जे न देखे रवी...

((कुणि जाल का, सांगाल का..))

Primary tabs

आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना कुणि जाल का, सांगाल का..आणि कवी चतुरंगशेठ यांचे सुरेख विडंबन..(कुणि जाल का, सांगाल का..)

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कविजना ?
जाली तुम्ही खरडू नका, पसरू नका अपुला गळा

कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली
एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली
फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला
आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला

सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले
इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले
सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली
आणि खाजेनेच या खरुज आता वाढली

प्राजु

विडंबनाचे ही विडंबन... मानलं बुवा तुम्हाला..

- (सर्वव्यापी)प्राजु

बेसनलाडू

प्रतिसादांनची?? माला??? इतकी तडजोड करायची पाळी यावी? वाईट वाटले. असो.
(?)बेसनलाडू

केशवसुमार

जर बरोबर लिहिलं तर मग तुमच्यासारख्या लाढवांना काम काय..
सगळ्यांचा विचार करावा लागतो..
(सर्व सामायिक)केशवसुमार

बेसनलाडू

सगळ्यांचा विचार करता म्हणूनच तुम्ही केशवसुमार :)
(!)बेसनलाडू

केशवसुमार

फाजिल गौरसमज आमचे नाही..
आम्ही सुमारच बरे..
(सुमार)केशव

बेसनलाडू

काय पटते/पटत नाही, आवडते/आवडत नाही हे कळले असेलच/कळेलच
(समजूतदार)बेसनलाडू

केशवसुमार

तेल घालून बसले पाहीजे
'आपल्या आवडी'चा प्रश्न आहे!!
(सावध)केशवसुमार

आजानुकर्ण

माला ऐवजी मजला चालले असते का?

(पृच्छक) आजानुकर्ण

बेसनलाडू

आजुनी च्या ऐवजी अजुनही सुद्धा नसते चालले :) फारच सुमार पृच्छा बाबा तुमची :)
(उत्तरदाता)बेसनलाडू

केशवसुमार

पाटी फुटली आई माला भूक लागली
अशी जूनी शाब्दिक दिवाळखोरी ऐकल्याचे आठवत होते.. मजला ही चालले असते
(स्मरणशील शाब्दिक दिवाळखोर)केशवसुमार

विसोबा खेचर

कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली
एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली
फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला
आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला

हा हा हा! हे बाकी मस्तच रे केशवा.... :)

(कंपूबाज) तात्या.

इनोबा म्हणे

आपून तर बॉ केशवाचा फ्यॅनच आहे,पहिल्यापासून....
गोडधोड लाडवापेक्षा मिसळच मस्त लागते...

सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले
इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले
सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली
आणि खाजेनेच या खरुज आता वाढली

केशवा टेंसन नाय घ्यायचं...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

अविनाश ओगले

मूळ गीत... केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा...
प्रेरणा... केशवसुमार आणि बेसनलाडू यांची मैत्रीपूर्ण शाब्दिक चकमक...

केशवा, लाडवा
नका भांडू ठेवा गोडवा.

तरबेज सदस्यांनी विडंबन पुढे चालवावे...

ऋषिकेश

आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला

:))) फक्कड जमलंय राव!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार