उमेश कुलकर्णी यांची विहीर - काही प्रश्न, काही उत्तरे
💬 प्रतिसाद
(11)
प
पाषाणभेद
Sat, 04/03/2010 - 00:31
नवीन
चिंतातुरजंतूंनी हा चित्रपट पाहिला अन सांगितल्याप्रमाणे त्यांची दिर्घ प्रतिक्रिया देवून चित्रपटाचे चांगल्या तर्हेने विवेचन केले याबद्दल त्यांचे घन्यवाद.
मी विचारलेल्या सहा पैकी पाच प्रश्नांची उत्तरे देवून त्यांनी माझी उत्सूकता बर्यापैकी शमवलेली आहे. आभार.
त्यांचे हे विवेचन म्हणजे केवळ माझ्या प्रश्नांना उत्तरे नाहीत. इतरांनादेखील हा चित्रपट पाहून वेगळे प्रश्न पडू शकतात. त्या प्रश्नांना सोडविण्याच्या दृष्टीकोन कसा असावा याचा आदर्श वास्तापुस्त त्यांनी घातलेला आहे.
हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी दै. सकाळच्या "प्रिमीयर" या चित्रपटविषयक मासिकात उमेश कुलकर्णी यांची मुलाखत आलेली आहे. ती मुलाखत मी हा चित्रपट बघीतल्यानंतर वाचली. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की अशीच एक न विसरता येणारी घटना त्यांच्या आयुष्यात आली होती अन त्याच विषयाला अनुसरून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. काय घटना असू शकते याची उस्तूकता अधिकच ताणली गेली.
त्यांनी ज्या तर्हेने हा विषय चित्रपटासारख्या अतिशय अवघड माध्यमातून हाताळलेला आहे ते पाहून आदर अन आनंद वाटला. ती घटना वैयक्तिक असल्याने कदाचित समजणारही नाही अन न समजल्यामुळे तिला त्यांनी किती न्याय दिला तेही समजणार नाही. तरीही एक प्रेक्षक अन एक दिग्दर्शक या नात्याला त्यांनी चांगला न्याय दिला आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे दिग्दर्शक अन प्रेक्षकाची तार जुळावी लागते त्या प्रमाणे हा चित्रपट जर वेगळ्या नजरेने बघितला तर आपली तार जुळते. अर्थात सर्वसामान्य 'सुटी' एंजॉय करायला गेलेल्या प्रेक्षकाच्या हाती निराशा येईल पण जर त्याने सम्यासारखी दृष्टी ठेवली तर हातातून निसटून जाणारे त्याला गवसेल. एका अर्थाने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे चित्रपटात असणारे मेंढपाळ झालेत अन प्रेक्षक म्हणजे सम्या आहेत हे माझे मत.
हिंदी मराठीत बटबटीत रित्या काही सामाजिक जाणीवा दाखवणारे कलात्मक दिशेने जाणारे बरेच चित्रपट येवून गेलेत. नव्हे तशी भारतीय चित्रपटांचा इतिहासच आहे. आपण काहीतरी फ्रेम्स प्रेक्षकाला दाखवायचे अन ते प्रेक्षकांना समजण्यासाठी चमच्याने भरवले (स्पुन फिडींग) त्याप्रमाणे भरवायचे अन प्रेक्षकही 'काय वेगळ्या तर्हेने' विषय मांडलाय असे म्हणायचे असे बरेच चित्रपट आहेत.
विहीरीत एक वेगळाच विषय (जो एका शब्दात सांगता न येण्यासारखा आहे) अतिशय तरल, भावनाशिल रित्या हाताळला गेला आहे. त्यात नायक नायिकेचे प्रेम नाही, राजकारण नाही, आई मुलाचे प्रेम नाही रडवणूक नाही, पाचकळ विनोद नाही मुख्य म्हणजे बटबटीत पणा तर नाहिच नाही. तरीही हा चित्रपट सुसह्य होतो.
हे परिक्षण
अन त्यातील हा प्रतिसाद लिहीण्याआधी किंवा हा चित्रपट पाहण्याआधी मी दै. सकाळच्या "प्रिमीयर" मासिकातील उमेश कुलकर्णींची मुलाखत वाचलेली नव्हती. प्रतिसादात लिहील्याप्रमाणे { एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते.} कलाकार या नात्याने उमेशकुलकर्णींनी विहीर या कलाकृतीची निर्मीती त्यांच्या अनुभवाला अनुसरून केली. ती निर्माण करतांना त्यांना आनंदही झाला असणार. त्याच बरोबर ते प्रेक्षकाही तसलीच अनुभूती देवू शकतात यात त्यांचे दिग्दर्शकीय सामर्थ आहे.
एका बड्या (?) बॅनरबरोबर काम करतांना त्यांनी त्यांच्या कलाकृतीला धक्का न बसता शेवटपर्यंत काही तडजोड न करता ती आपल्या पर्यंत येवू दिली.
आता आपण जोड्या लावू.
समिर = प्रेक्षक
दिग्दर्शक = मेंढपाळ
नचादादा = मेंढ्या = आपली जीवनात असणार्या दु:ख च्या पलिकडे असणारा आनंद (मेंढ्या अनेकच आहेत.)
आता मी तुमच्याच लेखातील वाक्यात माझ्या जोड्या टाकतो अन काय बदल होतो ते पहा:
मेंढपाळाने जीवन जगण्याचे सुत्र समजावून सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना आपली आनंदाचे कारणे उमगतात धनगराच्या मेंढ्या जशा हरवेनाशा झाल्या (लौकिकार्थानं नव्हे, तर आता मेंढ्या चांगल्या उमजल्या, त्यामुळे हरवत नाहीत; तरीही कधीतरी एखादी मेंढी हरवली, तर तिचं एवढं दु:ख नाही अशा अर्थानं), तसंच प्रेक्षकाला आता काहीतरी शाश्वत गवसलेलं आहे. अशा रीतीनं त्याचा तिढा आणि शोक संपल्यानं तो लौकिक आयुष्याला सामोरा जायला पुन्हा (पण अधिक डोळसपणे, समंजसपणे) सरसावतो. हे सरळ आयुष्य असेलच असं नाही. पण इतरांपेक्षा समृध्द मात्र असेल.
कदाचित माझी अशी जोड्या लावून तुलना करण्याची पद्धत चुकीचीच असेल तरीही मोह न आवरल्याने मी ती केली.
आता थोडे विहीर या नावाबद्दल: विहीर ही जीवन आहे. त्यात पुर्णपणे पोहायचे की सांगड लावून अडखळत निघून जायचे ते आपणच ठरवायचे.
कोणतीही कलाकृती माणूसाला नवा दृष्टीकोन देते, जीवन समृद्ध अन त्या तसे घडण्यासाठी आपण, म्हणजे सुविद्य, समंजस, सुजाण प्रेक्षकांनी तरी थोडे कष्ट त्यासाठी घ्यावेच. नाही का?
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 04/03/2010 - 03:10
नवीन
तुम्ही या चित्रपटाचं खूप छान विश्लेषण केलेलं आहे. मी अजून 'विहीर' पाहिलेला नाही, पण जे वाचलंय त्यावरून नचिकेत हा समीरचा स्वप्नाळू भाग किंवा काहीसं भाबडं लहानपण असावं असं वाटलं. शहरी वातावरणात सरावलेला समीर (पोहोताना त्याला आधाराची गरज लागत नाही) तर अजूनही ते सगळं न झेपलेला नचिकेत.
आपलं बालपण हरवण्याविषयी हा चित्रपट आहे का? किंवा त्याही पलिकडे ग्रामीण जीवनाची मुळं असलेल्या, शहरीकरण होत असलेल्या समाजाच्या संक्रमणाच्या दु:खाची कथा आहे का?
राजेश
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 04/03/2010 - 05:46
नवीन
एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही.
तुम्हाला पडलेले प्रश्न एखाद्याच्या बाबतीत ते प्रश्न दुसरेच असू शकतील.
मला खात्री आहे की तुम्हालाही हा चित्रपट आवडेल अन विचारात पाडेल. एकदा हा चित्रपट पहाच. (पण थेटरात.)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Mon, 04/05/2010 - 10:13
नवीन
बालपण 'हरवणे' यात एक मूल्यात्मक विधान आहे. कारण त्यात काहीतरी हरवत आहे. चित्रपटात नायकाला त्याच्या जिवलग मित्राच्या मृत्यूचा आघात बालपणी सोसावा लागतो, पण त्यातून तो प्रगल्भ होतो. म्हणजे त्याला काहीतरी गवसते.
नागरीकरणाविषयी यात किंचितसे विधान आहे खरे; उदा: नचिकेताचा पुण्यास येण्यास नकार, नायक पुण्याबाहेर पडल्यानंतर त्याच्या समस्येचा गुंता सुटणे, वगैरे. पण तो मुख्य भाग नाही. किंबहुना ग्रामीण जीवनाविषयी काहीसे स्वप्नाळू रंजन तर नक्कीच अभिप्रेत नसावे. गावाकडच्या घरातील सर्व जण उलट आपापल्या प्रारब्धांखाली पिचत आहेत (इथे जी. ए. कुलकर्णींशी नाळ जोडली जाते). त्याउलट शहरात राहणार्या समीरची आई तशी दु:खी नाही. शिवाय, शहरात राहणारा समीरच गुंता सोडवू शकतो (गावातला नचिकेत नाही).
त्यामुळे शहरीकरणाच्या संक्रमणासारखा सामाजिक आशय इथे जाणवत नाही. ती मूलतः माणसाची कथा आहे. माणसे इथूनतिथून सारखीच असतात; फक्त काहींना माणूसपणाचा रसरशीत गाभा गवसतो. त्यासाठी संवेदनशील मात्र असावे लागते.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 04/05/2010 - 14:27
नवीन
सहमत.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 04/03/2010 - 07:09
नवीन
चित्रपट पाहून लेखकाने आवर्जून प्रश्नांचा उहापोह केलेला आहे हे स्पृहणीय वाटते.
प्रस्तुत विवेचनातले मुद्दे पटण्यासारखे आहेतच. मूळ चित्रपट जरी पाहिला नाही तरी या आणि आधीच्या धाग्यामधून प्रस्तुत कलाकृतीचा पोत ध्यानात येण्याची प्रक्रिया फारच चांगली घडते आहे असे वाटले.
मी मागे जे ओपन-एंडेडनेस सारखे प्रश्न मांडले होते त्याच अनुषंगाने इतरही प्रश्न मांडावेसे वाटतात. ते प्रस्तुत कलाकृतीच्या संदर्भात असतीलच असे नाही. परंतु एकंदर आस्वादप्रक्रियेबद्दलचे माझे अज्ञानापोटी आलेले आहेत.
कोहेरन्स किंवा ढोबळ मानाने बोलायचे तर संगतीचा मुद्दा : सामान्यतः कथनात्मक प्रकृती असलेल्या कृतींच्या संदर्भात हा मुद्दा येतो : कथा, कादंबर्या , एपिक्स (महाकाव्ये) , नाटके, चित्रपटादि कृती. काव्य किंवा चित्र किंवा संगीत या गोष्टींमधे हा मुद्दा येत नाही.
Coherence , together with Unity of Space and Time , had been at the core of the integrity of any such "narrative-oriented" works. या सूत्रापासून फारकत घेणारे, तंत्र या प्रकाराची मोडतोड आणि पुनर्स्थापना करणारे प्रयोग गेल्या शतकात बरेच झाले - महायुद्धोत्तर कालात या मोडतोडीला वेग आला. असे असले तरी, मुख्यप्रवाहामधे अजूनही या दोन तत्त्वांना महत्त्वाचे स्थान आहे असे मानण्यात येते.
तर माझा प्रश्न असा की , संगती आणि स्थलकालाची एकात्मता यांना नेमके किती महत्त्व द्यायचे ? जिथे घटितांना अपरंपार महत्त्व आहे - उदाहरणार्थ डिटेक्टीव्ह कथाकादंबर्या - तिथे तर वर उल्लेखलेल्या मुद्द्यांना सोडून काम होणारच नाही. परंतु मग अशा कथाकादंबर्यांचे कलाक्षेत्रातले माहात्म्य नाममात्रच राहाते. याउलट जिथे जिथे म्हणून मनुष्यस्वभाव, माणसांचे , समाजाचे प्रश्न इत्यादिंबद्दल महत्त्वाच्या अशा कथाकादंबर्यांचा उल्लेख होतो तिथे , त्यातली गुंतागुंत ही नैतिक स्वरूपाची, एकमेकांना छेद देणार्या प्रवृत्तींबद्दलची इ. प्रकारची असते. तर मग कलाकृतींची बांधणी, त्यातले ताणेबाणे , एकंदर वातावरणनिर्मिती , "द डेव्हिल दॅट लाइज इन डिटेल्स" याचे महत्त्व नेमके काय ? एकूण रचनेबद्दलच्या या मूलभूत मुद्द्याना बगल देऊनही काही अर्थपूर्ण अशी कलाकृती बनू शकेल काय ?
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 04/03/2010 - 08:24
नवीन
चित्रपट कलामाध्यम आहे. चित्रपटाला यंत्राधिष्ठित कला आहे असे मानले जाते. चित्रपटाच्या निर्मीतीचा पहिला भाग हा त्या दिग्दर्शकाच्या मनात तयार व्हावा लागतो. (दिग्दर्शक हा ही एक कलाकारच असतो. प्रोड्यूसर नव्हे.) त्याचे मन तयार झाल्यानंतर उरते ती तांत्रिक प्रक्रिया. ह्या तांत्रिक प्रक्रियेतून जात असतांना अनेक चालत्या बोलत्या माणसांपर्यंत जावे लागते. (कलाकार, तंत्रज्ञ, आर्थीक बाबी आदी.) त्या त्या माणसांचे गुणदोष, स्वभाव, बोलणे, चालणे वागणे हे निवडतांना दिग्दर्शकाला त्याच गुणाची माणसे मिळतीलच अशी खात्री नसते. यात कालपव्ययही होवू सकतो. इतर कलांच्या बाबतीत (चित्र, शिल्प, लेखन, काव्य आदी.) या तांत्रिक बाबी कलाकारापुरत्या खुपच मर्यादित राहतात अन त्या केवळ काही हत्यारांनी, साधनांनी साध्य होतात. (रंग, ब्रश, छिन्नी, हातोडी, लेखणी आदी.)
मानवी भाव भावनांना केवळ दिग्दर्शक सागतो तसे वागणे अवघड असते. तांत्रिक साधनांना वळण लावणे सोपे असते.
चित्रपटाची एक भाषा असते. ती तिन पातळ्यांत विभागता येईल. १) काय सांगायचे त्या पासून सुरू होवून २) कसे सांगितले अन ३) कसे समजले या पर्यंत ती भाषा थांबते.
या सगळ्या मुद्यांचा विचार करता विहीर ही एक कलाकृतीच आहे असे लक्षात येते.
घटितांना अपरंपार महत्त्व असणार्या डिटेक्टीव्ह कादंबर्यात (अन मसालेवाईक चित्रपटात) आलेला Coherence हा तांत्रिक प्रक्रियेचा (रंग, ब्रश, छिन्नी, हातोडी, लेखणी आदींना अनूलक्षून) भाग असावा असे मला वाटते. त्यात मानवी भावना येत नाहित.
चित्रपटात, कलाकृतीत जर मनुष्यस्वभाव, माणसांचे , समाजाचे प्रश्न, गुंतागुंत नसेल तर ती एक तांत्रिक प्रक्रियाच आहे. या उलट विहीर सारख्या चित्रपटात दिसते. यात भावनांची गुंतागूंत (पातळी क्र. १.) तर आहेच पण ती दिग्दर्शकाने सार्थपणे पडद्यावर साकारलेली आहे (पातळी क्र २.) . त्यात आपण समरस होवू शकतो. त्या प्रक्रियेचा एक भाग (पातळी क्रं ३.) होवू शकतो.
कलाकारी जाणून घेणे ही पण प्रेक्षकावर अवलंबून असते.
चित्रपटाचा प्रेक्षक हा ग्राहक असतो. पैसे मोजून तो आलेला असतो.
बाकी कलाकृतीच्या बाबतीत पुन्हा बोलतो. एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही.
कलेचा आस्वादक असणे अन मनोरंजनाचे गिर्हाईक असणे यात कलाकृतीकडे आपण कसे बघतो या दृष्टीने फरक पडतो. म्हणूनच काहींना हा चित्रपट वेगळा वाटतो तर काही जण याचा आस्वाद घेवू शकतात.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Sat, 04/03/2010 - 11:39
नवीन
सर्वप्रथम स्थलकालाची एकात्मता म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे? अॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रानुसार अभिजात पाश्चिमात्य कथनात्मक प्रकारांत याची फार विशिष्ट व्याख्या आहे, आणि ती सतराव्या शतकातच मोडली गेली. पिएर कोर्नेय (Pierre Corneille) याच्या 'ल सिद' या फ्रेंच नाटकाविषयी तेव्हा वितंडवाद झाले, कारण त्यात ती मोडली होती. नंतर शेक्स्पीअरनेसुध्दा ती मोडली. भारतीय नाट्यशास्त्रात ती नव्हतीच. आपणास माहीत असलेल्या बहुतेक कथनात्मक कलाकृती ही एकात्मता पाळत नाहीत. त्यामुळे आज तिचे महत्व शून्यच आहे.
आता राहिली संगती. हिची व्याख्या जरा लवचिकच आहे. 'विहीर' सारख्या कलाकृतीविषयी सांगायचे झाले, तर लोकांना रूढ अर्थाने त्यात संगती दिसत नाही. मेल्यानंतर नचिकेत परत कसा येतो? फणस कशासाठी? पडणार्या पाण्याचा अतिरेकच आहे; धनगराच्या बोलण्यातून मला काही कळत नाही, तर मग समीरला काय बोध झाला? अशा शंका/टिप्पणी हे दर्शवतात. मला मात्र त्यात बर्यापैकी संगती दिसली. म्हणून मी ती (मला दिसली तशी) उलगडून सांगितली.
अर्थात, खर्या अर्थाने आधुनिकोत्तर साहित्यात व कलाकृतींत कथनाची इतकी काही मोडतोड होऊ शकते, की अशी संगती लावता येईलच, असे नाही. आधुनिकोत्तर कथनातील अशा संगतीच्या अभावापुढे विहीर काही फार अनाकलनीय वगैरे नाही. जी.ए. कुलकर्णी व दि. बा. मोकाशी यांना ती अर्पण केली आहे. हे अगदीच सुसंगत आहे. कारण कथनशैली व आशयामध्ये 'विहीर'चे नाते या (आधुनिकोत्तर मानता न येणार्या) साहित्यिकांशी लागते.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 04/03/2010 - 16:55
नवीन
विहीर प्रदर्शीत झाल्यानंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी कोठेतरी त्यांच्या अनूभवाबद्दल बोलतील/ बोलले असतील तर जाणकारांना येथे माहिती द्यावी.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Sat, 04/03/2010 - 18:36
नवीन
मलाही आधी हा चित्रपट कळला नव्हता... 'माबो' वर एकाने मला सांगितले, की धनगर सांगतो..'काळजाच्या डोळ्यानं बघायचं, म्हणजे हरवलेलं दिसतं'.. मलाही हे पटले...
पण चित्रपटात असे प्रत्यक्ष्य वाक्य ऐकल्याचं आठवत नाही.. ( म्या बहुतेक काळजाच्या डोळ्यानं षिनेमा पाहिला नसावा.. :( )
पण चित्रपट अप्रतिम आहे..... कलाकार, संवाद, लोकेशन्स, कथा, शेवटची नावे येताना असणारी बॅक ग्राउन्ड धुन (बिलासखानी आहे का? ) , डायरेक्शन..... सगळेच अप्रतिम... काळजाच्या डोळ्यानं आणखी एकदा पहायला हवा....
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
- Log in or register to post comments
श
शशी
Tue, 04/06/2010 - 08:08
नवीन
एक अतिशय छान चर्चा वाचून मी मिसळपाव चा सभासद असल्याचा अभिमान वाटतो. मला थिएटर मध्ये विहीर पहाण्याची संधी मिळालेली नाही, पण एक निश्चित की पाहीन तर थिएटर मध्येच. चांगले सिनेमा पायरेटेड सिडीवर कृपया पाहू नका.
- Log in or register to post comments