जे न देखे रवी...

चाळ ही हदरून जाते

Primary tabs

आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना चांदणे शिंपित जाशी

चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले
देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे

वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा
काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले

वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या
जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

जबरा................................!!! क्या बात है !!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

लिखाळ

फार मस्त !
चालीवर म्हणून पाहिली... मजा आली.

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

जबरा................................!!! क्या बात है !!

हेच म्हणतो...क्या बात !!!
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु

वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या
जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले

हे तर भन्नाटच..

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग

मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या?
राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर!

मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड!

चतुरंग

केशवसुमार

मिळाली आहे एका कडून २०-२५ चांगल्या गाण्यांची...;)
(सुपारीवाला)केशवसुमार..

ऋषिकेश

अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

केशवा,

तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन..

- सर्किट

ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..

गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

क्या बात है. अप्रतिम.

२० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला.

वाट पाहातो.

केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार.

प्रसन्न

हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय.
बाकि विडंबन एकदम झकास

विसोबा खेचर

केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :)

बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;)

सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला.

हेच म्हणतो...!

प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय.

मस्त! :)

आपला,
(चांदण्यातला) तात्या.

ऑरकुट वरील "झेंडूची फुले परंपरा" ही कम्युनिटी जॉईन करण्याचे सादर आमंत्रण.