पाककृती

शाकाहारी थाई करी

Primary tabs

Image removed.Image removed.From general" width="1000" height="1000" alt="" /> साहित्य : ढोबळी मिरची ( हिरवी,पिवळी,लाल्, केशरी ) प्रत्येकी १ उभी चिरून कान्दा १ उभा चिरून तोफू १ पाकिट नारळाचे शक्यतो दाट दूध ( हे टिन मधे ही मिळते) थाई करी पेस्ट ( लाल किन्वा हिरवी मिळते). मी लाल वापरलेली आहे. मीठ चवीप्रमाणे ब्राउन साखर १ छोटा चमचा तेल किन्वा तूप १ छोटा चमचा भाज्यान्चा स्टोक १.५ पेले. कृती : पातेल्यामधे तेल किन्वा तूप तापवायला ठेवा.त्यामधे कान्दा गुलाबी रन्गावर परतून घ्या. तो परतला गेला की त्यात भाज्यान्चा स्टोक घाला. त्याला १ उकळी आली की त्यामधे ढोबळी मिरची चे तुकडे घाला. हे तुकडे त्या स्टोक मधे शिजवून घ्या.साधारण पणे ७ ते ८ मिनिटे लागतात.त्यानन्तर त्यात तोफू चे तुकडे घाला.ते साधारण पणे ३ ते ४ मिनिटे उकळूद्या. आता तुम्हाला जितक तिखट हव असेल त्याप्रमाणे थाई करी पेस्ट घाला. साधारण पणे २ चमचे पेस्टनी बर्‍यापैकी तिखट होत.मग चवी प्रमाणे मीठ आणि ब्राउन साखर घाला. सगळ्यात शेवटी नारळाचे दूध मिसळा.नारळाच्या दूधाला १ उकळी आली की करी तय्यार !