Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीकृष्णाची चूक

य
युयुत्सु
Mon, 03/29/2010 - 07:34
🗣 64 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19550 वाचन

💬 प्रतिसाद (64)
आ
आनंद घारे Wed, 03/31/2010 - 04:28 नवीन
छान चर्चा चालली आहे, त्यामुळे मलाही चार ओळी लिहिल्याशिवाय राहवत नाही. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. "केलेल्या कर्माचे फळ मिळणारच नाही" असे श्रीकृष्णाचे सांगितलेले नाही किंवा "त्याची आशा धरू नकोस" असेही नाही. "हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसि महीम्" असे सांगून "दोन्ही बाजूंनी तुझा फायदाच आहे" अशी आशा त्याने अर्जुनाला दाखवली होती. "कर्मावर तुझा अधिकार आहे, तू ते करू शकतोस आणि केले पाहिजेस, त्याचे अमूकच फळ मिळणे हे तुझ्या हक्काचे आहे असे समजू नकोस आणि त्याचा विचार करण्यात आपली शक्ती, बुध्दी आणि वेळ वाया न घालवता या क्षणी जे योग्य आहे ते कर्म तू करायला हवेस"' हा युध्दभूमीवर दिलेला उपदेश आहे. आजसुध्दा लढाईत उतरलेल्या सैनिकाला समोरच्या शत्रूवर सर्वशक्तीनिशी हल्ला करायचा असतो. आपल्याला त्यातून परमवीरचक्र मिळायला पाहिजे असा विचार त्या वेळी तो करत नाही. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. आपल्या कर्मातून अपेक्षित असलेली गोष्ट घडून आली, त्यामागीव उद्देश सफल झाला, तर त्यातून मनाला जे समाधान मिळते तेवढे फळ बहुतेक वेळी पुरेसे असते. त्यासाठी आवश्यक तेवढी कार्यक्षमता बहुतेक लोक दाखवतात. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. ही गोष्ट कोठल्याही व्यक्तीला, समाजाला किंवा देशाला लागू पडेल. कर्मे जर वेगळ्या प्रकारे केली तर त्यांचा वेगळा परिणाम दिसेलच. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला... 'कर्म' या शब्दातच 'एफिशियन्सी' अंतर्भूत आहे. प्रत्येक कर्मामागे उद्दिष्ट असते आणि कार्यक्षमतेनुसार ते गांठले जाते. किंबहुना 'किती श्रम केल्यानंतर किती प्रमाणात उद्दिष्ट गांठले गेले' यालाच 'कार्यक्षमता' असे म्हणतात. शत्रूपासून स्वतःचा बचाव करून घेत त्याचा नाश करणे हे युध्दाचे 'उद्दिष्ट' असते, तर त्यानंतर त्याच्या संपत्तीवर कबजा करून तिचा उपभोग घेणे किंवा पदोन्नती, प्रसिध्दी, मानमरातब वगैरे प्राप्त करणे हे त्याचे 'फळ' समजले जाते. 'फळ' आणि 'उद्दिष्ट' यातला फरक उमगला नसेल तर लेखकाने लिहिल्यासारखा विचारांचा घोळ होतो. त्यामुळे "कृष्ण चुकला" असे म्हणण्याऐवजी "त्याच्या उपदेशाचा चुकीचा अर्थ लावला गेला" असे म्हणावे लागेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
D
Dipankar Wed, 03/31/2010 - 06:34 नवीन
कृष्ण काय कचेरीत सुद्धा पगारवाढ देतान हेच सांगतात फळाची आशा न करता कर्म करा :)
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 03/31/2010 - 08:08 नवीन
परफॉर्मन्स पाहून पगारवाढ देतात, निदान तसा आभास तरी निर्माण केला जातो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
य
युयुत्सु Wed, 03/31/2010 - 07:15 नवीन
श्रीकृष्णाने मॅच फिक्सींग अगोदरच केले होते. मी यांना अगोदरच मारले आहे, तू फक्त निमित्त हो (मया एव एते निहता: पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन् भ. गी. ११.३३) असे म्हटल्यावर फळाची आशा करू नका इत्यादि गप्पा ठीक आहेत. निकाल माहित असेल तर निष्काम कर्म कुणीही करेल... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 03/31/2010 - 10:26 नवीन
मला नाही वाटत कुठेही की श्रीकृष्ण "गप्पा" मारत आहेत. असो. ज्याचे त्याचे मत. निष्काम कर्माचा मला जो अर्थ मांडायचा तो मी मांडलाच आहे. त्या व्यतिरिक्त माझ्याजवळ सांगण्यास काहीही नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की निकाल माहित असतांना कुणीही असे करू शकेल तर ते तुमचे मत. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
य
युयुत्सु Wed, 03/31/2010 - 12:14 नवीन
माझे मत मी गीतेतलाच आधार घेऊन मांडले आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Wed, 03/31/2010 - 16:15 नवीन
भगवंताला संपूर्ण शरणागत झाल्याशिवाय निष्काम कर्म शक्य नाही हे माझे मत आहे. त्यामुळे तुम्ही काढलेला निष्कर्ष - "श्रीकृष्णाची चूक" हाच मुळात चुकीचा आहे, हे देखील माझे मत आहे. आणि, माझे मत मी गीतेतलाच आधार घेऊन मांडले आहे. निकाल माहित असतांना कुणीही निष्काम कर्म करू शकेल ही भाषा फक्त तुमचीच आहे. स्वतःची चूक असतांना, त्यासाठी उगाच गीतेला नावं ठेवू नका. असो. तुम्ही एकुणात फक्त वाद घालण्यासाठी चर्चा करत आहात असे वाटते. त्यामुळे हा या धाग्यावरचा आमचा शेवटचा प्रतिसाद. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 04/01/2010 - 05:39 नवीन
:) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
व
वारा Wed, 03/31/2010 - 12:20 नवीन
यामद्धे एक विषय सुटल्या सारखा वाटतो, मुळात गीतेचा reference exceptionally वापरला पाहिजे, ना की normally. जेव्हा अर्जुन अशा धर्मसन्कटात पडला की, आप्त लोकाना मारावे की युद्ध सोडुन सन्यास घ्यावा, तेव्हा क्रुष्णाने सान्गीतले कि मरणारा कोण आहे त्याकडे लक्ष देवु नकोस तर तु तुझ काम कर. तु क्षत्रीय आहेस तुला लढावेच लागेल. यामधे असे उदाहरण घ्या की तुम्हि हॉटेलच्या countervar बसला आहात आणि भजी खायला तुमचे मित्र आले, पण बिल न देताच जाऊ लागले , तर तुम्ही त्याना कामगारान्च्या मदतिने चोपलेच पहिजे.
  • Log in or register to post comments
व
वारा Wed, 03/31/2010 - 12:23 नवीन
यामद्धे एक विषय सुटल्या सारखा वाटतो, मुळात गीतेचा reference exceptionally वापरला पाहिजे, ना की normally. जेव्हा अर्जुन अशा धर्मसन्कटात पडला की, आप्त लोकाना मारावे की युद्ध सोडुन सन्यास घ्यावा, तेव्हा क्रुष्णाने सान्गीतले कि मरणारा कोण आहे त्याकडे लक्ष देवु नकोस तर तु तुझ काम कर. तु क्षत्रीय आहेस तुला लढावेच लागेल. यामधे असे उदाहरण घ्या की तुम्हि हॉटेलच्या countervar बसला आहात आणि भजी खायला तुमचे मित्र आले, पण बिल न देताच जाऊ लागले , तर तुम्ही त्याना कामगारान्च्या मदतिने चोपलेच पहिजे.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 03/31/2010 - 17:51 नवीन
फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला... १. रिवार्ड पनिशमेंट याला काहीही अर्थ नाही.... 'देअर आर नो रिवार्ड्स नो पनिशमेंट्स , देअर आर ओन्ली कॉन्सिक्वेन्सेस.....' असे कुठे तरी वाचलेले आहे... २. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करु नका' असे तरी कुठे म्हणाला आहे? म्हणजे त्यचा अर्थ कर्म एफिसिएंटली करा, असाच घ्यावा लागतो.. :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 04/04/2010 - 12:17 नवीन
पण कृष्णाने आत्म्याबद्दल जे सांगितले आहे ते खरे की खोटे हे स्वतः मेल्याशिवाय कळणार नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/07/2010 - 07:40 नवीन
फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले हा एक सरसकट काढलेला चुकीचा अर्थ आहे. कोणतेही कर्म केले तरी फल ( परिणाम) मिळणारच आहे. कर्म न करणे हे देखील एक कर्मच आहे. फक्त त्याचे कर्मफल ठाऊक नसते. एखाद्या कर्मफलाच्या भितीने ते कर्म टाळण्यापेक्षा कर्म करणे श्रेयस्कर. शिवाय एखाद्या कर्माचे फल आपल्याला एज हवे असेल तसेच असेल/मिळेल असे नाही त्यामुळे हव्या तशाच कर्मफलाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कर्म करणे महत्वाचे आहे या अर्थाने बहुतेक श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले Image removed.
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sun, 04/11/2010 - 21:16 नवीन
चर्चा आवडली.. खुप शिकायला मिळालं. सगळ्यांचे आभार. माझे मत मी मांडत नसलो तरी जवळ- जवळ सर्वच मुद्दे आणि बाजु पटण्या सारख्या आहेत. हत्ती आणि अंधळे हि जी उपमा दिली गेली आहे ती खरोखरच किती उपयुक्त आहे हे जाणवते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा