
स्मिता ठाकरे म्हणतात " मी शिवसेनेत कधीही नव्हते.. बाईग.. शिवसेना आणी ठाकरे या वजनदार नावामुळेच फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळाला.. अन्यथा 'एक्स्ट्रा' म्हणुन जायची तरी लायकी होती का? घर फिरलं तर घराचे वासेही फिरतात अशी सेनेची सद्यस्थिती आहे... दुसरं काय... असो...
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 03/12/2010 - 10:35 नवीन
स्मिता ठाकरे यांच्याविषयी तर न बोललेलच बरं त्यांनी फक्त ठाकरे आडनावापासुन फारकत घेऊन स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करावा........"खाल्ल्या घरचे वासे मोजतायत".......काँग्रेसचा अतिशय उमाळा आलाय सध्या ......राहुल सोनियांचे गोडवे गाणे सुरु झालेय ......आता बघु कधी प्रवेश करतायत काँग्रेसमधे ते?.एकदा प्रवेश झाला की वहिनीसाहेब स्टाईल एक थिल्लर व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी मालिका .....सोनियादेवींवर देखिल प्रसवून प्रेक्षकांच्या माथी मारली नाही म्हणजे मिळवले! बाकी प्रसारमाध्यमे तर विडा उचलल्याप्रमाणे नव्हे सुपारी घेतल्याप्रमाणे बातम्या देत आहेत.......त्याला मराठी वृत्तवाहीन्यादेखिल अपवाद नाहीत.....अतिरेक्यांना आर्थिक मदत करुन त्यांना पळुन जाण्यास मदत करणारे अबु आझमी व सलाम सारखे नेते हे राष्ट्रभक्त आणि केवळ प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करत हिंदुत्वाच व मराठीच राजकारण करणारा सेनेसारखा पक्ष हा या तथाकथित विचारवंताच्या व पत्रकारांच्या मते राष्ट्रद्रोही ठरतोय...... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Fri, 03/12/2010 - 19:57 नवीन
ठाकरे नाव सोड मग कोण विचारतय पाहु - परवाच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाकरे आडनाव वापरता येत नाही शाहरुखबद्दल जी भूमिका घेतली ती योग्यच होती. जर शाहरुखला असे वाटत असेल की पाक खेळाडूंनी आयपीएल मधे खेळावे तर त्याने बोली लावायला हवी होती. नंतर त्यांची बाजू घेण्यात काय मतलब आहे? रॉल (राहूल) गांधीना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत असताना केलेली पोलिस कारवाई ही नक्कीच भूषणावह नव्हती. १००% सहमत सर्वांचे फोडा व झोडा हे तंत्र सुरु आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा