तात्यांनी पण महिला दिनाची भेट उशीरा का होईना दिली . हे ही नसे थोडके :-)
त्यांचा http://www.misalpav.com/node/11365#comment-181318 हा प्रतिसाद खरेच वाखणण्यायोग्य =D>
पुन्हा एकदा अभिनंदन !!
~ वाहीदा
इस्टकोस्टावर एक दगड मारा, दहातल्या एका संपादकाला लागणारच तर! हे अगदी पूर्वी पुणे आणि 'विचारवंत' यासंदर्भात म्हणायचे तसं झालं की...
आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया...
>>> आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया...
--- चालेल. किंचित सुधारणा सुचवू का? पूर्वी पूर्वेचं ऑक्सफोर्ड म्हणायचे, त्या धर्तीवर पूर्वेचं केम्ब्रिज म्हणता येईल.
बाकी 'पुणे तिथे काय उणे?' चे उत्तर संपादक असं येईल असं कधी वाटलं नव्हतं हो. :)
आपल्या मिपावर गंभीर, टवाळ, आचरट, बावळट, हुशार आणि काही कपटी लोकांचा वावर दिसतो. तरी या सर्वांना शिस्त लावण्याचे काम आपण करावे ही विनंती!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
सर्व प्रतिसादकांचे आभार!
तात्यांचे आभार मानायचे राहिले होते कारण मी संपादक असल्याचे मला स्वत:ला दोनेक दिवसांनतर समजले .......त्यानंतर 'असा मी काय गुन्हा केला' हे गाणे मनातल्यामनात म्हणून झाले.;) तात्यांचे मनापासून आभार!
सध्या शक्य त्या सर्व धाग्यांवर जाऊन दमदाटी करण्याची प्रॅक्टिस चालू आहे. कालच आमचे सहसंपादक चतुरंग यांच्या 'बतावणीमधील' एक चूक आम्ही दुरुस्त केली.
'मंगेश पावसकरांच्या वाढत्या कारवायांवर लक्ष ठेवणे' ही जबाबदारी माझ्यावर खासकरून टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाककृती विभागातील चिमूट व चमच्यांची (मापाच्या....मापे काढण्याच्या नव्हे), वाट्यांची चुकलेली प्रमाणेही दुरुस्त करण्यासाठी मित्रपरिवाराने माझ्याकडे येण्यास हरकत नाही.
मिपागावचे अनुभवी संपादक मला (लहानग्या कोकराला ;) ) सांभाळून घेतील अशी आशा आहे. पुन्हा एकदा मित्रपरिवाराचे व तात्यांचे आभार मानते.:)
रेवती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी