त्यानंतर सगेळ्च थांबले आहे ...
💬 प्रतिसाद
(15)
व
विसोबा खेचर
Tue, 03/16/2010 - 18:35
नवीन
सोनाली, अशी काय चमत्कारीक कविता केली आहेस?
समजलीच नाही..
बरी आहेस ना अलिकडे? :)
तात्या.
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Tue, 03/23/2010 - 18:48
नवीन
काय सांगता तात्या?
पुन्हा वाचा बर. कॉलजचे दिवस, एखादी लाडकी मुलगी आठवत वाचा , सोपी वाटेल कविता.. चमत्कारिक नाही. आणि कविता समजली नाही, चमत्कारिक वाटली म्हणजे एकदम लिहिणार्याशी त्याचा संबंध कशाला?
तशा अधून मधून वेगळ्या प्रकारच्या कविता लिहायला आवडत मला.
सगळेच प्रयोग जमतात असे नाही.
सोनाली
www.eksakhee.blogspot.com
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 03/23/2010 - 18:58
नवीन
हम्म! आता आवडली... सालसची आठवण झाली.. :)
येस्स.. तशी तू खूप गुणी आहेस हे माहित्ये मला! :)
आता हा प्रयोगही जमला आहे असं म्हणायला हरकत नाही! :)
आपला,
(सोनालीचा मित्र) तात्या.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Tue, 03/16/2010 - 19:02
नवीन
काय तरी Tragedy आहे अस वाटत यात.
.............हा असा निष्कर्ष काढायला मला वेळ नाही लागत.
तिच्या गालावरची बट
वारा येतो , बट येते ..
आता हे माझ्यासाठी थांबलय..........
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 03/16/2010 - 19:09
नवीन
धनंजय सरांच्या कवितक लेखाला फुल्टू उत्तर आहे ही कविता =))
जल्ला फक्त मीच मंद झालोय का ? नाही नाही .. तात्याही आहे की वर जोडीला
- संकट समयी
- Log in or register to post comments
प
पक्या
Tue, 03/16/2010 - 22:48
नवीन
त्या मुलाचा बाईक अॅक्सिडेंट झाला की काय?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 03/16/2010 - 23:35
नवीन
कवयित्रीने शेजारच्या तरुणाबद्दल आपल्या भावनेबाबत, किंबहुना कवितेची नॅरेटर कोण आहे (शेजारची तरुणी, सलूनमधून बाहेर येणारी तरुणी...) याबाबतच संदिग्धता ठेवली आहे. मला थोडा ओढून ताणून लागलेला अर्थ हा असा..
शेजारच्या देखण्या तरुणावर प्रेम करणारी मुलगी त्याचं लग्न ठरलंय, आता नवीन पलंगसुद्धा आणला (हा आपल्यापासून शारीर अर्थाने दुरावला, दुसरीचा झाला) म्हणून दु:खी आहे. त्याच्या सहवासाचे किती क्षण आपल्याला आता राहिलेत असा प्रश्न विचारते.
सलूनमधून बाहेर पडणारी ही त्याची होणारी बायको, स्वत: कवयित्री, की तिसरीच कोणी हे कळत नाही. पण तिला मोटरसायकलवर आत्मविश्वासाने घेऊन जाताना, कवयित्रीला केवळ त्याच्या तोंडची शीळ आणि त्याच्या विंडचीटरची थरथर जाणवते. त्याच्याबरोबर वर्तमानात/ भूतकाळात अनुभवत असलेली. कदाचित ह्या फडफडीचा तिला लांबूनच अनुभव असेल... दुसरं काही नाही. किती दिवस आनंद शिल्लक आहे हा प्रश्नही ती आत्तापुरता विसरलेली आहे.
स्वप्नं संपणार हे माहीत असताना, आपली राहिली नाहीत हे जाणवलं असूनही, सत्यामध्ये बुडायच्या आधी डिनायलमध्ये त्या स्वप्नांच्या धुंदीत अगर स्मृतीत जगण्याचे काही काडीसारखे मोजके क्षण हाताला लागतात.
मी लावलेला अर्थ कवयित्रीच्या मनात असलेल्या अधिक गहन प्रतिमांना न्याय करत नसेल अशी मला भीती आहे. पण संदिग्धता आणि दुर्गमता यातून खूप वेळा काव्य सामान्यांपर्यंत पोचायला त्रास झाल्यामुळे रसहानी होते. तेव्हा मी सुवर्णमयींना विनंती करतो की या कवितेचं आपण कृपया रसग्रहण करावं.
राजेश
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Tue, 03/16/2010 - 23:46
नवीन
>>>>तेव्हा मी सुवर्णमयींना विनंती करतो की या कवितेचं आपण कृपया रसग्रहण करावं.
"अ पोएम इज अ पोएम इज अ पोएम" यासारखी वाक्ये कालबाह्य झालेली दिसतात :-)
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Tue, 03/23/2010 - 15:43
नवीन
तुम्हाला जाणवलेला कवितेचा अर्थ बरोबर आहे. यात गहन असे काही नाही. कविता समजली नाही तर ती फसली एवढेच मी मानते.
अधिक चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेन.
रस्त्यावरची तरूणी या कवितेची नॅरेटर नाही. प्रेम असफल ठरलेली तरूणी नॅरेटर आहे.
सर्व वाचकांचे आभार.
सोनाली
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 03/17/2010 - 00:10
नवीन
आम्हाला बुवा दारू नुसती बघून, किंवा वास घेऊन, किंवा ती आहे म्हणून शोकेसमध्ये ठेवून देववत नाही. म्हणूनच तिच्या द्राक्षांच्या पेडिग्रीविषयी, तिच्या रंगाच्या गहिराईविषयी, आणि तिच्यातल्या आत्मिक ऊर्जेचं नेत्रसुख घेणारी चर्चा करणं जमत नाही. जमल्यास आपण ओतून घ्यावी - किंवा उघडायला कष्ट पडत असतील तर साकीकडे उघडून (कॉर्किंग चार्ज देऊन) मागावी. आपण प्यावी व लोकांनाही वाटावी ही आमची फिलॉसॉफी....
तुम्हाला नको असल्यास तुमचा ग्लास आम्हाला द्या.. :-)
राजेश
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Wed, 03/17/2010 - 01:39
नवीन
>>>म्हणूनच तिच्या द्राक्षांच्या पेडिग्रीविषयी, तिच्या रंगाच्या गहिराईविषयी, आणि तिच्यातल्या आत्मिक ऊर्जेचं नेत्रसुख घेणारी चर्चा करणं जमत नाही.
हेच म्हणतो ;-)
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Wed, 03/17/2010 - 05:21
नवीन
एक अनामिक अगतिकता ईथे शब्दा शब्दातुन ओसांडुन वाहाते आहे..
काल्पनिक असावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !!
साधा सरळ अर्थ असा असावा:-
ज्याच्यावर प्रेम केले (जो आवडतो, पण कधी बोलता नाही आले.. कारण काही का असेना) तो आता दुसरीचा होणार \ झाला आहे. त्याला त्याच्या वधु \ प्रेयसी बरोबर जाताना पाहुन कवयित्रीला वेदना होत आहेत.
त्याला दुर जाताना पाहुन तो खरेच किती दूर निघुन गेलाय याची जाणीव तीला होते.. त्याच्या सहवासात कधी काळी अनुभवलेले क्षण तीला आठवतात.. काळ तीथेच गोठुन जावा असे तीला वाटते, पण निष्ठूर जग त्याच्या वेगाने पुढे जातच असते, तिथे तीच्या भावनांना काही किंमत नसते.
घरातल्या म्हातार्या आजीला
भरवणारी बाई..खिडकिशी आहे
इथे ती अगतिकतेची भावना परमोच्च बिंदु गाठते, नियतीपुढे माणुस किती हतबल आहे.. हे इथे सांगायचे आहे.
***********************************
बाकी मान्यवरांकडुन रसग्रहण ऐकायला आवडेल.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
- Log in or register to post comments
S
sur_nair
Fri, 03/19/2010 - 03:04
नवीन
याला कविता म्हणावी का नाही कळत नाही पण मनात एक प्रश्न मात्र निर्माण करतं कि "सगळं काही का थांबलं आहे?" खरच तसा काही वाईट झाला कि कुणाच्या मनात एक क्षण freeze झाला आहे?
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 03/23/2010 - 16:50
नवीन
तिर्हाइताच्या नजरेतून, बळेच आणलेल्या भावनाशून्यतेने सांगितलेले, असे जणूकाही इत्थंभूतवर्णन.
प्रयोग आवडला.
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Tue, 03/23/2010 - 19:17
नवीन
छान आहे. अनाकलनीय वगैरे वाटली नाही. लहानपणी चित्रवर्णन नावाचा एक प्रश्न यायचा स्कालरशिपच्या मराठीच्या पेप्रात, त्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments