जे न देखे रवी...

जेव्हा तिची नि माझी ...

Primary tabs

आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना जेव्हा तिची नि माझी...

जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली
जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली

पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले
तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले
स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली

नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे
अन काळजीत होते, माझ्या घरात सारे
हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली

कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो
बोलीत मंद होतो चालीत मंद होतो
आजन्म सोबतीला काठी मला मिळाली

आनंदयात्री

नको तिथे हा मेला नेहमीच तोंड घाली
'केश्या' तुला बघ आज अद्दल कशी घडाली

विजुभाऊ

जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली
जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली ............
मस्त रे थेट मीटर मध्ये आहे.......सूचना द्यायला जर्राही जागा नाही....
..............................मीटर रीडर
विजुभाऊ

ॐकार

आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन चांगले झाले आहे!

तळटीपः
पाडगावकर म्हटले की मला सर्वप्रथम लिज्जत पापड आठवतात. कविता वगैरे मागाहून आठवतात. असो.

विसोबा खेचर

पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले

ही ओळ सर्वात मस्त! :)

केशवा, अजूनही विडंबने येऊ देत रे...

तात्या.

धमाल मुलगा

जबरा...
शेठ लय भारी!!!!

नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे
अन काळजीत होते, माझ्या घरात सारे
हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली

डोळ्या॑पुढे आल॑ चित्र :-)

बेसनलाडू

एकदम जबरदस्त विडंबन. शेवटचे कडवे लईच भारी.
एकूणच विडंबन फारच आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

जुना अभिजित

हेच म्हणतो..हेच म्हणतो..हेच म्हणतो.. ;-)

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडूशी सहमत !

- सर्किट

(अवांतरः काय वेळ आली आहे.. जगबुडीची चिन्हे..)

केशवराव, विडंबन अनेकार्थांनी भारी आहे. 'अथ'पासून 'इति'पर्यंत (म्हणजे धडकून भेटण्यापासून काठी मिळेपर्यंत) आवडले.

ह्या विडंबनाचा 'म्यूज़िक विडिओ' काढायला हरकत नाही. अगदी मजेदार होऊ शकतो.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मस्त आयडिया !!

(राखी सावंत हल्ली जाड झाली आहे असे ऐकिवात आहे.)

- सर्किट

सर्वसाक्षी

वा केशवशेठ,

पाडगावकरांचे नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन झाले, आता तुम्ही त्यांना तारे दाखवा!
झकास जमलंय.

चतुरंग

पाडगावकरांनी वाचलं तर स्वतः सुध्दा दाद दिल्यशिवाय रहाणार नाहीत. आणि माझ्या डोळ्यांसमोर अरुण दाते गाताना आले काय विलक्षण दॄश्य असेल ना?;))

चतुरंग

सुवर्णमयी

केशवसुमार,
आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन छान झाले आहे.
सोनाली

ब्राव्हो, केसु.

जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली

पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले
तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले
स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली

जवाब नही. पाम ऑलिव्ह लाजला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

अविनाश ओगले

कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो
बोलीत मंद होतो चालीत मंद होतो
आजन्म सोबतीला काठी मला मिळाली

क्या बात है... बहोत बढिया...

केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार

वाचकांपैकी मी सुद्धा एक. कारण शब्दच थिटे पडले तुमचे कौतुक करायला...

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...