मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई
💬 प्रतिसाद
(11)
ड
डावखुरा
गुरुवार, 03/11/2010 - 16:15
नवीन
तिरुपति येथे भक्त निवासाची व्यवस्था उत्तम, विपुल आहे.....तिथे गेल्यावर मन्दिरजवळच भक्तनिवासाचि नोन्दणी होते......
आणि सर्वप्रथम गोविन्द्स्वमिन्चे दर्शन घ्यावे....त्त्यानन्तर बालाजिन्चे दर्शन घेउन मग पद्मवतिदेविन्चे दर्शन घ्यावे आणि जर शक्य असेल तर यानन्तर कोल्हपुरला महालक्श्मिचे दर्शन घेउन मग आपली यात्रा पुर्ण होते.....
तिरुपति बालाजिचे दर्शन यापध्दतीने घेतल्यास यात्रा पुर्ण होते असा समज आहे...
आणि जर वेळ मिळाला तर वेल्लोर येथिल महलक्ष्मि मन्दिर...अम्रुत्सर सारखे पुर्ण सुवर्ण आहे....काला हस्ती - पुरातन महादेव मन्दिर प्रेक्षणिय आहे....
शुभ यात्रा!!!
"राजे!"
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 03/11/2010 - 16:58
नवीन
http://www.ttdsevaonline.com/Home.aspx
हे देवस्थानचे संकेतस्थळ आहे. सर्व माहिती मिळेल असे वाटते. रहाण्याची सोय सुद्धा ऑनलाईनच करता येऊ शकेल.
---------------------------------------
प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या सूचना -
१ - गरम कपडे जवळ ठेवा तिरुमला डोंगरावर बर्यापैकी थंडी असते.
२ - अगदी लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती सोबत असतील तर दर्शनासाठी पहाटेची वेळ निवडा - मंदिरात शेवटच्या टप्प्यात प्रचंड ढकलाढकली, रेटारेटी असते, गुदमरुन जीव घाबरा होतो - असे होऊ लागल्यास चक्क गर्दीतून बाजूला व्हा (तेही अवघड असते!). दर्शन झाले नाही तरी चालेल, जीव महत्त्वाचा!
३ - आम्ही रस्ता चुकलो, पैसे चोरीला गेलेत रोख पैशाची मदत करा असे सांगणारी काही मराठी कुटुंबे भेटतात, त्यांच्याबरोबर बायका माणसे, लहानगे असतात. तुमचा पत्ता द्या पैसे मिळाले की मनिऑर्डर करतो असे सांगतात. भावनेच्या भरात चुकूनही ह्याला बळी पडू नका.
ही टोळी आहे.
-----------------------
शुभेच्छा!! :)
चतुरंग
- Log in or register to post comments
क
कुंदन
Tue, 04/27/2010 - 08:51
नवीन
>>आम्ही रस्ता चुकलो, पैसे चोरीला गेलेत रोख पैशाची मदत करा असे सांगणारी काही मराठी कुटुंबे भेटतात,
तिथे पण हे प्रकार का?
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 04/27/2010 - 09:10
नवीन
हा प्रकार बेंगळूरुतही आहे.मी गेले सहा वर्षे एक 'हरवलेले' मराठी कुटुंब कायम पहात आहे.सुरुवातीला हे कुटुंब औरंगाबदहून आले होते.त्यानंतर सहा महिन्यांनी भेटले तेव्हा त्यांची नागपूरला जाणारी ट्रेन चुकली होती म्हणून ते पैसे मागत होते.मी जेवण देतो असे सांगितल्यावर 'जेवण नको पैसे पाहिजेत' म्हणाले. शेवटी एकदा न राहवून मी सांगितले- कुठून आलात ते एकदा ठरवा आणि मग पैसे मागा.दर सहा महिन्यांनी तुम्ही तुमचे गाव बदलता.!
भेंडी
P = NP
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/27/2010 - 09:19
नवीन
बंगलोर ष्ट्यांडावर मी पण असे कुटुंब बघितले आहे. गरिब पण एकदम टापटीप. मराठी बोलणारा माणूस हेरून त्याच्याकडे जाऊन असली कहाणी सांगतात की ऐकणारा बेसावध असेल तर नक्कीच पैसे देतो. मी नाही दिले... थोड्यावेळाने अजून एक असेच कुटुंब एका गुजराथी माणसाला गुजराथी मधून तशीच करूण कहाणी ऐकवताना दिसले. :)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 04/27/2010 - 09:28
नवीन
तेच असणार ते! :)
आनंदराव सर्कल/मॅजेस्टिक परिसरात फिरत असतात.
भेंडी
P = NP
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 04/27/2010 - 10:01
नवीन
मी पण असे कुटुंब पाहीले आहे.
एकदा एन.जी.ए.एफ परिसरात. आणि एकदा ओल्ड एअरपोर्ट रोडवर.
पण ह्याआधी मुंबईत असताना अश्या एका कुटुंबाने मला गंडा घातला होता.(सर्व महीलाच होत्या आणि रडकुंडीला येऊन सांगत होत्या की आमची माणसे चुकामुक झालीय.मदत करा.)
त्यामुळे पुन्हा बळी पडलो नाही.
एक जण महाराष्ट्र मंडळा बाहेर भेटला होता.त्याला मंडळातील हॉटेलमध्ये जेवु घातले.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/05/2010 - 15:22
नवीन
मी गेले सहा वर्षे एक 'हरवलेले' मराठी कुटुंब कायम पहात आहे.सुरुवातीला हे कुटुंब औरंगाबदहून आले होते.त्यानंतर सहा महिन्यांनी भेटले तेव्हा त्यांची नागपूरला जाणारी ट्रेन चुकली होती म्हणून ते पैसे मागत होते.मी जेवण देतो असे सांगितल्यावर 'जेवण नको पैसे पाहिजेत' म्हणाले. शेवटी एकदा न राहवून मी सांगितले- कुठून आलात ते एकदा ठरवा आणि मग पैसे मागा.दर सहा महिन्यांनी तुम्ही तुमचे गाव बदलता.!
हहपुवा झाली. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sat, 04/17/2010 - 11:51
नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
-- आपला स्नेहांकित,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
- Log in or register to post comments
S
sahil ashok
Tue, 04/27/2010 - 08:46
नवीन
भक्त निवासा मध्ये निट काळजि घ्या चोर्या होतात.
चेन्नई पासुन ५२ कि. मि. महाबलिपुरम हे थिकान देखिल बघन्या सारर्खे आहे. तसेच चेन्नई मधिल मरिनाबिच खुप लोकप्रिय आहे.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 04/27/2010 - 09:27
नवीन
प्रकाटाआ
- Log in or register to post comments